english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. मानवी भ्रष्टतेमध्ये देवाचा अपरिवर्तनीय स्वभाव
डेली मन्ना

मानवी भ्रष्टतेमध्ये देवाचा अपरिवर्तनीय स्वभाव

Sunday, 8th of October 2023
13 13 1557
जीवन आपल्याला अगणित आव्हाने, नातेसंबंध आणि अनुभव देते, आणि ह्यांमध्ये लोकांबरोबरची भेट आहे जे प्रभूच्या मार्गाचे अनुसरण करण्याचा दावा करतात. ह्यांपैकी काही व्यक्ति आपल्याला प्रेरित करतात, आणि आपल्या निर्माणकर्त्याजवळ नेतात. तरीही इतर, दु:खदपणे, कदाचित चुकीचे मार्गदर्शन करतात, निराश करतात किंवा आपला विश्वासघात देखील करतात. निराशेच्या ह्या क्षणांमध्ये, पायाभूत सत्याचे स्मरण करणे हे महत्वाचे आहे: लोक अयशस्वी होतात, पण देव नाही.

"कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही; म्हणून याकोबवंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाहीत." (मलाखी ३:६)

वरील वचनात, देव त्याचा अपरिवर्तनीय स्वभाव घोषित करतो. जगाच्या विसंगती आणि अनिश्चिततेमध्ये हा एक दिलासादायक विचार आहे, की परमेश्वर हा अपरिवर्तनीय असाच राहतो. त्याचे चारित्र्य, प्रीती आणि अभिवचने कायम राहतात.

देवाचे अनुसरण करण्याचा दावा करणाऱ्यांच्या वर्तनाच्या आधारे देवाच्या चरित्राचा न्याय करणे ही एक गंभीर चूक आहे. याचा विचार करा: जर तुम्हांला पाण्याच्या एका थेंबावर आधारित संपूर्ण महासागराचा न्याय करावा लागला तर तुमचा दृष्टीकोन हा अत्यंत मर्यादित आणि चुकीचा असेल. त्याचप्रमाणे, काही लोकांच्या कृतींवर आधारित देवाचा न्याय करणे हा एक चुकीचा प्रयत्न आहे.

स्तोत्र. १४६:३ मध्ये, असे लिहिलेले आहे, "अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही." हे वचन एक सौम्य स्मरण आहे की आपला भरवसा हा प्रामुख्याने केवळ मनुष्यावर आधारित नसला पाहिजे तर देवावर.
 त्याचवेळेस, लोक, त्यांची प्रतिष्ठा किंवा पदव्या काहीही असो, चुकू शकतात, पण देव स्थिर राहतो.

जेव्हा प्रभू येशू पृथ्वीवर चालला, तेव्हा त्याने आपल्याला देवाचे परिपूर्ण प्रतिनिधित्व दाखवले. जरी, त्याने त्याच्या स्वतःचा व्यक्ति, यहूदा इस्कार्योतद्वारे विश्वासघात अनुभवला. योहान २:२४-२५ मध्ये त्याने म्हटले, "पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता; शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते." येथे येशू दोषपात्र स्वभाव स्वीकारतो, तरीही तो आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो.

जर येशू, देवाचा पुत्र, त्यास त्याच्या सभोवती असलेल्यांमध्ये दोषीपण ओळखण्याची पारख होती, तरीही त्यांजवर सतत प्रीती केली आणि शिकवले आणि त्यांच्यासाठी बलिदान केले, तर आपण यापेक्षा कितीतरी अधिक प्रोत्साहित झाले पाहिजे की मानवी वर्तणुकीच्या अप्रत्याशित लाटांनी बदलण्यापेक्षा आपला विश्वास देवावर स्थिर ठेवला पाहिजे.

म्हणून मग आपण आपल्या भावनांना कशी दिशा दिली पाहिजे जेव्हा कोणीतरी जो देवाचे अनुसरण करणारा आहे तो आपल्याला पतनाकडे नेतो?

१. समजून घेण्यासाठी देवाजवळ या:
जेव्हा आपण अपमानित किंवा निराश होतो, तेव्हा देवाच्या उपस्थितीकडे झुकणे हे महत्वाचे आहे. जसे स्तोत्र. ११९:१०५ मध्ये उल्लेखले आहे, "तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे." त्याचे वचन स्पष्टता, शहाणपण आणि मार्गदर्शन प्रदान करेल.

२. क्षमा करत राहा:
कटुता किंवा राग धरून राहिल्याने आपल्या आत्म्याला विषारी करू शकते आणि देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधात अडथळा आणू शकते. लक्षात घ्या, जसे प्रभूची प्रार्थना आपल्याला स्मरण देते, "आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड." (मत्तय ६:१२)

जेव्हा देवाचे अनुसरण करण्याचे दावा करणारा कोणीतरी त्याचे चुकीचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा वेदना आणि निराशा होणे स्वाभाविक आहे, चला आपण काळजी घ्यावी की मोठ्या चित्रावरून आपली नजर हटवू नये. मानवाच्या अपूर्णतेने आपल्याला परिपूर्ण देवापासून दूर नाही नेले पाहिजे. त्याऐवजी, त्याने आपल्याला त्याच्याजवळ नेले पाहिजे, त्याचे न बदलणारे प्रेम, कृपा आणि ज्ञानाचा धावा करण्यास.
अंगीकार
मी आदेश देतो आणि घोषणा करतो की न मृत्यू, न जीवन, न देवदूत, न अधिपती, ना वर्तमानकाळच्या गोष्टी ना भविष्यकाळच्या गोष्टी, न शक्ती, न उंची न खोली, आणि संपूर्ण सृष्टीमध्ये काहीही नाही, जी आपल्याला ख्रिस्त येशू आपला प्रभू यावरील देवाच्या प्रीतीपासून वेगळे करण्यास समर्थ होणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● बारा मधील एक
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● नवीनजीव
● काही पुढाऱ्यांचे पतन होते याकारणामुळे आपण माघार घेतली पाहिजे काय?
● त्याच्या ध्वनिलहरींच्या कंपनासह लयबद्ध होणे
● संपन्नतेसाठी विसरलेली किल्ली
● दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन