डेली मन्ना
दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Monday, 18th of December 2023
42
29
1308
Categories :
उपास व प्रार्थना
वैवाहिक स्थिरता, आरोग्य आणि आशीर्वाद
“मग परमेश्वर देव बोलला, ‘मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” (उत्पत्ती २:१८)
विवाह ही दैवी संस्था आहे, आणि त्याचा उद्देश हा फलदायकपणा, संगती आणि सहकार्य आहे. पालकांकडे त्यांच्या मुलांना देवाचे ज्ञान आणि मार्गात वाढवण्याची जबाबदारी आहे. ती मुले पृथ्वीवरील क्षेत्रांमध्ये देवाच्या सैनिकांसारखी आहेत. सैतानाला धार्मिक कुटुंबाचा त्याच्या राज्यावर परिणाम ठाऊक आहे, म्हणूनच ते रोखण्यासाठी त्याच्या शक्तीने तो सर्वकाही करत आहे.
“कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे,
परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो;
जे सात्विकपणे चालतात त्यांना
उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. (स्तोत्र. ८४:११)
“तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत,
तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.” (यिर्मया ५:२५)
विवाह ही एक चांगली गोष्ट आहे, आणि चांगल्या लोकांपासून चांगल्या गोष्टी राखून ठेवत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हांला चांगल्या गोष्टी नाकारल्या जातात, तेव्हा कमी साठी स्थिर होऊ नका; ही देवाची इच्छा नाही. हे एकतर तुमचे पाप किंवा सैतान कार्यरत आहे.
वैवाहिक स्थिरता आणि आशीर्वादाच्या विरोधात सैतान कोणते सामान्य हल्ले करत आहे?
१. चुकीची निवड
शमशोन हा अभिषिक्त होता, परंतु त्याने अनेक वैवाहिक चुका केल्या, ज्याने त्याच्या सेवाकार्याला बंद केले. लोक चुकीच्या कारणांसाठी विवाह करतात. चुकीची कारणे ही नेहमीच चुकीच्या जोडीदारांना आकर्षित करतील. विवाह करा कारण तुम्हांला तुमच्या जीवनासाठी देवाची इच्छा माहित आहे. चुकीच्या व्यक्तीची निवड करण्याकडे जाण्यास सैतान तुमच्यावर प्रभाव करू शकतो, सावध आणि आध्यात्मिक राहा. योग्य जोडीदार निवडणे हे शारीरिक दिसणे आणि साधनसंपत्ती मिळवण्यापेक्षा अधिक आहे. तुमच्या इंद्रियांनी तुम्ही आध्यात्मिक क्षेत्र पाहू शकत नाही; त्याने गुप्त गोष्टींना आणि तुमच्यासाठी त्याच्या सिद्ध इच्छेला उघड करण्यासाठी तुम्ही देवाच्या मुखाचा धावा केला पाहिजे. काहींना वैवाहिक जोडीदार आहेत ज्यांनी त्यांचा नाश केला आहे किंवा त्यांच्या दैवी नशिबाला रद्द केले आहे.
२. विवाह किंवा गरोदर होण्यास उशीर
“परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यंत
उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे. (नीतीसूत्रे. ४:१८)
उशीर हा आपल्या जीवनासाठी देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा आहे की आपण गौरवापासून गौरवापर्यंत चमकत, वाढत आणि सक्रीय राहावे. त्यापेक्षा काहीही कमी हे दुष्टाकडून आहे.
३. त्यांना तरुणवयात प्रशिक्षित करा
“मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतीसूत्रे २२:६)
“४तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. ५ ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!
"५वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाहीत.” (स्तोत्र. १२७:४-५)
जर पालक त्यांच्या मुलांना परमेश्वराच्या मार्गात वाढवण्यात यशस्वी झाले, तर ती मुले देवासाठी सेनापती होतील. प्रत्येक मुलांमध्ये मोठे होण्याच्या बिजाबद्दल सैतान पूर्णपणे जाणून आहे आणि तो त्यांच्या मनावर ताबा मिळवण्याचा उद्देश ठेवतो जेव्हा ते अजूनही खूपच तरुण आहेत. प्रार्थनापूर्वक तुमच्या लेकरांचे संरक्षण करा आणि त्यांच्यात योग्य मूल्य रुजविण्याची खात्री देखील करा. शाळेतील अनेक मुलांच्या मनावर सैतान आसुरी संगीत आणि सामाजिक माध्यमावर बकवाससह त्यांच्या समवयस्क साथीदारांवर हल्ला करत आहे.
