डेली मन्ना
दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
Friday, 29th of December 2023
31
25
823
Categories :
उपास व प्रार्थना
विध्वंसकारक सवयींवर मात करणे
“ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.” (२ पेत्र. २:१९)
सवयी ह्या तटस्थ आहेत; ते चांगल्या किंवा वाईट असू शकतात. चांगल्या सवयी आपल्याला अपेक्षित आणि सातत्यपूर्ण परिणाम साध्य करण्यास मदत करू शकतात. वाईट सवयी, त्या उलट, आपल्या मोठेपणाला कमी करू शकतात आणि आपल्याला विनाशाकडे नेऊ शकतात.
“मी वाईट सवयींना कसे मोडू शकतो?” “ते थांबवणे मला कठीण वाटते.” “मला ते परत करायचे नाहीत, पण मी अडकून गेलो आहे, म्हणून मी ते करत राहतो.” लोक ज्या विध्वंसकारक सवयींना सामोरे जातात त्यांपैकी ह्या काही थोड्या कठीण गोष्टी आहेत. आज देव त्या विध्वंसकारक सवयींवर तुम्हांला येशूच्या नावाने विजय मिळवून देईल.
विध्वंसकारक सवयींनी पुढील गोष्टींकडे नेले आहे:
- घर आणि वैवाहिक जीवन मोडलेले
- अकाली मृत्यू
- मद्यपान आणि मादक पदार्थ
- चोरी
- अपयश
- आरोग्यविषयक आव्हाने
- तुरुंग
- शोक आणि वेदना
- लैंगिक विकृती
लोक त्यांच्या नशिबाची पूर्तता करू नये यासाठी सैतान शक्य ते सर्व करत आहे, आणि तो वापरत असलेल्या साधनांपैकी एक म्हणजे विध्वंसक सवयी.
तुम्ही विध्वंसक सवयी मोडू शकतात, परंतु तुम्हांला पवित्र आत्म्याच्या साहाय्याची गरज आहे. त्या विध्वंसक सवयी पूर्वी देहाची कार्ये होती, परंतु तुम्ही जेव्हा फार काळ देहामध्ये चालत राहता, राक्षसी अस्तित्वासाठी दार उघडले जाईल. भुते देहाच्या कार्यावर सहज मात करू शकता, त्यामुळेच तुम्हांला सावधान राहण्याची गरज आहे.
विध्वंसक सवयींची काही उदाहरणे
१. अत्यंत राग (क्रोध)
काही लोक, जेव्हा ते रागात असतात, तेव्हा ते वस्तूंना मोडतात. ते शांत झाल्यावर, ते एकतर नवीन वस्तू विकत आणतात किंवा तुटलेल्या वस्तूला दुरुस्त करतात. कधी कधी ते टेलीव्हिजन तोडतात आणि इतर काहीही जे त्यांच्या हातात येईल. हे राक्षसी आणि विध्वंसक आहे, आणि देवाच्या साहाय्यावाचून, ते त्यास थांबवू शकत नाही.
२. अत्याधिक लैंगिक विचार
असे काही लोक आहेत जे दिवसभर लैंगिक, अनैतिक विचारांनी ग्रासलेले असतात. रात्री देखील, त्यांच्यावर अनैतिक स्वप्नांद्वारे हल्ला होतो. जर प्रकरण असे असेल, तर मग स्पष्ट होते की या व्यक्तीवर भुतांनी हल्ला केला आहे. अशी भुतें व्यक्तीची भावना व देहावर नियंत्रण करतात, त्यास तसे सतत करावयास लावतात जोपर्यंत तो तुरुंगात किंवा शवपेटीत जात नाही.
यापैंकी काही लोक ते थांबविण्याची इच्छा करतात, परंतु ते त्यांच्या भावनांचे दास बनलेले असतात. त्यांच्या मनातील आणि त्यांच्या भावनांमधील त्या भुताटकी साखळ्या तोडण्यासाठी त्यांना देवाच्या सामर्थ्याची गरज आहे.
३. धूम्रपान
जर तुम्ही टीव्ही वर जाहिराती पाहिल्या, तेथे इशारा असतो की धूम्रपान करणारे तरुण असताना मरण पावू शकतात आणि धूम्रपान करणे हे आरोग्यास धोक्याचे आहे, पण लोक तरीही त्यास विकत घेत राहतात. ते इतके व्यसनाधीन होतात की ते त्यास थांबवू शकत नाही. आपण देवासंबंधी व्यसनाधीन झाले पाहिजे, वस्तूंच्या नाही. वस्तूंचे व्यसन आपले तर्क करणे थांबवू शकते.
मद्य आणि मादक पदार्थ हे त्वरित तर्कशुद्ध मन बंद करू शकतात आणि व्यक्ति विचार न करता कार्य करू शकतात. ज्या क्षणी मन बंद केले जाते, तेव्हा भुतें त्वरित ताबा मिळवितात आणि अत्याचार करण्यासाठी मानवी शरीर व मनाचा वापर करतात. जेव्हा व्यक्ति हा मद्याच्या प्रभावाखाली नसतो आणि त्यास दोषी ठरविले जाते, तेव्हा तो दयेसाठी विनंती करतो, आणि म्हणतो, "मला धक्का देणारा भूत होता."
तुमच्या जीवनाचे परीक्षण करा, आणि तुमच्या नशिबावर आता किंवा नंतर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहा.
