डेली मन्ना
दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Tuesday, 12th of December 2023
47
33
1274
Categories :
उपास व प्रार्थना
सैतानी मर्यादांना मोडणे
“फारो म्हणाला, ‘तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव ह्याला यज्ञ करावा ह्यासाठी मी तुम्हांला जाऊ देतो; मात्र फार दूर जाऊ नका; माझ्यासाठी विनवणी करा.” (निर्गम ८:२८)
आजच्या दिवसासाठी पवित्र शास्त्र प्रकट करते की इस्राएली लोकांना फारो द्वारे गुलाम म्हणून धरून ठेवण्यात आले होते, ज्याने त्यांच्यावर मर्यादा घालून दिल्या होत्या आणि आणि ही घोषणा केली होती की त्यांनी फार दूरवर जाऊ नये. दुर्दैवाने पुष्कळ ख्रिस्ती लोक त्यांच्या जीवनावरील सैतानी मर्यादांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ असतात.
सैतानी मर्यादा का?
सैतानी मर्यादा एक व्यक्ती, ठिकाण किंवा एखाद्या गोष्टीवर ठेवल्या जातात. ते त्या व्यक्तीकडे चांगल्या गोष्टी येण्यापासून रोखते. हे सैतानी कार्य व्यक्तीची प्रगती थांबवू किंवा सावकाश देखील करू शकते.
नेहमीच हे लक्षात ठेवा की सैतानाच्या योजनांपासून आपण अज्ञानी नाही (२ करिंथ २:११). तसेच, ख्रिस्त प्रकट झाला जेणेकरून सैतानाची कार्ये कदाचित नष्ट केली जावीत (१ योहान ३:८). म्हणूनच, जेव्हाजेव्हा आपण सैतानाच्या कार्याबद्दल बोलतो, तेव्हा तेव्हा हे सैतानाला मोठे करण्याबद्दल नाही तर त्याऐवजी ख्रिस्ती लोकांना त्याबद्दल अवगत करावे आणि त्यास नष्ट करण्याबद्दल आहे.
आज, येशूच्या नावाने, कोणतीही सैतानी मर्यादा तुमचे कार्य, आरोग्य, कुटुंब किंवा जीवनाच्या प्रतिष्ठेवर परिणाम करत असेल तर तिला विखरून टाकण्यात येईल.
सैतानी मर्यादांचे ३ मुख्य प्रकार
१. वैयक्तिक मर्यादा
हे तेव्हा घडते जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रतिकार केला जातो. ही मर्यादा स्वयं-घातलेली (अज्ञानीपणामुळे) किंवा सैतानी शक्तींद्वारे जबरदस्ती केलेली असू शकते.
भारताच्या दुसऱ्या एका राज्यात सुवार्ता कार्यक्रमासाठी एक माणूस एकदा एका सहलीमध्ये सामील झाला होता. आम्ही आतमध्ये प्रवेश करणे आणि इतर औपचारिकता पूर्ण केली होती आणि मग विमानात बसण्यासाठी वाट पाहत होतो. ज्यावेळेस विमानात बसण्याची वेळ आली होती, तेव्हा लगेचच या माणसाला श्वसनाचा त्रास होऊ लागला, आणि त्याला काहीतरी घडू लागले होते. आम्ही त्याला त्याच्या पत्नीबरोबर मागे सोडले, ज्यांचे साहाय्य काही व्यवसायिक वैद्यकीय व्यक्तींद्वारे केले जात होते आणि आम्ही विमानात जाऊन बसलो. तो एक लहानसा प्रवास होता आणि जेव्हा आम्ही विमानातून खाली उतरलो, तेव्हा मी लगेचच तो कसा आहे याची विचारपूस करण्यासाठी त्याच्या पत्नीला फोन केला. मला आश्चर्य वाटले, कारण त्याने फोन घेतला आणि म्हणाला, ‘जेव्हा विमान वर उडाले त्याचवेळेस मला बरे वाटू लागले.
आमच्या एका सुटका करण्याच्या सभेदरम्यान, या माणसाची पूर्णपणे सुटका झाली. देवाच्या आत्म्याने प्रकट केले की त्याच्या संपूर्ण वंशातून आतापर्यंत कोणीही विमानाने प्रवास केला नव्हता, आणि त्याच्या जीवनावर तशी सैतानी मर्यादा ठेवलेली होती.