जर तुम्ही तुमच्या लेकरांना केवळ सर्व शैक्षणिक आणि भौतिक तरतूद प्रदान केली, तर सैतान त्याचा लाभ घेईल. तुम्ही त्यांना अध्यात्मिकरित्या देखील प्रशिक्षित केले पाहिजे.
४. घटस्फोट
“म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.” (मार्क. १०:९)
जरी तुम्ही यशस्वीपणे योग्य व्यक्तीशी विवाह केला, तरीही सैतान घटस्पोट आणण्याचा प्रयत्न करेल. कधीकधी तो तुमच्या कुटुंबावर, दारिद्र्य, वादळे आणि रोगांनी हल्ला करेल. तो तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मध्ये गैरसमज आणि क्रोधाची ठिणगी पेटवेल. जर तुम्ही त्याच्या साधनांविषयी अवगत असाल, तर तुम्हांला त्याच्यावर प्रभुत्व मिळेल. ते जोडपे ज्यांनी घटस्पोट अनुभवला आहे त्यांनी विवाहाच्या दिवशी घटस्पोट करण्याचा हेतू कधीही ठेवला नव्हता. त्यांनी एकमेकांना प्रतिज्ञा दिल्या, “मृत्युपासून आपला वियोग होईपर्यंत .....,” पण सैतान आव्हाने घेऊन आला आणि त्यांना विभक्त केले.
५. व्यभिचार
“अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.” (२ करिंथ. २:११)
व्यभिचार हे प्रमुख अस्त्र आहे ज्याचा वापर सैतान जोडप्यांच्या विरोधात करतो. सैतान अनेक विवाहित जोडप्यांना मोहात पाडण्यासाठी एखाद्या अनोळखी स्त्री/पुरुषाचे आयोजन करतो. ज्याक्षणी जोडीदाराचे पतन होते, पुढील गोष्ट ही त्यास लपवणे होते, पुष्कळ लोक अशा कृती करत राहतात कारण उघड केल्यावाचून, त्यास थांबविणे हे कठीण होते.
देवाचा संदेष्टा जो आत्म्याच्या क्षेत्रात जोमाने कार्य करत होता त्याने एकदा म्हटले होते, “वैवाहिक जीवनात व्यभिचारासाठी मार्ग उघडणारी एक गोष्ट ही जेव्हा जोडपे अश्लील चित्रे एकत्र पाहू लागतात. ते व्यक्ती जे असे कृत्य करतात ते विवाहित जोडपे नाहीत आणि त्यांना व्यभिचाराचे कृत्य करताना पाहून घरात लैंगिक अनैतिकतेची भावना आकर्षित होते. खूपच सावधान रहा.
वैवाहिक स्थिरता, आरोग्य आणि आशीर्वादाचा आनंद कसा अनुभवावा
जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात यातना आणि संकटाचा अनुभव करत असाल, तर देव तुमच्या वैवाहिक जीवनाला व्यवस्थित करू शकतो. तसेच, जर तुम्हांला तुमच्या वैवाहिक जीवनात आशीर्वाद हवा असेल किंवा तुम्हांला वैवाहिक जीवनात स्थिर होण्याची इच्छा असेल, तर देवाचे वचन तुम्हांला पांघरूण घालते.
तर, मग कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत?
