डेली मन्ना
तुमच्या आत्म्याची पुनर्स्थापना
Wednesday, 8th of February 2023
34
23
1124
Categories :
तरुण
पुनर्स्थापना
"तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांस म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका: प्रभु परमेश्वर या अस्थींस म्हणतो, पाहा, मी तुम्हांत श्वास घालितो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हांला स्नायु लावीन, तुम्हांवर मांस चढवीन, तुम्हांस त्वचेने आच्छादीन, तुम्हांत श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांस समजेल की मी परमेश्वर आहे." (यहेज्केल ३७:४-६)
याची पर्वा नाही की तुम्ही किती आशाहीन झालेले आहात, ख्रिस्तामध्ये आशा आहे. याची पर्वा नाही की तुम्ही पाप आणि व्यसनामध्ये किती बुडलेले आहात, याची पर्वा नाही की तुम्ही किती अत्याचार केलेला आहे, आणि याची पर्वा नाही की मागे वळणे हे किती कठीण झालेले आहे असे तुम्हांला वाटत आहे, माझ्याकडे तुमच्यासाठी सुवार्ता आहे, ख्रिस्तामध्ये आशा आहे. ते बलवान पुरुष आणि मोठी सेना होते ज्यांनी त्यांची प्रतिष्ठा व उद्धेश गमाविला होता. पवित्र शास्त्रात आपण पाहतो, "अस्थीं ह्या अगदी सुकलेल्या होत्या." पण देवाने त्यांस पुन्हा जिवंत केले. त्याने त्यांना नवीन मांस लावले आणि त्यांच्यामध्ये नवीन श्वास फुंकला. त्याच्या श्वासामध्ये जीवन आहे, आणि बायबल म्हणते, की ते जिवंत झाले."
म्हणून प्रोत्साहित व्हा, त्या वाणीला शांत करा जे सतत तुम्हाला सांगते की आता सर्व संपले आहे कारण तसे झालेले नाही. देवाने अजूनही तुम्हांबरोबर कार्य करण्याचे संपविलेले नाही. ना ही तो तुमच्यावर रागावला आहे. होय, तुम्ही ते गमाविले, परंतु देवाचा धन्यवाद होवो की तुम्ही हे आशेचे वचन ऐकत आहात. तुमची हृदये कठीण करू नका कारण देव तुम्हांला पुनर्स्थापित करू शकतो. म्हणून, येथे चार गोष्टी आहेत ज्या तुम्हांला करावयाच्या आहेत की तुमच्या आत्म्याला मुक्ती आणि मोकळीक आणावी.
१. त्यास तोंड दया.
तुमच्या भावनांचा नकार करू नका, आणि तुमच्या नकारात्मक भावनांसाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका. पुरुष किंवा स्त्री जे देवावर प्रीति करतात असे त्यास तोंड दया. ज्यास तुम्ही परवानगी देता ते तुम्ही कधीही बदलू शकणार नाही आणि ज्याचा तुम्ही नकार करता त्यास कधीही तोंड देणार नाही. याचा स्वीकार करा की तुम्हांला गरज आहे म्हणजे देव तुम्हांला साहाय्य करू शकेन. हे स्वीकार करा की तुम्ही निराश झालेले आहात, ढोंग करण्याचा प्रयत्न करू नका किंवा धार्मिक असण्याचे सोंग घेऊ नका. येशू काही आंधळ्या पुरुषांना भेटला आणि त्याने त्यांना विचारले की त्यांची काय इच्छा आहे. त्याची इच्छा होती की त्यांनी स्वीकारावे की ते आंधळे आहेत आणि त्यांची दृष्टी पुनर्स्थापित करण्याची गरज आहे.
२. त्याचा शोध लावा.
तुम्ही तोंड दिल्यावर, मग तुम्ही त्याचा शोध लावला पाहिजे. तुमच्या भांडणाच्या मुळावर विचार करा. हा तुमच्यावतीने गर्व होता काय? तुम्ही धार्मिक सल्ला नाकारला काय? मूळ कारण काय होते हे समजा, आणि केवळ वरवरची परिस्थिती पाहू नका. ते तुम्ही कोठे गमाविले? बायबल अलीशा व संदेष्ट्यांच्या पुत्रांची कथा सांगते. ते झाड तोडण्यासाठी गेले, आणि काहीतरी दुर्घटना झाली. २ राजे ६:४-६ मध्ये बायबल सांगते, "तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेपाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय ! स्वामी, मी ती मागून आणिली होती. देवाच्या माणसाने विचारिले ती कोठे पडली? त्याने ती जागा दाखविल्यावर अलीशाने एक लाकूड तोडून तेथे टाकिले तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. कुऱ्हाडीचे तोंड पडले होते, त्यांनी त्याचा स्वीकार केला, परंतु अलीशाने तरीही विचारले, "ती कोठे पडली?" आपल्याला ते कारण शोधण्याची गरज आहे की त्यास सोडवावे.
३. ते पुसून टाका.
कधी कधी-क्षमा मागण्याद्वारे, काही वेळेला क्षमा मागण्यासाठी तुम्ही पत्र लिहिणे किंवा सरळपणे त्या व्यक्तीला भेटू शकता –तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात अपमान पुसून टाकीत आहात. देव स्वर्गामधील कोणत्याही नोंदीमधून ते पुसून टाकील आणि तुमच्या आत्म्यामधून ते धुऊन टाकण्यास साहाय्य करील. शत्रू कदाचित प्रयत्न करेल की काही प्रसंगासाठी त्याचे स्मरण करवावे, परंतु पवित्र आत्मा तुम्हांला याचे स्मरण देईल की देवाने जे पाप विसरले आहे त्याची तुम्हाला आठवण करण्याची गरज नाही !
"मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो; मीच तो; तुझी पातके स्मरत नाही." (यशया ४३:२५)
४. ते बदलून टाका.
जुन्या प्रतिमा हया नवीन चित्रांद्वारे बदलल्या जाऊ शकतात. नवीन आठवणी बनवा. नवीन संबंध बनवा. जसे तुम्ही तुमच्या भूतकाळास मागे सोडता तसे तुमच्या जीवनात पुढे चालत राहा. हजारो पुरुष व स्त्रियांनी हया साध्या तरीही शक्तिशाली पद्धतीचे अनुसरण केले आहे आणि ख्रिस्तामधील विश्वासाने मुक्ती व सुटकेचा अनुभव केला आहे. आता ही तुमची वेळ आहे. तुम्ही एक लेकरू किंवा तरुण होता तेव्हापासूनच शत्रूने कदाचित तुम्हाला त्याचे लक्ष्य म्हणून चिन्हित केले असेन. ख्रिस्ताने तुरुंगाचे दरवाजे उघडले आहेत, परंतु तुम्ही त्या उघडया दरवाजातून चालले पाहिजे.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्यामध्ये जी आशा मला आहे त्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी तुझ्यासमोर येतो, आणि मी माझा अशक्तपणा व संघर्षाचा स्वीकार करतो. मी माझ्या जखमा उघडया करतो, आणि तुला विनंती करतो की तूं त्यावर शस्त्रक्रिया कर. मी प्रार्थना करतो की तुझा हात माझ्या आत्म्याला पुनर्स्थापित करेल आणि मला पुन्हा पूर्ण करीन. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २● २१ दिवस उपवासः दिवस १४
● मोठया संकटात
● परमेश्वर कधी चुकत नाही
● योग्य पाठपुरावा अनुसरण
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२
● लहान गोष्टी मोठ्या उद्देशांना जन्म देतात
टिप्पण्या