२. सामुहिक मर्यादा
ही मर्यादा लोकांच्या गटावर ठेवलेली असते, जसे, एखादे कुटुंब, गाव, शहर किंवा एखादया राष्ट्रावर देखील. “त्यानंतर अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपले सर्व सैन्य एकत्र करून शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा घातला. तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली होती.” (२ राजे ६:२४-२५)
उत्तर भारतातील पर्वतांमध्ये वसलेले एक छोटेसे गाव, तेथील उत्साही संस्कृतीसाठी आणि कुशल कारागीरांसाठी प्रसिद्ध होते. तथापि, त्यांच्याजवळ वरदाने असतानाही, गावकरी आपली कलाकुसर त्यांच्या सीमेपलीकडेपर्यंत विकू शकतील असे दिसत होते. गावातील एका ख्यातनाम व्यक्तीने विरोधी शहरापासून (जे युद्धात पराभूत झाले होते) मिळालेल्या प्राचीन शापाबद्दल बोलले, त्यामुळे बाहेरील जगात पोहचण्यापासून त्यांच्या प्रगतीला अडथळा करत होते.
वर्षानुवर्षे, गावातील सणात त्यांच्या अविश्वसनीय कलाकुसरींच्या वस्तूंचे प्रदर्शन केले जात असे. तरीही, कुशल कारीगर त्यांच्या स्थानिक बाजारापर्यंतच मर्यादित होते, अदृश्य अडथळा मोडण्यास असमर्थ होते ज्याने त्यांच्या प्रगतीला अडथळा केला होता जोपर्यंत या गावात प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता प्रसारित झाली नव्हती. अशा प्रकारच्या सामुहिक मर्यादा केवळ आर्थिक प्रगतीला अडथळा करीत नाही तर समाजातील प्रगतीचा उत्साह आणि अपेक्षांवर देखील मर्यादा आणत असतात.
३. वित्तीय किंवा आर्थिक मर्यादा
वित्तीय मर्यादांच्या लक्षणात बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक कर्जात बुडलेले आणि संकटे समाविष्ट असतात.
नाविन्यपूर्ण कल्पना आणि बदलाची आवड असलेल्या तरुण उद्योजकाच्या प्रकरणाकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. तरीही, त्याने सुरु केलेला प्रत्येक उपक्रम खऱ्या अर्थाने सुरु होण्याआधीच कोसळल्यासारखा वाटत असे. कर्ज वाढत असे, गुंतवणूक करणारे शेवटच्या क्षणाला माघार घेत असत बाजारातील अनपेक्षित चढउतार त्याच्या सर्वोत्तम प्रयत्नांना सतत कमी करत असे.
हे जसे काही त्याच्या आर्थिक स्थिरतेला केवळ सामान्य आर्थिक दबावामुळेच आव्हान दिले जात नव्हते, तर दुर्दैवाच्या कठोर पद्धतींद्वारे त्यावर बंधन आले होते. मित्र आणि सुधारक अनेकदा त्याच्या आर्थिक अडथळ्यांचे विचित्र स्वरूप दाखवत असत, केवळ वाईट निवडी किंवा खराब वेळेच्या पलीकडे जाणारा नमुना सुचवत, त्याच्या आर्थिक क्षमतेच्या अदृश्य कमाल मर्यादेकडे इशारा करीत ज्याला खऱ्या यशासाठी संबोधित करणे आवश्यक होते. हा तरुण उद्योजक २०१७मध्ये २१ दिवसांचा उपास आणि प्रार्थना कार्यक्रमामध्ये त्यावेळी सहभागी झाला. आज, हा माणूस चांगलाच प्रस्थापित आहे आणि राष्ट्रांशी व्यापार करीत आहे.
देवाच्या सामर्थ्याने, मी आज तुमच्या जीवनावर आदेश देत आहे, तुमच्या जीवनाविरोधातील कोणत्याही सैतानी मर्यादा, येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे नष्ट केल्या जावोत.
सैतानी मर्यादांची पवित्र शास्त्रातील उदाहरणे
यहोशवा आणि इस्राएली लोक
“१ इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. २ परमेश्वर यहोशवाला म्हणाला, ‘पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत.” (यहोशवा ६:१-२)
इस्राएली लोकांना महत्वपूर्ण धक्का बसला आणि ते यरीहोला तोडू शकले नाही कारण नगराच्या वेशी बंद केल्या होत्या, आणि भिंती ह्या प्रचंड होत्या. देवाच्या साहाय्यावाचून, मर्यादा नष्ट केल्या जाऊ शकत नव्हत्या; ते सेनेच्या शक्तीपलीकडील होत्या.