अ.] कराराची मानसिकता विकसित करा
यशया ३४:१६ नुसार, देवाने घोषणा केली की पक्षी आणि प्राण्यांना जोडीदारांची कमी होणार नाही. जर देव पक्षी आणि प्राण्यांची काळजी करू शकतो, तर तुमच्यासाठी कितीतरी अधिक करेल? पक्षी आणि प्राण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात. (मत्तय. १०:३१)
जर तुम्ही एकटेच आहात, तर विवाह हा काहीतरी आहे जो तुम्हांला पूर्ण करेल असे समजू नका. विवाह हाच शेवट आहे असे समजू नका. विवाह हा तो नाही जो तुम्हांला पूर्ण करेल; तुम्ही ख्रिस्तामध्ये पूर्ण आहात. (कलस्सै. २:१०)
ब.] प्रितीत वाढा
वैवाहिक जीवनात तुम्हांला झालेल्या कोणत्याही जखमांना प्रीती बरे करू शकते. प्रीती तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करू शकते, आणि ती तुमच्या घरात देवाच्या उपस्थितीला आकर्षित करू शकते. प्रीती सर्वात महान आहे, ती विश्वास, आशा आणि शक्तीपेक्षा महान आहे (१ करिंथ. १३:१३). वाढण्याचा एक मार्ग हा प्रीतीत वाढणे हे देवाच्या उपासनेत वेळ घालवणे आहे. जेव्हा तुम्ही असे करता, देवाची प्रीती तुमच्या हृदयात ओतली जाईल. (रोम. ५:५)
क.] चांगले चरित्र विकसित करा
“इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते.” (रोम. ५:३-४)
तुमचे चरित्र हे निश्चित करेल की तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल किंवा ते सहन कराल. वाईट चरित्र घराला तोडते आणि मुलांना समाजात अपयशासाठी अटी घालते.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१) येशूच्या नावाने, मी माझे घर आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना येशूच्या रक्ताने आच्छादित करतो. (प्रकटीकरण १२:११)
२) माझे घर, माझी मुले आणि माझ्या जोडीदारावर सैतानाच्या शक्तीला येशूच्या नावाने मोडून काढतो. (लूक. १०:१९)
३) माझे मन, जोडीदार आणि मुले यांच्या विरोधातील कोणतेही हल्ले आतापासून येशूच्या नावाने नष्ट होवोत. (यशया ५४:१७)
४) माझ्या घराला तोडणारी कोणतीही शक्ती येशूच्या नावाने मोडली जावी. (२ करिंथ. १०:३-४)
५) परमेश्वरा, माझ्या वैवाहिक जीवनाला बरे कर आणि आशीर्वादित कर. (विवाहितांसाठी) (मार्क. १०:९)
६) स्वर्गाने-निश्चित केलेला माझा जोडीदार शोधण्यापासून कोणतीही शक्ती मला अडथळा करत आहे, ती येशूच्या नावाने नष्ट केली जावी. (जीवनसाथीसाठी प्रार्थना करणाऱ्यांसाठी) (उत्पत्ती २:१८)
७) परमेश्वरा, तुझी कृपा मजवर राहो, आणि वैवाहिक जीवनात स्थिर होण्यासाठी आणि आशीर्वादासाठी येशूच्या नावाने कृपा होवो. (स्तोत्र. १०२:१३)
८) घटस्पोटाचा आत्मा, व्यभिचार आणि वाईट सवयी माझे जीवन आणि कुटुंबातून येशूच्या नावाने उपटून टाकले जावोत. (इब्री. १३:४)
९) पित्या, येशूच्या नावाने मला तुझी प्रीती, भय आणि ज्ञानात वाढण्यास मदत कर. (२ पेत्र. ३:१८)
१०) माझे वैवाहिक जीवन आणि कुटुंबाच्या विरोधातील कोणताही जादूटोणा आणि चालाखी येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे नष्ट केली जावोत. (अनुवाद १८:१०)
११) माझ्या वंशातून कोणत्याही नकारात्मक पद्धती जे आजार, रोग, घटस्पोट, वाईट सवयी, व्यभिचार आणि वैवाहिक यातना निर्माण करत आहेत त्या येशूच्या नावाने नष्ट केल्या जाव्यात. (गलती. ३:१३)
१२) वाईट कौटुंबिक पद्धतींपासून मी स्वतःला येशूच्या नावाने वेगळे करतो. (२ करिंथ. ५:१७)
१३) माझ्या पित्याच्या घराण्याला जोडणाऱ्या सैतानाबरोबरच्या कोणत्याही वंशपरंपरागत करारांना येशूच्या नावाने मी वेगळे करतो आणि त्यांस नष्ट करतो. (योहान. ८:३२)
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● स्वयं-गौरवाचा सापळा
● ख्रिस्ती लोक देवदूताला आदेश देऊ शकतात काय?
● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-१
● राज्यात नम्रता आणि सन्मान
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
टिप्पण्या