english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. येशूने गाढवावर स्वारी का केली?
डेली मन्ना

येशूने गाढवावर स्वारी का केली?

Saturday, 11th of November 2023
21 16 1183
Categories : Honour Prophecy
३७ तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, ३८ ‘प्रभूच्या नवाने येणारा’ राजा ‘धन्यवादीत असो;, स्वर्गात शांती, आणि उर्ध्वलोकी गौरव.” (लूक १९:३७-३८)

लूक १९:३७-३८ मध्ये दृश्य स्थित केले गेले, जेव्हा येशू यरुशलेमेकडे जाऊ लागला, युद्धातील घोड्यांच्या गडगडाटाने नव्हे गाढवाच्या पायाच्या सौम्य चालीने. हा महत्वाचा क्षण, झावळ्याचा रविवार म्हणून साजरा केला जातो, ते आपल्या चिंतनाला सुरु करते, “येशूने गाढवावर स्वारी का केली?

प्रथम, येशूने जुन्या करारातील जखऱ्याच्या पुस्तकातील भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी यरुशलेमेत जाण्यासाठी गाढवावर स्वारी केली. “सीयोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व त्याच्या ठायी तारण आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.” (जखऱ्या ९:९)

गाढव, शांतताप्रिय प्राणी, घोड्याशी, युद्धाच्या घोड्याशी तीव्र विरोधात आहे. येशूची निवड मुद्दाम आहे; तो स्वतःला एक वेगळ्या प्रकारचा राजा म्हणून सादर करतो, जो तलवारीने नव्हे तर बलिदानाने तारण आणतो. योहान १२:१५ नम्रतेच्या ह्या प्रतिमेचा पुनरुच्चार करते, येशूचे राज्य या जगाचे नाही या संदेशाला बळकटी देते.
सामर्थ्याच्या थाटाने परिचित असलेल्या जगात, येशू अपेक्षांना भंग करतो. त्याने त्या डोंगराची निवड केली जे त्याच्या सेवाकार्याबद्दल बोलते: देव आणि मानवतेमध्ये शांती आणावी. यशया ९:६ ने येणाऱ्या शांतीच्या राजकुमारविषयी भविष्य केले होते, आणि येथे येशू ती उपाधी पूर्ण करतो, नगरात प्रवेश करतो त्यावर वर्चस्व करण्यासाठी नव्हे तर तिची सुटका करण्यासाठी.

लोकसमुदायाचे कृत्ये-वस्त्रे आणि झावळ्या पसरणे-ते आदराचे चिन्ह होते, येशूला ज्याची मसीहा म्हणून वाट पाहत होते त्यास स्वीकारणे होते. मत्तय २१:८-९ लोकांच्या उत्कट आशेचा वेध घेते, त्यांचा आवाज होसान्नाच्या सुरात उंचावतो, येशूमध्ये सुटकेची पहाट ओळखतो.

“यहूद्यांचा राजा” या उपाधीचे येशूचे स्वीकारणे हे महत्वपूर्ण आहे. शिंगरावर बसून, तो नेतृत्वाची मोठी जबाबदारी स्वीकारतो, परंतु ते सेवा आणि शरण जाऊन परिभाषित केलेला राजेशाहीपणा आहे. मार्क १०:४५ याची पुष्टी करते, “कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे.”

ज्या शिंगरावर कोणी बसलेले नाही हे तपशीलवार सांगणे केवळ माहिती नाही; ते काहीतर पवित्र म्हणून सूचित करते. प्राचीन काळात, एक प्राणी ज्यास अजून सामान्य कामात वापरलेले नाही तो एका पवित्र उद्देशासाठी योग्य मानत होते. अशा शिंगराला निवडण्याद्वारे, येशू वधस्तंभाकडे जाणारा त्याचा मार्ग पवित्र अर्पण म्हणून पवित्र करत होता, देवाच्या मुक्तीच्या कार्यासाठी वेगळा केलेला.
येशूच्या मिरवणुकीत, अधिकार आणि सामर्थ्याच्या जगाच्या व्याख्यांमध्ये आपल्याला स्पष्ट फरक आढळतो. त्याचे राज्य जबरदस्तीने किंवा भीतीने वाढत नाही तर प्रीती आणि नम्रतेने. मत्तय ५:५ नम्र जणांस आशीर्वादित करते, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल, एक धन्य वचन जे स्वतः येशूने साकारले आहे.

 ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून, आपल्याला आपल्या राजाच्या नम्रतेचे अनुकरण करण्यासाठी पाचारण केले आहे. आपले जीवन समर्पित करणे जसे त्याने त्याचे जीवन समर्पित केले, वधस्तंभ उचलणे जसे त्याने वधस्तंभ उचलला. गलती. ५:२२-२३ आत्म्याच्या फळाविषयी बोलते, ज्यामध्ये एक सौम्यपणा आहे, यरुशलेमेत ख्रिस्ताच्या प्रवेश करण्याद्वारे त्या गुणाच्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे.

प्रभू येशूचे गाढवावर बसणे नम्रतेत आढळणाऱ्या वैभवाचे चिरस्थायी प्रतिक म्हणून स्थिर आहे. हे आपल्याला सत्ता मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांवर पुनर्विचार करण्यास, आणि आपल्या तारणकर्त्याच्या सौम्य सामर्थ्याने चिन्हांकित जीवन स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते.
प्रार्थना
प्रभू येशू, आमच्या नम्र राजा, तुझ्या शांतीच्या पावलांनुसार चालण्यास आम्हांला शिकव. आम्ही तुला धुमधडाक्याने नव्हे तर विश्वासूपणाने सन्मान द्यावा, स्तुतीच्या मिरवणुकीत तुझ्यासमोर आमच्या जीवनाच्या शाखा पसराव्या असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● वचनामध्ये ज्ञान
● येशूला पाहण्याची इच्छा
● देवाच्या समर्थ हाताच्या पकडीत
● तुम्ही आणि मी देवाची स्तुति का केली पाहिजे?
● तुमची प्रतिक्रिया काय आहे?
● तुमचा कमकुवतपणा परमेश्वराला दया
● अप्रसिद्ध नायक
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन