शुभवर्तमानामध्ये आपल्याला बाप्तिस्मा-देणाऱ्या योहानाच्या जीवनातून नम्रता आणि सन्मानाची गहन कथा आढळते. योहान ३:२७मध्ये, देवाच्या राज्याच्या संस्कृतीबद्दल विस्तीर्ण प्रमाणात बोलणारा क्षण वेधला आहे. योहान, वादाच्या भोवऱ्यात आपल्या शिष्यांशी बोलताना, सखोल शहाणपणाचे शब्द “मनुष्याला स्वर्गातून काहीही मिळाल्याशिवाय त्याला काहीही प्राप्त होत नाही” हे उच्चारतो. ही साधी पण प्रगल्भ स्वीकृती देवाच्या राज्याच्या आंतरिक मुल्यांवर चर्चा करण्यासाठी मंच स्थित करते: नम्रता आणि सन्मान.
देवाचे राज्य तत्वांवर चालते जे बहुतेक वेळेला जगाने साजरे केलेल्या मूल्यांच्या विरुद्ध असतात. हे ते राज्य आहे जेथे शेवटले ते पहिले होतात (मत्तय २०:१६), आणि पुढारी सेवा करतात (मत्तय २०:२६-२८). बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने जेव्हा स्वतःपासून ख्रिस्ताकडे लक्ष वळवण्याचे निवडले तेव्हा या संस्कृतीचे उदाहरण दिले, हे दर्शवत की खरी नम्रता म्हणजे स्वतःबद्दल कमी विचार करणे नव्हे तर स्वतःला कमी समजणे.
आजच्या काळात, नम्रतेला अनेकदा चुकून दुर्बलता किंवा महत्वाकांक्षेचा अभाव म्हणून पाहिले जाते. तथापि, पवित्र शास्त्रानुसार नम्रता ही एक शक्ती आहे जी आपले देवावर विसंबून राहणे आहे हे ओळखते. नीतिसूत्रे २२:४मध्ये हे चांगलेच वेधले आहे, जे म्हणते, “नम्रता व परमेश्वराचे भय ह्यांचे परितोषिक धन, सन्मान व जीवन होय.” जेव्हा आपण हे ओळखतो की प्रत्येक बक्षीस आणि दान हे वरून आहे (याकोब १:१७), तेव्हा आपण आपले यश आणि अपयश देवाच्या सार्वभौमत्वाच्या प्रकाशात पाहू लागतो आणि स्पर्धा सहकार्याला मार्ग देते.
येशूचा अग्रदूत म्हणून योहानाची भूमिका महत्वाची होती. तरीही, अनुयायांसाठी येशूशी स्पर्धा करण्याच्या निवडीचा सामना करताना, त्याने त्याऐवजी त्याचा सन्मान करणे निवडले. योहानाचे जीवन पवित्र शास्त्रासाठी साक्ष असे होते, जे म्हणते, “त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा हे अवश्य आहे” (योहान ३:३०). हे राज्याच्या सन्मानाचे सार आहे- इतरांना वर उचलणे, कधीकधी आपल्यापेक्षा मोठे देखील, कारण देव लिहित असलेल्या भव्य कथनातील आमची भूमिका आम्हांला समजते.
ख्रिस्ताच्या शरीरात प्रत्येक सभासदांना अद्वितीय कार्य आहे (१ करिंथ. १२:१२-२७). जेव्हा शरीराच्या एखाद्या अवयवाचा सन्मान होतो, तेव्हा प्रत्येक अवयव आनंदित होतो. ही खरी नम्रता आहे-दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद करणे जसे काही ते आपले स्वतःचे आहे. आपले डोळे येशूवर स्थिर करून, जो आपल्या विश्वासाचा निर्माता आणि पूर्ण करणारा आहे (इब्री. १२:२), आपण स्पर्धा करण्याच्या आग्रहाचा प्रतिकार करू शकतो आणि त्याऐवजी त्याच्या राज्याच्या विस्तारासाठी सहयोग करू शकतो.
जेव्हा आपण आपल्या स्वतःला ख्रिस्तामध्ये रुजवतो, जसे कलस्सै. २:१९ आग्रह करते, “देवाकडून येणाऱ्या वाढीसह आपण वाढतो. नम्र राहण्याची कृपा आणि प्रामाणिकपणे इतरांचा सन्मान करण्याची क्षमता हे येशूसोबतच्या कायमस्वरूपी नातेसंबंधात आहे. ही एक निष्क्रिय नम्रता नाही जी कर्तुत्वापासून दूर राहते परंतु एक सक्रीय नम्रता आहे जी सर्व आशीर्वादांचे स्त्रोत ओळखते.
प्रारंभीचे चर्च आपल्या कृतीत नम्रतेचे एक सुंदर चित्र देते. प्रेषित ४:३२ आपल्याला सांगते की, असंख्य विश्वासणारे हे एकदिलाचे व एकजिवाचे होते. त्यांच्यामध्ये तेथे कोणीही गरजू व्यक्ती नव्हता कारण त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी सामायिक केल्या होत्या. त्यांच्या नम्रतेमुळे त्यांच्यामध्ये एकता आणि सन्मानाची भावना निर्माण झाली जी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची एक शक्तिशाली साक्ष होती.
या सत्यावर आपण विचार करत असताना, आपण आपल्या मार्गांचा विचार करू या. आपण परस्परांना जेथे पूर्ण केले पाहिजे तेथे स्पर्धा करत आहोत का? आपण स्वतःसाठी सन्मान शोधत आहोत की आपण देवाचा आणि इतरांचा सन्मान करू पाहत आहोत?
प्रार्थना
पित्या, तुझ्या राज्यात नम्र आणि सन्माननीय होण्यासाठी मला मदत कर. जसे तू मला पाहतो तसे मला स्वतःला पाहण्यास आणि जसे तू इतरांची किंमत करतो तसेच त्यांची किंमत करण्यासाठी मला मदत कर. माझे जीवन तुझ्या राज्याचा आणि तुझ्या मुल्यांचा साक्षीदार होवो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?● पापी रागाचे स्तर उघडणे
● पैसे कशा साठी नाही
● त्यांनातरुणच असे पकडावे
● उपासने साठी इंधन
● महान पुरस्कार देणारा
● दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या