हेरोद राजा असल्याची कल्पना करा. तुमच्याकडे शक्ती, संपत्ती आणि अधिकार आहे. मग, तुम्ही एका नवीन “यहूद्यांच्या राजाच्या” जन्माबद्दल कुजबुज ऐकू लागता.” हेरोद व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले होते” (मत्तय २:३). आणि त्यामुळे त्यांनी धार्मिक तज्ञ, मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांना जमवून विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे?”
प्राचीन भविष्यवाणीचा संदर्भ देत ते त्याला म्हणाले, “यहूदीयातील बेथलेहेमात (मत्तय २:५); पवित्र शास्त्रातील ज्याचा त्यांनी संदर्भ दिला ते होते. (मीखा ५:२)
“हे बेथलेहेम एफ्राथा, यहूद्याच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल;
त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादि काळापासून आहे.”
हेरोद, सत्ता आणि प्रतिष्ठेने वेढलेला, तो या भविष्यवाणीमुळे घाबरला होता, ही एक आठवण आहे की पृथ्वीवरील अधिकार हा क्षणभंगुर आहे. तरीही, मागी लोकांसाठी, हीच भविष्यवाणी आशेचा किरण होती. एक नम्र राजा जो बेथलेहेम मध्ये जन्मणार होता त्याच्या शोधात, तारे आणि पवित्र शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पूर्वेकडून प्रवास केला. हेरोदाने एक कथित धोका दूर करण्याचा प्रयत्न केला तर मागी लोकांनी उपासना करण्याचा प्रयत्न केला.
एकाच भविष्यवाणीसाठी अशा भिन्न प्रतिक्रिया का? मागी लोकांना केवळ ताऱ्यांच्या अभ्यासाद्वारे प्राप्त केलेले ज्ञान नव्हते, तर देवाच्या वचनाच्या अभ्यासाद्वारे देखील होते.
पुढील काही शहाणपणाची गुणधर्म आहेत जी देवाच्या वचनातून येतात.
१. दैवी प्रेरित:
देवाच्या वचनातून येणारे शहाणपण ही मानवी रचना नाही परंतु ते पवित्र आत्म्याने प्रेरित आहे. ते मानवी समज आणि तर्काच्याही पलीकडील आहे. (२ तीमथ्यी ३:१६; २ पेत्र १:२१)
२. परिवर्तनशील:
या शहाणपणात हृदय बदलणे, मनाचे नवीकरण करणे, आणि व्यक्तींना धार्मिक जीवन जगण्यास मार्गदर्शन करणे आहे. एखाद्याचे जीवन आणि प्राथमिकतांची मूलगामी पुनर्रचना होऊ शकते. (रोम. १२:२; इफिस. ४:२३)
३. दृष्टीकोनात शाश्वत:
सांसारिक शहाणपणाच्या विपरीत, जे सहसा अल्पकालीन नफा किंवा तात्काळ परिणामांवर लक्ष केंद्रित करते, तर देवाच्या वचनाकडून येणाऱ्या शहाणपणात शाश्वत दृष्टीकोन आहे. ते आपल्याला निर्णय आणि कृतींकडे मार्गदर्शन करते ज्यास शाश्वत महत्व आहे. (मत्तय ६:१९-२१; कलस्सै. ३:२)
ही वैशिष्ट्ये देवाच्या वचनातील शहाणपण अमुल्य आणि इतर कोणत्याही प्रकारच्या बुद्धीच्या तुलनेत अतुलनीय बनवतात.
आता, तुमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल विचार करा, जेव्हा तुम्ही बायबलमधील शिकवणींना सामोरे जाता तेव्हा तुम्ही हेरोद किंवा मागी लोकांसारखे अधिक आहात का? तुम्हांला त्याच्या सत्याचा धोका आहे का किंवा तुम्ही त्यांना एक मार्गदर्शक तारा म्हणून पाहता? देवाचे शहाणपण नेहमी जगाच्या शहाणपणाच्या विरोधात असते, आपली स्थिति बिघडवणारी आणि आपल्या आरामदायक क्षेत्राला आव्हान देतात. तरीही, ते शहाणपण हे सार्वकालिक जीवनासाठी मार्ग आहे.
“कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बलता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.” (१ करिंथ. १:२५)
पवित्र शास्त्र आपल्याला मागी लोकांसारखे होण्यासाठी पाचारण करत आहे: जिज्ञासू, मेहनती आणि प्रवास करण्यास इच्छुक, शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्हीही, की राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला भेटावे. हा नम्र मेंढपाळ राजा राजवाड्यात जन्माला आला नाही तर गव्हाणीत जन्माला आला, ऐहिक वैभवाच्या थाटाने नव्हे तर चिरंतन आशेच्या वचनाने.
आज, आपण आपल्या स्वतःच्या जीवनात येशूचा शोध घेण्यासाठी शहाणपणासाठी प्रार्थना करू या, ज्यास अंतिम शासनकर्ता म्हणून ओळखावे जो आपली राखण प्रीती, दयाळूपणा आणि न्यायाने करतो. कारण जसे स्तोत्रकर्त्याने लिहिले, “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीही उणे पडणार नाही.” (स्तोत्र. २३:१)
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, जसे मागी लोकांनी केले तसे तुझा शोध घेण्यासाठी आम्हांला शहाणपण दे, तुझ्या अधिकाराने धमकावले गेलेले नाही तर तुझ्या वचनाने प्रेरित व्हावे. आम्हांला नम्र गव्हाणी आणि गौरवी वधस्तंभाकडे ने, जेथे आम्ही तारण आणि आमच्या आत्म्याचा खरा मेंढपाळ प्राप्त करतो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● दैवी रहस्ये उघड करावीत● संयम आत्मसात करणे
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
● २१ दिवस उपवासः दिवस १२
● आज पवित्र व्हा आणि अद्भुत कृत्येउद्या होतील
● ते खोटेपण उघड करा
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
टिप्पण्या