डेली मन्ना
विचलित होण्याच्या वाऱ्यामध्ये स्थिर
Friday, 6th of October 2023
24
15
1456
Categories :
Discipleship
Maturity
जीवन हे आकांक्षा, स्वप्ने, वचनबद्धता आणि जबाबदाऱ्यांचे चित्रण आहे. त्याच्या अफाट विस्तारामध्ये, विचलन हे नेहमीच उद्भवतात, बऱ्याचदा सूक्ष्म आणि काहीवेळा चकचकीत आपल्याला आपल्या देवाने दिलेल्या उद्देशापासून आणि नाशिबापासून दूर नेतात. विश्वासणारे म्हणून, आपण त्याच्या प्रलोभनापासून मुक्त नाही परंतु आपल्याकडे पवित्र शास्त्र आणि आत्म्याचे सामर्थ्य आहे की सतत स्थिर राहावे.
"तुझे डोळे नीट पुढे पाहोत, तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत." (नीतिसूत्रे ४:२५)
विचलन समजून घेणे
व्याख्येने, विचलन हे काहीतरी आहे जे सर्वात महत्वाच्या गोष्टींपासून आपले लक्ष काढून घेते. पवित्र शास्त्राच्या अर्थाने, विचलन हे देवाने आपल्यासाठी नियुक्त केलेल्या मार्गापासून दूर नेणे आहे. ते असंख्य रुपात प्रकट होतात-लोक, विचार, प्रलोभन आणि परिस्थिती. विचलनाचे प्रलोभन हे नेहमीच पापमय किंवा हानिकारक असे नाही. बहुतेक वेळा, ते 'चांगले' असतात जे आपल्याला देवाच्या 'सर्वोत्तम' पासून दूर ठेवतात.
जेव्हा काही विचलन हे, एखाद्या टेलीव्हिजन मालिकेचा आवाज किंवा कॅफेमधील बडबडीसारखे, एका व्यक्तीसाठी नगण्य असू शकते पण ते दुसऱ्यासाठी पूर्णपणे व्यत्यय आणू शकतात. विचलित होण्याचे आपले वैयक्तिक स्त्रोत ओळखणे ही त्यांवर प्रभुत्व मिळवण्याची पहिली पायरी आहे.
"तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकवले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे." (२ करिंथ. ११:३)
विचलनातून मार्ग काढणे
चला असे म्हणून की तुम्ही तुमचे प्रार्थनेचे जीवन गहन करण्याचा निर्णय करता, तेव्हा तुम्हांला कळते की एक मित्र नुकताच शहरात राहायला आला आहे. यामध्ये मग तुमचा अधिक वेळ जातो. मित्रता, स्वयं आशीर्वाद आहे, ते विचलन होऊ शकते जेव्हा ते प्रार्थनेच्या प्राथमिक पाचारणास अडथळा करते.
प्रभूची सेवा करण्यासाठी तुम्ही आवेशी आहात. तुम्ही शेवटी झेप घेता आणि परमेश्वराची सेवा करण्यास सुरु करता, तेव्हा तुम्ही फक्त टीका किंवा गुन्ह्याच्या पहिल्या चिन्हावर माघार घेता. निराशा, जरी खरी असली तरी, ते विचलन आहे जे त्यांना देवाच्या पाचारणास पूर्ण करण्यापासून रोखते.
"तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे;.... ." (इब्री. १२:१-२)
विचलन विरुद्ध वळणे
विचलन आणि दैवी वळणांमध्ये फरक करणे हे महत्वाचे आहे. कधीकधी, आपण ज्यास विचलन असे पाहतो- 'अनपेक्षित परिस्थिती किंवा 'दैवी मध्यस्थी' हे कदाचित परमेश्वर आपल्याला वाढ, शिकवण किंवा खोलवरील प्रकटीकरणाच्या हंगामात नेणारा असू शकतो.
योसेफाची आठवण करा, ज्याने असंख्य वळणांना तोंड दिले –खड्ड्यापासून ते तुरुंगापर्यंत-राजवाड्यातील त्याच्या दैवी नियुक्तीपूर्वी. अनेक टप्प्यांवर, तो त्याच्या परिस्थितीला विचलन म्हणून पाहू शकला असता; परंतु त्याने विश्वासू राहण्याची निवड केली, वळणांना संधीमध्ये बदलले.
"माणूस बऱ्याच योजना आखतो. पण फक्त परमेश्वराच्याच योजना प्रत्यक्षात येतात" (नीतिसूत्रे १९:२१)
विचलनांना सरळ हाताळणे
पारखद्वारे शस्त्रबद्ध होऊन, कसे, मग, आपण विचलनांना हाताळावे?
१. प्राधान्य द्या:
कोणतेही उद्धिष्ट किंवा कार्य संपुष्टात आणण्यास सुरुवात करण्यापूर्वी, देवाचे मार्गदर्शन प्राप्त करा. त्याची इच्छा समजा आणि त्यानुसार प्राधान्य द्या. "तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील." (मत्तय ६:३३)
२. सीमा निर्माण करा:
तुमच्या जीवनात संभाव्य विचलन ओळखा आणि सीमा स्थित करा. याचा अर्थ प्रार्थनेसाठी विशेष वेळ स्थिर करणे असू शकते, अनावश्यक सामाजिक भेटी कमी करणे किंवा पवित्र शास्त्र वाचताना मेसेज संपर्क बंद करणे. "सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे." (नीतिसूत्रे ४:२३)
३. जबाबदार राहा:
भरवशाचा मित्र किंवा शिक्षकाला तुमचे ध्येय आणि योजना सांगा. त्यांना ते तपासू द्या आणि याची खात्री करू द्या की तुम्ही योग्य मार्गावर आहात. "तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो." (नीतिसूत्रे २७:१७)
नेहमी लक्षात ठेवा, विचलनाचे वारे हे शक्तिशाली आणि सतत मारा करेल, परंतु ख्रिस्तामध्ये आपला नांगर आणि पवित्र शास्त्रातील ज्ञान आपल्याला स्थिर ठेवेल. प्रवासाला स्वीकारा, विचलनांना ओळखा आणि शक्तिशाली व्हा की चांगल्यासाठी 'नाही' म्हणावे जेव्हा देव तुम्हांला काहीतरी उत्तमतेसाठी बोलवत आहे. देवाबरोबरच्या आपल्या चालण्यात, केंद्रित राहणे हे केवळ एक शिस्तबद्धपणा नाही, तर ती भक्ती आहे.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, जीवनाच्या घोंघावणाऱ्या विचलनांमध्ये, तुझ्या अविचल प्रेमात आणि वचनात आमच्या आत्म्याला स्थिरता दे. तुझ्या दैवी मार्गावर आमचे लक्ष केंद्रित कर आणि आम्हांला समर्थ कर की उद्देश आणि आवेशाने प्रत्येक क्षणाला स्वीकारावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● बोललेल्या शब्दाचे सामर्थ्य
● तुमच्या प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारिक पायऱ्या
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● शोधण्याची आणि सापडण्याची कथा
● गुप्त गोष्टी समजून घेणे
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या