डेली मन्ना
दिवस २३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
Tuesday, 2nd of January 2024
28
17
632
Categories :
उपास व प्रार्थना
बलवान माणसाला बांधा
बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील.” (मत्तय १२:२९)
प्रभू येशूने जेव्हा “बलवान” माणसाचा उल्लेख केला तेव्हा त्याने गहन रहस्य प्रकट केले. ज्या लोकांनी ते ऐकले त्यांच्यासाठी हे नवीन होते. जर त्याने त्याचा उल्लेख केला नसता, तर मानवी स्पष्टीकरणाला नकार देणाऱ्या काही परिस्थितींवर मात कशी करावी हे आपल्यापैकी कोणालाही कळले नसते.
एक बलवान माणूस एक आध्यात्मिक जीव आहे, एक शक्तिशाली भूत जो व्यक्तीचे आशीर्वाद आणि सद्गुण हिरावून घेणे आणि त्याविरुद्ध लढा देण्यास सज्ज आहे. बलवान माणूस हा कमी शक्तिशाली भूतांना व्यक्तीच्या जीवनात येण्यासाठी दार उघडतो. हा प्रमुख भूत असतो जो इतर कमी शक्तिशाली भूतांवर नियंत्रण ठेवतो.
हे दु:खदायक आहे हा विश्वास ठेवणे की अनेक विश्वासणारे त्यांच्या जीवनात बलवान माणसाच्या कार्यावर विश्वास ठेवत नाहीत किंवा मानत नाहीत. ते चांगले आणि विश्वासू विश्वासणारे आहेत पण युद्धाच्या समजेचा अभाव आहे. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांच्याशी लढणाऱ्या शत्रूला ते ओळखत नाहीत म्हणून त्यांच्या जीवनातील रहस्यमय परिस्थितींना हाताळणे कठीण होऊन जाते.
बलवान माणसाची कृत्ये कोणती आहेत?
१. बलवान माणूस आशीर्वाद धरून ठेवतो आणि त्याच्या आध्यात्मिक घरात जमा करून ठेवतो. येशूने उल्लेख केला आहे की बलवान माणसाकडे घर आहे आणि त्या घरात वस्तू आहेत. त्या वस्तू बलवान माणसाची संपत्ती नाहीत; त्या चोरलेल्या वस्तू आहेत (मत्तय. १२:२९). आपल्याला माहित आहे की सैतानाचा एकच उद्देश की हिरावून घेणे, मारणे आणि नाश करणे आहे (योहान. १०:१०). म्हणजे, या माणसाची संपत्ती ही लोकांकडून चोरलेल्या वस्तू आहेत.
पुष्कळ लोक गरीब किंवा साहाय्य आणि आशीर्वादावाचून अडकलेले आहेत. काहींना नोकरी नाही, काही अनेक वर्षे एकटेच आणि वांझ आहेत. हे सर्व काही आशीर्वाद आहेत जे बलवान माणसाने त्याच्या घरात संपत्ती म्हणून जमा करून ठेवले आहेत.
आज आपल्या प्रार्थनेचे लक्ष्य आपल्याला सर्व आशीर्वाद परत मिळवण्यासाठी साहाय्य करेल जे बलवान माणसाच्या घरात आहेत जे आपले आहे.
२. बलवान माणूस हा जिद्दी समस्या आणि लढायांमागील शक्ती आहे. “बलवान” शब्द शक्तीला सुचवतो, काहीतरी मोठा प्रभाव किंवा भार. अनेक विश्वासणारे त्यांच्या जीवनात काही समस्या का वारंवार घडत राहतात याचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. त्यांनी प्रार्थना केली आणि असे दिसते की तेथे काही उत्तर मिळाले नाही. काही प्रार्थना करतात आणि त्यांना वाटते की युद्ध हे जिंकले आहे, पण ते पुन्हा उद्भवताना दिसते. वारंवार घडणाऱ्या समस्या आणि लढायांसाठी बलवान माणूस कारणीभूत आहे. जर तुम्ही बलवान माणसाला बांधले नाही, तर टिकणारा उपाय किंवा आशीर्वादावाचून तुम्ही पुष्कळ वर्षे निरंतर त्याच प्रार्थना करत राहाल.
