“कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करुन तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो.” (२ करिंथ. १०:४-५)
विभाजनावर भरभराट होत असलेल्या जगात, चर्च एकता आणि प्रेमाचे आश्रयस्थान असले पाहिजे. तरीसुद्धा, किती तरी वेळा आपण आपल्या सहविश्वासुंसोबत क्षुल्लक वादात सापडतो, त्याच्या उपासनेच्या शैलीवर आणि त्यांच्या जीवनशैलींच्या निवडीवर टीका करतो? २ करिंथ. १०:४-५ मध्ये प्रेषित पौल आपल्याला याचे स्मरण देतो की, आपले खरे झगडणे हे रक्त व मांसाबरोबर नाही तर आध्यात्मिक बालेकिल्ल्यांविरुद्ध आहे.
मनाची युद्धभूमी:
प्रेषित पौलानुसार खरे युद्ध हे, मनात सुरु होते. बालेकिल्ले ज्यांना तो संबोधत आहे, हे खोलवर रुजलेले विश्वास, वृत्ती आणि विचार आहेत जे देवाच्या ज्ञानाला विरोध करतात. त्यापैकी काही बालेकिल्ले हे आपल्या सभोवतालच्या जगाद्वारे निर्माण केलेले असू शकतात; इतर हे स्वयंच निर्माण झालेले असू शकतात. परंतु एक गोष्ट निश्चित आहे: आपल्या जीवनात आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात देवाचे राज्य स्थापित होण्यासाठी त्यांना उतरणे आवश्यक आहे.
योग्य शस्त्र:
टीका, निर्णय किंवा विभाजन यासारख्या सांसारिक शस्त्रांचा वापर केल्याने केवळ विनाशाचे चक्र कायम राहील. इफिस ६:१४-१८ आपल्याला हे सांगते की देवाच्या शस्त्रामध्ये, सत्य, धार्मिकता, सुवार्ता, विश्वास, तारण, देवाचे वचन आणि प्रार्थना यांचा समावेश आहे. ही आध्यात्मिक शस्त्रे आहेत, ज्याचा वापर आपण बालेकिल्ल्यांना उध्वस्त करण्यासाठी केला पाहिजे.
विचलित लक्ष:
जेव्हा आपण आपल्या शस्त्रांनी परस्परांविरुद्ध नेम धरतो, तेव्हा केवळ शत्रूला जे पाहिजे असते तेच आपण करत असतो –खऱ्या युद्धापासून आपले लक्ष विचलित करणे. रोम. १४:१९ मध्ये बायबल म्हणते, “तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे.” त्या शक्तीची कल्पना करा जिला मोकळे सोडले जाऊ शकते जर आपण अंतर्गत विवादांमध्ये खर्च करणारी सर्व शक्ती घेतली आणि तिचा वापर आपली जीवने आणि समाजात शत्रूने जे बालेकिल्ले रचले आहेत त्याविरुद्ध लढा देण्यावर लक्ष केंद्रित केले.
खऱ्या शत्रूवर लक्ष केंद्रित करणे:
इफिस ४:३ आपल्याला प्रोत्साहन देते, “आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा.” एकता म्हणजे एकरूपता नव्हे; याचा अर्थ देवाच्या राज्याचा विस्तार करण्याच्या मोठ्या ध्येयासाठी आमचे मतभेद असूनही सहकार्य करणे. एकता ही महत्वाची आहे कारण येशूने मार्क ३:२५ मध्ये म्हटले, “आपसांत फुट पडलेले घरही टिकत नाही.”
याकोब ४:७ म्हणते, “म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.” आपले खरे शत्रू हे सहविश्वासू लोक नाहीत जे थोड्याशा फरकाने संगीत किंवा पोशाखसह भिन्नपणे उपासना करतात. आपला खरा शत्रू हा सैतान आहे, जो विभाजन आणि नाश करण्यास पाहतो. जेव्हा आपण त्याचा प्रतिकार करण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण एक शक्तिशाली शक्ती बनतो जी त्याचे गड पाडू शकते.
आज, चला आपण आपल्या स्वतःला आव्हान देऊ या की आपल्या खऱ्या शत्रूवर आपल्या आध्यात्मिक शास्त्राचा पुन्हा नेम धरावा. चला आपण तोडण्याची नव्हे तर बनविण्याची शपथ घेऊ या. चला आपण अधिक प्रार्थना करणे आणि कमी टीका करण्यास समर्पित व्हावे, अधिक समजावे आणि कमी न्याय करावा, अधिक प्रीती करावी आणि वादविवाद कमी करावा.
जेव्हा आपण हे करतो, आपण हे पाहू की केवळ बालेकिल्ले हे नष्ट केले जाणार नाहीत तर आपण देखील योहान १७:२१ मधील ख्रिस्ताची प्रार्थना पूर्ण करणार आहोत, “ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा.”
प्रार्थना
पित्या, परमेश्वरा, येशूच्या नावाने, मी तुझ्या दैवी शहाणपणाचा शोध करतो. माझ्या विचारांना चालना दे, माझ्या पावलांना दिशा दे, आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर जेणेकरून मी तुझ्या परिपूर्ण इच्छेमध्ये चालावे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची मी इच्छा करू शकतो काय?● २१ दिवस उपवासः दिवस १६
● वातावरणावर महत्वाची समज - १
● सुवार्ता पसरवा
● २१ दिवस उपवासः दिवस ०४
● योग्य दृष्टीकोन
● योग्य व्यक्तीबरोबर संबंध ठेवा
टिप्पण्या