english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. पित्याचे हृदय प्रकट केले गेले
डेली मन्ना

पित्याचे हृदय प्रकट केले गेले

Monday, 25th of September 2023
23 19 1394
“जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे.” (१ योहान ४:८)

तुम्ही देवाला कसे समजता?
तो सावलीत लपलेला हुकुमशाही आकृती, तुम्हांला पापाच्या कृतीत पकडण्यासाठी तयार असणारा आहे का? किंवा, तो प्रेमळ पिता आहे, प्रत्येक वळणावर तुम्हांला मिठी मारणारा.

विधी आणि नियमांच्याही पलीकडील:
शतकानुशतके, यहूदी लोकांनी देवाला मोशेच्या नियमशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिले- कठोर आदेश देणारा आणि न्याय करणारा परमेश्वर, परम पवित्र रहस्यात झाकलेले, चोहोबाजूस करुबीम आणि जळणारा धूप. प्रेम किंवा पिता म्हणून त्यांना देवाचे प्रकटीकरण झाले नव्हते.

जेव्हा प्रभू येशूने त्याच्या सेवाकार्याचा आरंभ केला, त्याने या कथानकास मुलभूतपणे बदलले. त्याने देवाला ‘पिता’ असे म्हटले, त्यांना आश्चर्यचकित केले ज्यांनी देवाला केवळ नियमशास्त्र आणि बलिदानांच्या रचनेमध्येच समजले होते. अचानकपणे, तो देव देहधारी होता, आणि तो विश्वाच्या निर्माणकर्त्याला ‘पिता’ म्हणत होता.

“परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.” (योहान १:१२)

प्रीती जी बरे करते
लूक १३ मध्ये, प्रभू येशू अठरा वर्षांपासून कुबडी असलेल्या स्त्रीला भेटला. धार्मिक परंपरेने शब्बाथच्या दिवशी अशा प्रकारचे उपचार करणे टाळले असते, परंतु येशूने नियामांचे उल्लंघन केले. त्याने तिला पाहिले, तिला स्पर्श केला, आणि तिला बरे केले. त्याच्या कृतीमध्ये, येशूने पित्याच्या हृदयाला प्रकट केले- शुद्ध आणि बिनशर्त प्रीतीचे हृदय.

“प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही; फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही; स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते; ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.” (१ करिंथ. १३:४-७)

प्रीतीला कोणताही अडथळा नाही
संतप्त सभास्थानाच्या नेत्याला फटकारत, धार्मिक परंपरेमुळे प्रेमाला रोखण्याच्या मूर्खपणावर प्रकाश टाकत होता. “शब्बाथ दिवशी ह्या स्त्रीला बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?” येथे येशूनी आपल्याला दाखवले की मानवी नियम किंवा कायद्यांमुळे देवाचे नियम बाधित नाही.

“कारण माझी खातरी आहे की, मरण, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.” (रोम. ८:३८-३९)

व्यवहारिक पाऊले: 
१. देवाबद्दल तुमच्या दृष्टीकोनाची पुन्हा तपासणी करा: तुमची परिपूर्णता प्रीती किंवा नियमांवर आधारित आहे का?

२. देवाच्या प्रीतीला प्रतिबिंबित करा: देव आपल्यावर प्रेम करतो म्हणून इतरांवर बिनशर्त प्रेम करण्यासाठी मूर्त पावले उचला.

३. अडथळे मोडून काढा: तुमच्या जीवनातून काहीही ते ओळखा आणि त्यास नष्ट करा जे देवाच्या प्रीतीस व्यक्त करण्यास अडथळा निर्माण करते.

येशूने प्रकट केलेला देव हा काही दूरचा देव नाही; तो एक प्रेमळ पिता आहे, ज्याचे हृदय त्याच्या लेकरांसाठी प्रेमाने ओतप्रोत वाहते. हे ते प्रेम आहे जे भेदभाव करत नाही; योग्य वेळेसाठी वाट पाहत नाही, आणि त्यास काहीही अडथळा माहित नाही.

आज, चला आपण देवाच्या चारित्र्याच्या या शक्तिशाली प्रकटीकरणास आत्मसात करू आणि त्याची नितांत गरज असलेल्या जगात त्याच्या प्रेमाचे वाहक बनण्याचा प्रयत्न करू या. आमेन.
प्रार्थना
पित्या, तुझ्या असीमित प्रीतीसाठी आमचे डोळे उघड जे मानवी अडथळे आणि परंपरेस झुगारते. आमच्या हृदयाला तुझ्या दैवी प्रेमाचे वाहक बनव. आणि आमच्यातील ते काहीही वेगळे करून टाक जे त्याच्या प्रवाहाला रोखते. आज व नेहमीच तुझ्या स्वतःला नवीनरित्या प्रकट कर. येशूच्या नावाने. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● अपराध-मुक्त जीवन जगणे
● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो
● वरील आणि समानांतर क्षमा
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- २
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण कसे करावे -१
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन