“बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला होता. तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते; कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.” (लूक २२:१-२)
बायबलनुसार, इस्राएली लोकांनी मिसर देशाच्या बंधनातून मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी वल्हांडण सणादरम्यान फक्त बेखमीर भाकरीच खायच्या होत्या. कारण की इस्राएली लोक घाईने निघाले होते, तेव्हा त्यांना भाकरी भाजण्यासाठी वेळ नव्हता.
बायबलमध्ये, खमीर अक्षरशः पापाशी संबंधित आहे. ज्याप्रमाणे थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते, त्याप्रमाणे पाप हे एक व्यक्ती, एक चर्च आणि एका राष्ट्रात पसरेल, शेवटी त्यावर मात करेल आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना बंधनात आणि शेवटी मृत्यूकडे नेईल. (गलती. ५:९)
वल्हांडणादरम्यान, यहूदी लोकांनी त्यांच्या घरातून सर्व खमीर बाजूला काढून टाकावी अशी अपेक्षा होती (निर्गम १२:१५), जे त्यांच्या जीवनातून पाप काढून टाकण्यास सुचविते. त्यांचे मुख्य याजक आणि शास्त्र्यांनी त्यांची घरे स्वच्छ केली होती परंतु त्यांची अंत:करणे नाहीत.
नीतिसूत्रे ४:२३ आपल्याला आठवण देते, “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.” जरी मुख्य याजक आणि शास्त्री धार्मिक विधी निर्दोषपणे करत होते, तरी ते त्यांच्या अंत:करणाचे रक्षण करण्याची प्राथमिक जबाबदारी पार पाडण्यात चुकले होते.
ते लोकांना घाबरत होते, देवाला नाही. ही चुकीची भीती स्पष्ट करते, नीतिसूत्रे २९;२५, “मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.” जेव्हा आपण देवापेक्षा मानवांचे मत आणि न्यायाला प्राधान्य देतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला आध्यात्मिक अध:पाताकडे स्थित करत आहोत.
मत्तय १०:२८ मध्ये येशूने म्हटले, “जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.” मुख्य याजक आणि शास्त्र्यांनी देवाच्या भयापेक्षा मानवाच्या भयावर आधारित त्यांची कृत्ये करण्याची निवड केली होती. त्यांचे धार्मिक बाह्यत्व हे निर्दोष होते, परंतु आतून ते तसे होते, जसे येशूने त्यांचे वर्णन केले आहे, “कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत.” (मत्तय २३:२७)
त्यांची टीका करणे हे सोपे आहे, परंतु आपण देखील कितीतरी वेळा, देवापेक्षा मानवांच्या मतांना प्राधान्य देतो? स्वीकृती, प्रशंसा किंवा प्रगतीसाठी आपण आपल्या विश्वासांशी तडजोड करतो असे काही क्षण आहेत का? मुख्य याजक आणि शास्त्र्यांप्रमाणे, आपण आपल्या बाह्य स्वरूपावर कधी इतके लक्ष दिले आहे का की आपण आपल्या अंत:करणाच्या अवस्थेवर दुर्लक्ष केलेले आहे?
जेव्हा आपण आपल्या अंत:करणाच्या अवस्थेवर चिंतन करतो, तेव्हा चला आपण हे केवळ विधीपूर्वक शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न करू नये परंतु प्रामाणिक परिवर्तनासाठी करावे. हे केवळ माणसांना घाबरणे किंवा त्यांच्याकडून मान्यता मिळवण्यासाठी नाही. आपली अंत:करणे ही प्रभूसाठी आदरयुक्त भीतीने, आणि त्याच्या आज्ञाधारकतेमध्ये जगण्याची इच्छेने मोहित झालेली असली पाहिजेत. असे केल्याने, आपण याची खात्री करतो की पापाचे खमीर आपल्या अंत:करणाच्या कक्षेमध्ये शिरकाव करणार नाही, ज्यामुळे ते आपल्याला भरकटवून टाकणार नाही.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, पापाचे खमीर आणि जगिक इच्छेपासून आमची अंत:करणे शुद्ध कर. मानवी मान्यतेपेक्षा तुझ्या इच्छेला प्राधान्य देण्यास आम्हांला शक्ती प्रदान कर. जे सर्व काही आम्ही करतो त्यामध्ये आमच्या जीवनाने तुला गौरव आणणारे व्हावे असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा● जिवासाठी देवाचे औषध
● दिवस २०: ४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दार बंद करा
● बीभत्सपणा
● प्रभावाच्या महान क्षेत्रासाठी मार्ग
● मोठी कार्ये
टिप्पण्या