आजच्या वेगवान वातावरणात विचलित होणे सामान्य आहे, जे देवासोबत असलेल्या आपल्या प्रत्यक्ष उद्देश आणि संपर्कापासून दूर नेते. देवाच्या एका माणसाने हे म्हटलेले मी एकदा ऐकले, “अभिषेकाचा एक नंबरचा शत्रू हा विचलित होणे आहे.” ही भावना संपूर्ण पवित्र शास्त्रात प्रतिध्वनित होते, ते आपल्याला स्मरण देते की विचलित होणे हे निरुपद्रवी वाटू शकत असताना, त्यांचा आपल्या आध्यात्मिक प्रवासावर गहन प्रभाव होऊ शकतो.
जीवनाच्या दबावांचे आकर्षण
जीवन हे मागणी आणि दबावांनी भरलेले आहे, सर्वकाही आपले लक्ष वेधून घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत. हे विक्षेप, ते जितके सूक्ष्म वाटतील तितके, ते आपल्याला आपल्याला दैवी मार्गापासून दूर नेऊ शकतात. मत्तय. ६:३३ मध्ये आपल्याला याचे शक्तिशाली स्मरण मिळते, “तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नितीमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.” हे वचन सांसारिक चिंतांपेक्षा आपल्या आध्यात्मिक प्रवासाला प्राधान्य देण्यास आपल्याला प्रोत्साहन देते.
सैतानाची योजना: विचलित करणे हे शस्त्र म्हणून
शत्रू, जो सैतान, देवापासून आपले लक्ष इतरत्र करण्यासाठी विचलनास साधन म्हणून नेहमी वापरतो. ख्रिस्ती म्हणून अशा विचलनास ओळखणे आणि त्याशी लढा देणे हे महत्वाचे आहे. इफिस. ६:११ आपल्याला आग्रह करते की, “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.” जागरुकता आणि आध्यात्मिक तयारी या विचलनांवर मात करण्यासाठी महत्वाचे आहेत.
परमेश्वराची सेवा प्रभावीपणे करण्यासाठी विचलन आपल्याला गंभीरपणे अडथळा करू शकते. १ करिंथ. ७:३५ आपल्याला चेतावणी देते, “...प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो.” जेव्हा आपले लक्ष खंडित होते, तेव्हा देवाची आपली सेवा कमकुवत होते. हे केवळ सेवा करण्याबद्दल नाही; तर हे मनापासून सेवा करण्याबद्दल आहे.
लूक. १० हे मार्थाच्या कथेने यास स्पष्ट करते, जी अधिक सेवेमुळे विचलित झाली होती.’ येथे आपण शिकतो की, सेवेसारखे चांगले हेतू देखील विचलन होऊ शकते जर ते आपल्याला ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करण्यापासून रोखते. संतुलन ठेवणे हे महत्वाचे आहे, याची खात्री करणे की आपली सेवा ही भक्तीचे प्रतिबिंब आहे, त्यापासून विचलन नाही.
विचलनाबरोबर माझा संघर्ष
मी देखील, जास्त कामे करण्याच्या प्रयत्नाच्या मोहाशी संघर्ष केला आहे. असंख्य कार्यांमध्ये व्यस्त राहण्याची इच्छा जबरदस्त असू शकते. तथापि, स्तोत्र. ४६:१० आपल्याला सल्ला देते की, “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे.” शांतपणात, आपण आपले पाचारण आणि लक्ष केंद्रित करण्याविषयी स्पष्टता प्राप्त करतो. परमेश्वराने असे शांतचित्त राहणे आणि लक्ष केंद्रित करण्याच्या महत्वाविषयी मला शिकवले, आणि मला मार्गदर्शन दिले की ज्यासाठी मला प्रत्यक्ष बोलावले आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे.
इतरांचे अनुसरण करण्याचा मोह देवाच्या अनोख्या योजनेपासून आपल्याला विचलन होऊ शकतो. रोम. १२:२ सल्ला देते की, “ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया.” आपल्या जीवनासाठी देवाच्या मार्गदर्शनाचा आपण धावा केला पाहिजे, इतरांचे अनुसरण करण्याऐवजी आपल्या वैयक्तिक मार्गास स्वीकारावे.
सामाजिक माध्यम विचलन
सामाजिक माध्यम व्यासपीठ जसे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप संपर्क ठेवण्यासाठी मौल्यवान साधन होऊ शकतात, तसेच त्यांच्याकडे विचलित होण्याची लक्षणीय क्षमता देखील आहे. धोका हा केवळ व्यासपीठामध्ये नाही, परंतु आपला वेळ आणि लक्ष वेधून घेण्यासाठी ते कशी मक्तेदारी दाखवू शकतात, जे आपल्याला अर्थपूर्ण उद्देशापासून वळवतात. कलस्सै. ३:२ उपदेश देते, “वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.” हे वचन आपल्याला स्मरण देते की डिजिटल विचलनाऐवजी आपल्या आध्यात्मिक जीवनास प्राधान्य द्यावे.
सामाजिक माध्यमाचा अतिवापर हा देव आणि आपल्या प्रियजनांपासून वियोग करण्यापर्यंत नेऊ शकतो. या जगात, जेथे ऑनलाईन संपर्क मोठ्या प्रमाणात आहे, त्यामध्ये खरे, वैयक्तिक संबंधाचे महत्व स्मरण करणे हे महत्वाचे आहे. इब्री. १०:२४-२५ आपल्याला प्रोत्साहन देते, प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आणि आपले एकत्र मिळणे सोडू नये. हे वचन नातेसंबंध जोपासण्याचे महत्व अधोरेखित करते जे आध्यात्मिकदृष्ट्या आणि भावनात्मकदृष्ट्या बलशाली करते.
जेव्हा आपण जगाच्या गोंधळातून पुढे वाटचाल करतो, तेव्हा चला आपण वचनाच्या ज्ञानाशी जडून राहावे, जे आपल्याला देवाच्या हृदयाकडे पुन्हा मार्गदर्शन करते. प्रभूसोबत आपल्या नातेसंबंधाला प्राधान्य देऊन आणि आपल्या एकमेव पाचारणावर लक्ष केंद्रित करून, आपण विचलनांवर मात करू शकतो आणि आपल्या जीवनासाठी देवाचा उद्देश पूर्ण करू शकतो.
प्रार्थना
तुमच्या अंत:करणापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार म्हणा, त्यास वैयक्तिक करा आणि कमीत कमी १ मिनिटासाठी तसे प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी करा.)
१. मी उद्देश असलेला एक व्यक्ती आहे. मी धार्मिक लक्ष केंद्रित करून कार्य करेन आणि परमेश्वराने जी देणगी आणि पाचारण मला दिले आहे त्यानुसार येशूच्या नावाने कार्य करेन. (रोम. ११:२९)
२. देवाचा आत्मा माझ्यावर आणि माझ्यामध्ये आहे, आणि त्याने जी देणगी माझ्यात ठेवली आहे तो त्यास स्पर्श करत आहे. (२ तीमथ्य. १:६)
३. नियती आणि ख्रिस्ताचा दूत असलेला मी एक व्यक्ती आहे. परमेश्वर माझा साहाय्यक आहे. (२ करिंथ. ५:२०)
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्त-केंद्रित घर● दानीएलाचा उपास
● विश्वासाद्वारे कृपा प्राप्त करणे
● विश्वास काय आहे?
● तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?
● तुमचा हेतू काय आहे?
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
टिप्पण्या