डेली मन्ना
दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Monday, 1st of January 2024
20
13
456
Categories :
उपास व प्रार्थना
पूर्वजांच्या पद्धतींवर उपाय करणे
“तो त्याला म्हणाला, ‘प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनश्शे वंशात सर्वात दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.” (शास्ते ६:१५)
जेव्हा आपण आज प्रार्थनेमध्ये देवाची वाट पाहतो, तेव्हा आपण आपल्या घराण्याच्या वंशात कार्य करणाऱ्या कोणत्याही वाईट पद्धतींना ओळखले पाहिजे आणि कोणत्याही सैतानी प्रभावापासून मुक्त झाले पाहिजे. गिदोनाची देवाबरोबरची बायबलमधील भेट प्रकट करते की त्याच्या लोकांना सोडवण्यासाठी आणि आशीर्वादित करण्यासाठी त्याला कशी आज्ञा देण्यात आली होती. तथापि, तो त्याच्या पार्श्वभूमीबद्दल चिंतेत होता; तो बोलला, “माझे कुळ मनश्शे वंशात अगदी कनिष्ठ आहे ...” हे स्पष्ट आहे की गिदोनाच्या कुटुंबात, तेथे दरिद्रतेची पद्धती होती.
तुमच्या कुटुंबात तुम्ही कधी वारंवार घडणाऱ्या पद्धतींना पाहिले आहे का? कदाचित तुम्ही काही निश्चित गोष्टींना पाहिले असेल, जसे आरोग्याचे विषय, वैवाहिक जीवनात समस्या, किंवा पैशाची समस्या जे वारंवार घडत राहते. पूर्वजांच्या पद्धतींची ही चिन्हे असू शकतात ज्यांना तोडण्याची आवश्यकता आहे.
जर तुम्ही तुमच्या जीवनात, कामाच्या ठिकाणी किंवा जेथे कोठे तुम्ही जाता तेथे जर तुम्ही स्पष्ट न करण्याजोगा द्वेष आणि समस्यांचा अनुभव करत असाल, तर पूर्वजांच्या पद्धतींची ही चिन्हे असू शकतात. काही विश्वासू गोंधळात असतात कारण त्यांनी उपास केला, प्रार्थना केली आणि ज्या कशाचा ते विचार करू शकतात ते सर्व त्यांनी केले, पण समस्या ह्या वेगवेगळ्या वेळी सतत येत राहतात. ते हे समजण्यात चुकले आहे की जर त्यांच्या प्रार्थना ह्या योग्य समस्येला लक्ष्य करत नसतील तर ते अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही. योग्य दिशेमध्ये प्रार्थना करण्यास शिकणे हे महत्वाचे आहे जर तुम्हांला तुमच्या जीवनात स्पष्ट विजय पाहायचा आहे.
पूर्वजांच्या पद्धतींद्वारे एखादा ख्रिस्ती व्यक्ती प्रभावित होऊ शकतो का?
होय, पूर्वजांच्या पद्धती आणि शक्तींद्वारे एखादा व्यक्ती प्रभावित होऊ शकतो. देवाच्या वचनानुसार, एखादा ख्रिस्ती व्यक्ती पूर्वजांच्या पद्धती आणि शक्तींद्वारे प्रभावित नाही झाला पाहिजे कारण आपण नवीन जन्म होण्याने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. तथापि, काही निश्चित परिस्थिती ख्रिस्ती व्यक्तीला पूर्वजांच्या शक्ती आणि पद्धतींच्या प्रभावासाठी संवेदनाक्षम बनवू शकतात.
यापैकी काही परिस्थितींमध्ये ह्या गोष्टींचा समावेश आहेत:
१. अज्ञानता: होशेय ४:६ प्रकट करते की जेव्हा एखादा विश्वासू ख्रिस्तामधील पूर्ण कामाबद्दल, ख्रिस्तामधील त्यांचा अधिकार, आणि मुक्ती देऊन देवाने त्यांच्यासाठी जे काही विकत घेतले आहे त्याबद्दल अज्ञानी असतो, तेव्हा पूर्वजांची शक्ती त्यांच्या जीवनात कार्य करू शकते. देवाच्या लोकांचा नाश होऊ शकतो जेव्हा त्यांना ज्ञानाचा अभाव असतो. ज्ञानाचा अभाव पराभूत शक्तींना एखाद्या विश्वासणाऱ्यावर प्रभाव करू देतो.
२. पाप: यशया ५९:१-२ प्रकट करते की देव आणि विश्वासणाऱ्याच्या मध्ये पाप एक पोकळी निर्माण करते. जेव्हा एखादा विश्वासू पाप करत राहतो, पूर्वजांची शक्ती प्रभाव आणि हल्ला करण्यास शिरकाव करू शकते. सैतानाला जागा न देण्याबद्दल बायबल सल्ला देते (इफिस. ४:२७ वाचा). पूर्वजांच्या शक्तींना हल्ला करण्यासाठी पाप दार उघडते.