२. यहूदा विरोधातील शृंगे
“आणखी परमेश्वराने मला चार लोहार दाखवले. मी विचारले, ‘ह्यांचे येथे काय काम?’ तो मला म्हणाला, ‘ज्यांनी यहूदास परागंदा करून कोणाला आपले डोके वर काढू दिले नाही ती ही शृंगे आहेत; परंतु आता त्यांना भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहूदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलले त्यांची शृंगे पाडून टाकावीत म्हणून हे आले आहेत.” (जखऱ्या १:२०-२१)
सैतानी शृंगांनी लोकांना प्रगती करण्यापासून रोखले होते; ही ती मर्यादा होती ज्याने लोकांच्या नशिबाला मर्यादित केले होते. देवाने दैवीरित्या आध्यात्मिक क्षेत्रात काय घडत आहे आणि लोक त्यांचे वित्त, आरोग्य आणि कारकिर्दीसंबंधात भौतिकरित्या संघर्ष का करत आहेत हे संदेष्ट्याला दाखवले.
दैवी प्रकटीकरणावाचून, सैतानी मर्यादांचे काम समजणे हे कठीण होऊन जाते.
प्रार्थना
तुमच्या अंत:करणातून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना मुद्दा वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच मग पुढील पायरीवर जा. प्रार्थना मुद्दे वैयक्तिक करा, आणि प्रत्येकासाठी कमीत कमी एक मिनिट दया, आणि पुढे जाण्यापूर्वी त्याने हृदयाला स्पर्श केला आहे याची खात्री करा.
१. देवाची स्तुती आणि उपासना करा. (तुमच्या उपासनेला साहाय्य करण्यासाठी काही मंत्रमुग्ध करणारे संगीत वाजवण्याचा विचार करा. स्तोत्र. १००:४)
२. माझे वित्त, आरोग्य आणि प्रगतीच्या विरोधात ठेवलेली प्रत्येक मर्यादा येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीने नष्ट केली जावो. (यशया ५४:१७)
३. माझ्या जीवनाच्या विरोधातील कोणत्याही गुप्त मर्यादा येशूच्या नावाने प्रकट कर आणि त्यांना विखरून टाक. (लूक. ८:१७)
४. येशूच्या रक्ताने, माझ्या नशिबाच्या विरोधात कार्य करणाऱ्या सैतानाच्या मर्यादांची प्रत्येक साखळी येशूच्या नावाने मी मोडून काढतो. (प्रकटीकरण १२:११)
५. प्रभूच्या आत्म्याने, माझ्या प्रगतीला बाधा करणाऱ्या सर्व अडथळ्यांना येशूच्या नावाने विखरून टाकतो. (जखऱ्या ४:६)
६. प्रत्येक चांगल्या गोष्टी माझ्यापर्यंत येण्यापासून रोखणारे प्रत्येक अडथळे, येशूच्या नावाने मी तुम्हांला आज्ञा देत आहे दैवी अग्नीद्वारे भस्म होवोत. (२ थेस्सलनीका. ३:३)
७. परमेश्वरा, थकल्यावाचून धावण्यासाठी सहनकरण्यायोग्य शक्ती माझ्यामध्ये भर, की चक्कर येऊन पडण्यावाचून येशूच्या नावाने चालत राहावे. (यशया ४०:३१)
८. अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि प्रत्येक मर्यांदांना मोडण्यासाठी येशूच्या नावाने मी दैवी शक्ती प्राप्त करतो. (फिलिप्पै. ४:१३)
९. येशूच्या रक्ताने, माझ्या प्रगतीला विरोध करणाऱ्या प्रत्येक विरोधी वेदी आणि विचित्र वाणीला मी येशूच्या नावाने शांत करत आहे. (अनुवाद २८:७)
१०. कमीत कमी १० मिनिटांसाठी मी आत्म्यात प्रार्थना करतो. (१ करिंथ. १४:२)
११. पित्या, येशूच्या नावाने मार्गाला प्रज्वलित कर आणि शत्रूच्या सापळ्यापासून माझ्या पावलांना मार्गदर्शन कर, आणि मला तुझ्या परिपूर्ण इच्छेमध्ये नेतृत्व कर. (स्तोत्र. ११९:१०५)
१२. स्वर्गीय पित्या, स्वर्गाच्या खिडक्या उघड आणि आशीर्वादाचा वर्षाव कर की त्यास सांभाळण्याएवढी जागा मिळणार नाही, येशूच्या नावाने दारिद्र्य आणि अभावाचे कंबरडे मोडून काढ. (मलाखी ३:१०)
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वैराचारास पूर्ण उपाय● प्रीतीची भाषा
● नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ (दिवस २१)
● २१ दिवस उपवासः दिवस ०३
● सार्वकालिक निवेश
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
● आत्म्याची नावे आणि शीर्षक: देवाचा आत्मा
टिप्पण्या