डेली मन्ना
आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
Saturday, 7th of October 2023
23
17
904
Categories :
येशूचे दाखले
विचलन
मार्क ४:१३-२०मध्ये, येशू एक गहन दाखला सांगतो जे देवाच्या वचनाच्या विविध प्रतिक्रियांची रूपरेखा पुरवते. जेव्हा आपण या वचनांचा अभ्यास करतो, हे स्पष्ट आहे की विचलन, हे विविध प्रकारांत, एक सर्वात प्रमुख गुन्हेगार आहे जे आपल्या आध्यात्मिक वाढीला अडथळा करते.
प्रभू येशूने हे स्पष्ट करत सुरुवात केली, "शेतकऱ्याने वचन पेरले (मार्क ४:१४). हे वचन सत्य आहे, सुवार्ता, देवाचे अगदी जीवन-देणारे अभिवचन आहे. तथापि, या पेरण्याचा परिणाम हा आपण अपेक्षा करू इतका नेहमीच फलदायक उत्पन्न असू शकत नाही.
हिरावून घेतलेले वचन:
"वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो" (मार्क ४:१५). आपण कितीतरी वेळा संदेश ऐकतो, आपल्या अंत:करणात स्पर्शाची जाणीव करतो, आणि आपण फक्त घरी पोहचेपर्यंत त्याचे सार विसरून जातो? शत्रू हा नेहमी-लक्ष ठेवून आहे, सत्याचे कोणतेही प्रतिक हिरावून घेण्यास वाट पाहत असतो जे आपल्या अंत:करणात प्रवेश करत असते.
वर-वरचे वचन:
"तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात" (मार्क ४:१६-१७). उपासना सभेदरम्यान किंवा आध्यात्मिक सभेच्या वेळी भावनात्मकदृष्ट्या उत्साहाने भरून गेलेले वाटणे हे असामान्य नाही. तरीही, ख्रिस्तामध्ये खोलवर मुळावलेले असल्याशिवाय, हा आनंद क्षणिक असू शकतो. जेव्हा आव्हानांना सामोरे जातो, तेव्हा आपला विश्वास डळमळीत होऊ शकतो. जसे यशया ४०:८ म्हणते, "गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते." विश्वास जो भक्कम राहतो हा तो आहे जो देवाच्या शाश्वत वचनात खोलवर रुजलेला आहे.
गुदमरलेले वचन:
हे अशा ठिकाणीच विचलन त्याची सर्वात विनाशकारक भूमिका पार पाडते. "व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते" (मार्क ४:१९). विचलन हे नेहमीच भव्य किंवा चकाकणारे नसतात. ते "या जगाची काळजी किंवा "संपत्तीची फसवणूक" सारखे सूक्ष्म असू शकतात. हे कदाचित देवाच्या मान्यतेवर सांसारिक प्रमाणीकरणाचा मूक प्रयत्न असू शकेल. नीतिसूत्रे २३:४ चेतावणी देते, "धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव."
ऐम्पलीफाईड पुढे आणखी स्पष्टीकरण देते विचलन असे दर्शविते, "सुखविलास आणि आनंद आणि खोटे सौदर्य आणि संपत्तीची फसवणूक आणि इतर गोष्टींची लालसा आणि उत्कट इच्छा" (मार्क ४:१९). जेव्हा ह्या इच्छा आत शिरतात, तेव्हा त्या आपल्या आध्यात्मिक वाढीला गुदमरवतात. १ योहान २:१५-१७मध्ये आपल्याला आठवण दिली आहे, "जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो."
फलदायक वचन:
तरीही, सर्व आशा गमावलेली नाही. येशूने त्यांच्याविषयी बोलले, "चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात; मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात" (मार्क ४:२०). किल्ली येथे ही चांगली जमीन आहे. एक तयार अंत:करण, नम्रता आणि प्रार्थनेने नांगरलेले, केवळ ऐकण्यास तयार नाही तर ते स्वीकारण्यास आणि वचनानुसार कार्य करण्यास.
विचलनांवर प्रभुत्व मिळवणे
याकोब ४:७-८ सुचना देते, "म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंत:करणे शुद्ध करा." विश्वासासाठी हा एक सक्रीय दृष्टीकोन आहे. विचलनांना ओळखून व प्रतिकार करण्याने, आणि देवाजवळ येण्याने, आपण चांगल्या जमिनीसारखे होतो, सुपीक आणि फळ उत्पन्न करण्यास तयार.
इब्री. १२:२ मधील वचनाचे पालन करू, "आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला; आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे." विचलनाने भरलेल्या जगात, आपले डोळे ख्रिस्त, जो आपली शाश्वत आशा आणि तारण यावर स्थिर राहू दे.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, जीवनाच्या कोलाहलात, तुझ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आमच्या हृदयाला मार्गदर्शन कर. आमचा निश्चय बळकट कर, सर्व विचलन उखडून टाक आणि आम्हांला तुझ्यामध्ये खरा हेतू शोधू दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अपराध-मुक्त जीवन जगणे● बी बद्दल आश्चर्यकारक सत्य
● अडथळ्यांवरमात करण्याचे व्यवहारिक मार्ग
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● दानधर्म करण्याची कृपा-२
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे# २
● मनुष्यांची परंपरा
टिप्पण्या