सवयी हया वारंवार केल्याने होतात, आणि दररोज ज्या गोष्टी तुम्ही करता त्याकडे लक्ष दिल्यावाचून, तुम्ही कदाचित नकळतपणे नकारात्मक सवयी विकसित करू शकता.
विध्वंसक सवयींना कसे मोडावे?
१. तुम्हांला पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज आहे.
"तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल." (योहान १४:२६)
पवित्र आत्मा आपला साहाय्यक आहे, आणि तो तुम्हांला त्या विध्वंसक सवयींवर मात करण्यास साहाय्य करू शकतो. एक गोष्ट जी तुम्ही करू शकता ते आत्म्यामध्ये प्रार्थना करणे आहे. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणे हे पवित्र आत्म्यास त्या परिस्थितीमध्ये प्रवेश देते.
२. प्रार्थनेच्या ठिकाणी त्या सवयींना मोडा.
" ७ मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल; ८ कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. (मत्तय ७:७-८)
३. सवयीमागील आत्म्यावर उपाय करा.
"असे ती पुष्कळ दिवस करीत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करितो की, तू हिच्यामधून निघून जा; आणि ते तत्काळ निघून गेले." (प्रेषित १६:१८)
अनेक विश्वासू लोक या विध्वंसक सवयींना गुप्तपणे लपवीत आहेत, पण अनेक जण हे मान्य करतील की येथे कमीत कमी एक विध्वंसक सवय आहे ज्याबरोबर ते संघर्ष करीत आहेत.
४. तुमची नवीन स्थिती कबुली करा.
कबुली ताब्यात आणते. तुम्ही जेव्हा तुमची कबुली बदलतात, तेव्हा ते तुमच्या जीवनात नवीन परिणामास आकर्षित करेल. तुमच्या जिभेने, तुम्ही एकतर जिवंत मारू शकता किंवा जीवन देऊ शकता.
"तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल;
तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल." (ईयोब २२:२८)
"जिव्हेच्या हाती मृत्यु व जीवन ही आहेत;
तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात." (नीतिसूत्रे १८:२१)
चुकीची कबुली नेहमीच चुकीच्या सवयींना बळ देईल.
५. तुमचे विचार बदला
"देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून हया युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया." (रोम. १२:२)
प्रथम ठिकाण जेथे बदल सुरु करावा ते तुमचे मन आहे. जर तुमचे मन हे योग्य ज्ञानाने सशक्त झाले नाही, तर ते तुमच्या कबुलीजबाब व आचरणावर परिणाम करील. तुमचे मन वचनाने नवीन करा म्हणजे तुमचे मन हे मात करण्यासाठी सशक्त केले जाऊ शकते.
६. एका नवीन सवयीची निवड करा, आणि त्यामध्ये वाढत राहा.
कधीकधी बदल हा एका रात्रीत होऊ शकतो, आणि इतर वेळेला त्यासाठी बराच वेळ लागतो. विध्वंसक सवयी मोडण्यासाठी मी सांगितलेल्या शिफारस केलेल्या चरणांशी सुसंगत राहा, कालांतराने तुम्ही बदल पाहाल.
" १७ त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. १८ चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही." (मत्तय ७:१७-१८)
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशूच्या रक्ताने, माझे नशीब नष्ट करू इच्छित असलेल्या प्रत्येक विध्वंसक सवयींपासून मी येशूच्या नावाने दूर जात आहे. (इब्री. १२:१-२)
२. कोणत्याही विध्वंसक सवयी ज्या मला अकाली मारू इच्छितात त्या येशूच्या नावाने नष्ट केल्या जातील. (स्तोत्र. ११८:१७)
३. देवाची शक्ती, येशूच्या नावाने मला विध्वंसक सवयींपासून दूर कर. (रोम. ६:१४)
४. पवित्र आत्म्याचा अग्नि, माझा आत्मा, जीव आणि शरीरामधून जा; आणि येशूच्या नावाने माझ्या जीवनातील राक्षशी ठेवा बाहेर काढून टाक. (१ करिंथ. ६:१९-२०)
५. माझ्या मनावरील अंधाराचा कोणताही बालेकिल्ला, येशूच्या नावाने तोडून टाक. (२ करिंथ. १०:४-५)
६. मी येशूच्या नावाने माझ्या जीवनातून अंधाराची कोणतीही लागवड उखडून टाकली आहे. (मत्तय. १५:१३)
७. पित्या, येशूच्या नावाने माझ्या जीवनाच्या पायास दुरुस्त कर. (स्तोत्र. ११:३)
८. येशूच्या नावाने, येशूच्या रक्ताने माझ्या रक्तातील अशुद्धता बाहेर काढून टाकली जावो. (१ योहान. १:७)
९. येशूच्या नावाने, माझ्या जीवनातील कोणत्याही नकारात्मक वर्तणूक आणि भावना सुधारण्यासाठी मला कृपा प्राप्त झाली आहे. (तीताला पत्र २:११-१२)
१०. विध्वंसक सवयींद्वारे बांधून ठेवलेल्या अंधाराच्या कोणत्याही साखळीतून मी येशूच्या नावाने स्वतःला मोकळे करतो. (गलती. ५:१)
Join our WhatsApp Channel
Most Read
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● तुमच्या नवीन वाटचालीस प्राप्त करा
● तुमचे खरे मूल्य शोधा
● उपासनेच्या चार मुख्य गोष्टी
● दयाळूपणाचे मोल आहे.
● चमत्कार करणारा परमेश्वर जो आवश्यकतेपेक्षा अधिक आहे
टिप्पण्या