सभाग्रहातून निघाल्यावर सरळपणे, ते शिमोन व अंद्रीया च्या घरी आले, त्यांच्याबरोबर योहान व याकोब होते. परंतु शिमोनाच्या पत्नीची आई (शिमोनाची सासू) तापाने आजारी पडली होतो, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. (मार्क १:३०)
लक्षात घ्या पवित्र शास्त्र सांगते, "त्यांनी येशूला पेत्राच्या सासू विषयी लागलेच सांगितले."
एक देवाचा मनुष्य होता ज्याने अनेक गीते लिहिली होती. त्याची गीते जो अनुभव त्याला झाला होता त्याने प्रेरित होती.
एके दिवशी काही लोकांना भेटी देत असताना जे अत्यंत दारिद्र्यात राहत होते, तेव्हा ते एका स्त्री ला भेटले जिची निराशा बरे होण्यापलीकडे होती. तिनेतीचा शोक बोलून दाखविला. ती मोठयाने रडली, "मला सांगा, मी काय करू? ओह, मी काय करू?"
ती ज्या पीडा व शोक मधून जात होती त्याकडे पाहून हा देवाचा मनुष्यनि:शब्द झाला. अचानक पवित्र आत्म्याने त्यास ज्ञान दिले. त्याने उत्तर दिले, "येशूला सर्वकाही सांग"
काही क्षणापुरते स्त्री विचारात बुडून गेली. मग अचानक तीचा चेहरा आनंदित झाला. "होय!" ती रडली, "हे बरोबर आहे! मी येशूला सांगितले पाहिजे." अशा प्रकारे त्याच्या आणखी एक महान गीताने जन्म घेतला-येशूला सांग.
प्रार्थना हे इतर काही नाही पण येशूला सर्व काही सांगणे आहे. आता हे चूकनाही की ज्या लोकांवर तुमची प्रीति आहे आणि ज्यांच्यावर तुम्ही भरवंसा ठेवता त्यांना सर्व काही सांगावे.
तथापि, तुम्ही त्यांना सर्व काही सांगू शकत नाही. ह्या कारणामुळे, हे वचन तुमच्या व माझ्यासाठी आहे- येशूला सर्व काही सांगा.
तुम्ही ह्यावर विश्वास ठेवणार नाही परंतु हे सत्य आहे. एक शिक्षक असे माझ्या जीवनात त्यावेळी, मी पाहिले दोन लहान मुले भांडत आहेत. त्यापैकी एक फारच अशक्त होता; दुसरा हा थोडा लट्ठ व बलवान होता. हा लट्ठ मुलगा त्या अशक्त मुलाला ढकलत होता. अशक्त मुलगा असहाय्य होऊन ओरडत होता, "माझा मोठा भाऊ ८व्या वर्गात आहे, मी त्याला सांगेन". एवढेच, जेव्हा त्या मुलाने हे ऐकले, तो पळून गेला.
मार्क ३:३४-३५ मध्ये, येशू ने घोषित केले की ते जे खरेच त्याच्या मागे येतात तेभाऊ व बहिणी आहेत. "मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पाहा, ही माझी आई व हे माझे भाऊ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहिण व तीच माझी आई."
हे केवळ मानसिक प्रयास नाही की"विश्वास ठेवणे परंतु पित्याची इच्छा पूर्ण करणे जे आपल्याला त्याचे भाऊ व बहिण असे पात्र ठरविते.
तर मग, तुमचे आरोग्य, सुटका व संपन्नता ही येईल जेव्हा तुम्ही आपल्या वडील भावाला सांगाल-प्रभु येशू ख्रिस्त. याची दक्षता घ्या की त्यास सर्व काही सांगाल-दररोज.
अंगीकार
मी प्रत्येक परिस्थती मध्ये संपूर्ण विजयात चालतो कारण प्रभु येशू ने माझ्या जीवनातून अपयश ला नष्ट केले आहे. मी विजय मिळविणारा आहे, आणि ख्रिस्ता द्वारे मी सर्व गोष्टी करू शकतो. येशूच्या नांवात मला विजय आहे. आमेन(फिलिप्पै ४:१३; १ योहान ५:४)
Join our WhatsApp Channel
Most Read
● सन्मानाचे जीवन जगा● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● पेंटेकॉस्ट साठी वाट पाहणे
● एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो
● राग समजून घेणे
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
टिप्पण्या