३. विनाशकारक सवयी आणि व्यसनांमागे बलवान माणूस शक्ती म्हणून आहे. पुष्कळ लोक जे सवयी आणि व्यसनांच्या प्रभावाखाली आहेत त्या थांबवणे त्यांना कठीण वाटते. ते थांबवण्याची इच्छा करतात परंतु थांबवू शकत नाहीत कारण त्या कृत्यांमागे एक शक्ती आहे जे त्यांच्या इच्छेला प्रतिकार करण्यास प्रभुत्व करते. बलवान माणूस स्वैरपणे निर्णय घेतो जेव्हा त्यांनी कार्य करावे अशी तो इच्छा करतो.
विश्वासणारे म्हणून, आपल्याला बलवान माणसावर अधिकार आहे. येशूने त्याचे नाव आपल्याला सांगितले आहे आणि आपल्याला पुत्रत्वाचा अधिकार हस्तांतरित केला आहे म्हणजे आपण बलवान माणसाला बांधू शकावे आणि आपली संपत्ती परत मिळवावी.
प्रभू येशूने म्हटले, “...जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” (मत्तय. १८:१८)
बांधणारे आपण कोण आहोत?
जर तुम्ही मत्तय. १२:२९ पाहिले, तर तुम्हांला उत्तरे मिळेल. “बांधा” हा तोच शब्द ख्रिस्ताने वापरला आहे. जर आपण बलवान माणसाला बांधले नाही आणि आपले गमावलेले आशीर्वाद किंवा उशीर झालेल्या आशीर्वादांना प्रार्थनापूर्वक मिळवले नाही, तर स्वर्गात आपल्यासाठी काहीही केले जाणार नाही.
बलवान माणसाला बांधण्यास तुम्ही तयार आहात का?
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. माझ्यावर हल्ला करणे आणि माझ्यापासून हिरावून घेणाऱ्या कोणत्याही बलवान माणसाच्या कृत्यांना मी बांधत आहे. आजपासून, माझे जीवन, कुटुंब, व्यवसाय आणि जे सर्व माझ्या संबंधातील आहेत त्यांच्या विरोधात तू कार्य करणार नाहीस. (लूक. १०:१९)
२. येशूच्या रक्ताने, माझ्या जीवनातील वारंवार होणाऱ्या लढाया आणि समस्यांना कारणीभूत असणाऱ्या प्रत्येक बलवान माणसावर मी मात करतो. आजपासून, माझ्या जीवनातील वादळे येशूच्या नावाने संपुष्टात आलेली आहेत. (प्रकटीकरण १२:११)
३. माझे जीवन, कुटुंब आणि वित्तीयतेमध्ये त्रास देणाऱ्या कोणत्याही बलवान माणसाला देवाच्या अग्नीने येशूच्या नावाने पिडीत करावे. (इब्री. १२:२९)
४. बलवान माणसाच्या अधिकारात असलेली माझी सर्व मालमत्ता आणि आशीर्वाद येशूच्या नावाने मी पुन्हा घेत आहे, (योएल २:२५)
५. माझ्या जीवनाच्या विरोधात नियुक्त केलेला मृत्यू आणि नरकाच्या प्रत्येक बलवान माणसाला येशूच्या नावाने मी बांधतो आणि त्यास पक्षघाती करतो. (मत्तय. १६:१९)
६. माझ्या जीवनाच्या विरोधात नियुक्त केलेले भय, आजार आणि दारिद्र्याच्या प्रत्येक बलवान माणसाला येशूच्या सर्वशक्तिमान नावाने मी बांधतो आणि त्यास पक्षघाती करतो. (२ तीमथ्य. १:७)
७. माझे जीवन, आरोग्य, कुटुंब आणि वित्तीयता यांच्या विरोधात नियुक्त केलेल्या प्रत्येक बलवान माणसाला येशूच्या नावाने मी बांधतो, लुटतो आणि निष्क्रिय करतो. (यशया ५४:१७)
८. बलवान माणसाच्या घरातून येशूच्या नावाने मी माझे पैसे सोडवून घेतो. (नीतिसूत्रे ६:३१)
९. माझ्या जीवनाच्या विरोधात कार्य करणाऱ्या बलवान माणसाच्या प्रत्येक घराण्याला देवाच्या बोटाने येशूच्या नावाने अस्थिर करावे असे होऊ दे. (निर्गम ८:१९)
१०. माझ्या जीवनाशी जुडलेला प्रत्येक बलवान माणूस, येशूच्या नावाने पडावा आणि मरावा. (लूक. १०:१९)
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे मुख होणे● त्याला सर्व सांगा
● तुमचा दिवस तुमची व्याख्या देतो
● त्याचा शोध घ्या आणि तुमच्या युद्धाला तोंड दया
● पृथ्वीचे मीठ
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
टिप्पण्या