बंधुंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा”-फिलिप्पै. ४:८
आयुष्य बहुतेक वेळा एखाद्या व्यस्त मार्गासारखे वाटते, विचारांची, भावनांची, आणि अनुभवांची अखंड रहदारी आपल्याकडून अत्यंत वेगाने वाहते. प्रत्येक दिवस स्वतःच्या आव्हानांचा संच सादर करतो –अडथळे आणि मार्ग जे आम्हांला आमच्या इच्छित मार्गापासून वळवू शकतात. भारावून जाणे आणि आपला मार्ग गमावणे सोपे आहे.
प्रेषित पौलाला मनाचे सामर्थ्य माहित होते. आपण कोणत्या प्रकारच्या विचारांचे मनन केले पाहिजे यावर त्याने फिलिप्पैच्या पत्रात असे स्पष्ट निर्देश दिले यात आश्चर्य नाही. जर आपण आपल्या विचारांची तुलना कारबरोबर केली, तर पौल मूलतः निवडक ड्रायवर बनवणे, सुरक्षित, विश्वासार्ह आणि फायदेशीर वाहने निवडण्याचा सल्ला देत आहे.
मार्ग ओळखणे
“तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो.” (२ करिंथ. १०:५)
आपण आपल्या मार्गाची निवड करण्याअगोदर,आपण प्रथम जमिनीच्या आपल्या क्षेत्राबद्दल अवगत असले पाहिजे, की आपले विचार एकतर आपली उन्नती करू शकतात किंवा खाली पाडू शकतात हे ओळखणे ही पहिली पायरी आहे. बायबल आपल्याला उपदेश देते की प्रत्येक विचारांना बंदिस्त करावे, आणि ते आपल्या जीवनासाठी देवाच्या इच्छेशी जुळते याची खात्री करण्यासाठी त्याचे विश्लेषण करावे.
वाहतूक कोंडीमध्ये एका रांगेतून दुसऱ्या रांगेमध्ये बेपर्वाईने फिरणारी कार अनेकदा अपघातांना कारणीभूत होते. त्याचप्रमाणे, एक अनियंत्रित मन जे विवेकाशिवाय विचारांमध्ये उद्धिष्टहीन होऊन जाते त्याचा आध्यात्मिक पतनाकडे कल असतो.
योग्य वाहन निवडा
“देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या.” (रोम. १२:२)
एकदा की आपण आपला मार्ग ओळखला, तर पुढील पायरी ही योग्य वाहन निवडण्याची आहे –योग्य विचार लक्षात घेणे हे आपल्याला आपल्या इच्छित स्थानावर घेऊन जाईल. हे केवळ सकारात्मक विचार नाहीत; तर ते परिवर्तनीय विचार आहेत. हे पवित्र आत्म्याला आपली मने नवीन करू देणे आहे म्हणजे आपण देवाची परिपूर्ण इच्छा ओळखू शकावे.
कुशलतेने कार्य करा
“तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.” (स्तोत्र. ११९:१०५)
अगदी उत्तम ड्रायवर लोकांना देखील दिशेसाठी मदतीची गरज असते. देवाचे वचन आपल्यासाठी जीपीएस असे कार्य करते, जे आपल्याला दिशा आणि स्पष्टता देते. जेव्हा आपण चिंतेच्या अडथळ्यांचा किंवा शंकेच्या खड्ड्यांचा सामना करतो, तेव्हा पवित्र शास्त्र आपल्याला योग्य मार्गावर मार्गदर्शन करते.
खड्ड्यांजवळ नियमित थांबत राहा
“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.” (मत्तय ११:२८)
लांबच्या प्रवासासाठी इंधनासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी खड्ड्यांजवळ थांबण्याची आवश्यकता लागते. जीवनाच्या धावपळीत, देवाच्या सान्निध्यात विश्रांतीसाठी वेळ मिळवा. हे क्षण आपल्याला आध्यात्मिक आणि भावनिकरित्या भरून टाकतात, आपल्याला आपला प्रवास सुरु ठेवण्यासाठी सहनशक्ती देतात.
सुरक्षितपणे पोहचणे
“जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.” (२ तीमथ्यी ४:७)
पौलाने जीवनाची तुलना शर्यतीशी केली. पण पृथ्वीवरील शर्यतीसारखे नाही, जेथे केवळ एक विजेता असतो, पण स्वर्गीय शर्यतीत शेवटच्या रेषेपर्यंत प्रत्येक जण पोहचू शकतो. किल्ली ही मार्गावर कायम राहावे, कौशल्याने दिशा पहावी, त्या विचारांद्वारे उर्जा मिळवावी जे सत्य, उदात्त, योग्य, शुद्ध, सुंदर आणि प्रशंसनीय आहे.
आज, तुम्ही विचारांच्या कोंडीमध्ये चाकांच्या मागे आहात. तुम्ही एक बेपर्वा ड्रायवर किंवा कौशल्यपूर्ण दिशा दर्शक होणार? निवड ही तुमची आहे. शहपणाने निवडा, कारण मार्ग जो तुम्ही अवलंबिता ते तुमच्या नशिबाला निश्चित करते.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी विनंती करतो की तू माझ्या विचारांना मार्गदर्शन कर आणि आज माझ्या पावलांना दिशा दे. तुझ्या परिपूर्ण इच्छेमध्ये मला ने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● बारा मधील एक● देवाला प्रथम स्थान देणे # 1
● इतरांबरोबर शांतीमध्ये राहा
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-२
● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे
● सार्वकालिक निवेश
● अद्भुततेस जोपासणे
टिप्पण्या