३. प्रार्थनाहीनता: विश्वासणाऱ्यांनी प्रार्थनेद्वारे ख्रिस्ताच्या विजयाला लागू करायचे आहे. प्रार्थना करण्यात चुकणे हे पराभूत शक्तींना विना अडथळा कार्य करू देणे आहे. याकोब ५:१६ विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन देते की कळकळीच्या प्रार्थनेत व्यस्त राहा, कारण ती सैतानाच्या कामांना प्रतिकार करण्यात प्रभावी आहे.
“२९ बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,’ असे त्या काळी लोक म्हणणार नाहीत. ३० तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दांत आंबतील. ३१ परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; ३२ परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्यांच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला.” (यिर्मया ३१;२९-३२)
पवित्र शास्त्रात तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की आता नवीन करार लागू आहे, पाल्यांकडून नवीन पिढ्यांना पूर्वजांच्या पद्धती आणि शक्ती हस्तांतरित करण्यास प्रतिबंध करतो. नवीन करार अपराधांबद्दल वैयक्तिक जबाबदारी स्थापित करतो, मिसर मधून बाहेर निघाल्यानंतरच्या जुन्या कराराच्या उलट.
दुर्दैवाने, पुष्कळ लोक पूर्वजांच्या पद्धतींपासून अज्ञानी आहेत आणि ते त्यांवर उपाय करण्यासाठी प्रार्थना करण्यास चुकतात. अज्ञानता सैतानी कार्यांना प्रेरणा देते आणि ह्या पद्धतींना ओळखणे हे महत्वाचे आहे आणि प्रार्थनेमध्ये त्यांच्यापासून मुक्त व्हावे.
म्हणून, मग आज प्रार्थना करण्यासाठी काही वेळ घ्या आणि आपल्या जीवनात कोणत्याही पूर्वजांच्या पद्धतींना प्रकट करण्यासाठी देवाला मागा ज्यांना मोडणे आवश्यक आहे म्हणजे आपण विजय आणि स्वतंत्रतेत चालू शकतो.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
तुम्ही ही प्रार्थना म्हणण्याअगोदर तुमचे घर आणि स्वतःला तेलाने अभिषेक करा.
१. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनात वारंवार घडणाऱ्या ह्या वंशपरंपरागत नकारात्मक पद्धतींना येशूच्या नावाने मी प्रतिबंधित करतो. (निर्गम २०:५-६)
२. येशूच्या रक्ताने, माझ्या आनुवंशिकता आणि रक्तात असलेले पूर्वजांच्या कोणत्याही लिखाणांना येशूच्या नावाने मी पुसून टाकतो. (कलस्सै. २:१४)
३. माझ्या कुटुंबातील मृत्यू आणि दुर्घटनेच्या प्रत्येक बालेकिल्ला येशूच्या नावाने संपुष्टात येवो. (२ करिंथ. १०:४)
४. माझ्या वंशपरंपरागत सक्रीय असणारे मृत्यू, दारिद्र्यता आणि दुर्घटनेचा प्रत्येक दूत येशूच्या नावाने नष्ट होवो. (स्तोत्र. १०७:२०)
५. माझ्या कुटुंबात शापाची प्रत्येक अव्यवस्था, घटस्फोट आणि उशीर अग्नीने, येशूच्या नावाने मोडला जावो. (गलती. ३:१३)
६. हे देवा, येशूच्या नावाने तुझे गौरव माझ्या कुटुंबात प्रकट कर. (निर्गम ३३:१८)
७. माझ्या मुळात अपयश आणि पराजित होण्याची प्रत्येक पद्धती, येशूच्या नावाने नष्ट होवो. (फिलिप्पै. ४:१३)
८. या वर्षात, दैवी साहाय्य, मोठ्या प्रमाणात साक्षी आणि आर्थिक संपन्नतेचा येशूच्या नावाने मी आनंद घेईन. (अनुवाद २८:१२)
९. माझ्या जीवनातील प्रत्येक लैंगिक दूषितपणा आणि दुर्गंधीला येशूच्या नावाने नष्ट करण्यासाठी मी अग्नी प्राप्त करतो. (१ करिंथ. ६:१८)
१०. माझ्या जीवनातील प्रत्येक सैतानी प्रभाव, येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे नष्ट केला जावा. (याकोब ४:७)
टिप्पणी: साक्ष देणे विसरू नका जेव्हा तुमची प्रगती होते. ते दुसऱ्यांना प्रोत्साहन देईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा आशीर्वाद बहुगुणीत करण्याचा खात्रीशीर मार्ग● दिवस १२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुमच्या आत्म्याची पुनर्स्थापना
● मी प्रयत्न सोडणार नाही
● येशू स्वर्गात काय करीत आहे
● गुप्त गोष्टी समजून घेणे
● मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा
टिप्पण्या