(संदेष्टा) अलीशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मूठमाती दिली.
नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली.
तेव्हा लोक एका मनुष्यास मूठमाती देत असता त्यांच्या नजरेस एक टोळी पडली; आणि त्यांनी ते प्रेत (एका मनुष्याचे मृत शरीर)अलीशाच्या (संदेष्टा)कबरेत टाकिले, तेव्हा अलीशाच्या अस्थीस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायावर उभा राहिला. (२ राजे १३:२०-२१)
त्याच्या सेवाकार्या दरम्यान, एलीया ने देवाच्या सामर्थ्याने १४ चमत्कार केले होते जे त्याच्या नावे होते.
जर संदेष्टा अलीशा ने संदेष्टा एलीयाच्या आत्म्याचा दुप्पट आशीर्वाद प्राप्त केला होता, तर त्याने कमीतकमी २८ चमत्कार केले पाहिजे होते. तथापि, जेव्हा तो मरण पावला, तेव्हा त्याने २७ चमत्कार केले होते. हा चमत्कार ज्यात त्याच्या अस्थींचासमावेश होता त्याने २८ वा चमत्कार केला होता.
काही बायबला विज्ञानी ह्या चमत्काराची नोंद ही एलीयाच्या आत्म्याचा दुप्पट वाट्याचा पुरवठा अलीशा मध्ये पूर्ण होताना पाहतात.
चला आपण कथे कडे जाऊ या:
एक इस्राएली मनुष्य मरण पावला आहे, आणि त्याचे शरीर नगरच्या बाहेर पुरण्यासाठी नेत आहेत. जेव्हा ही अंत्यविधी यात्रा पुरण्याच्या ठिकाणी पोहचली आहे, एक मवाबी लुटमार करणारी टोळी समोर दिसते. सुरक्षा व संरक्षण हे केवळ नगराच्या भिंतीच्या आतमध्येच मिळू शकते आणि म्हणून या मनुष्यास हे करणे भाग होते की नगराच्या आत जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर पोहोचावे. यामुळे ते गंभीर पेचात पडले. त्यांनी ह्या मनुष्याच्या शरीरासोबत काय करावे ज्यास ते पुरण्यास घेऊन जात होते? त्यांच्याकडे त्यास योग्यरित्या पुरण्यास वेळ नव्हता; म्हणून त्यांनी निर्णय घेतला कीघाईने त्या शरीराला पुरावे व नगराकडे पळावे.
त्यांच्या त्या घाई मध्ये, त्यांनी अक्षरशः त्या मनुष्याच्या शरीराला संदेष्टा अलीशा च्या कबरेत फेकले. ज्या क्षणी त्या मनुष्याच्या शरीराने संदेष्टा अलीशा च्या अस्थींना स्पर्श केला, ते जिवंत झाले, आणि तो मनुष्य त्याच्या पायावर उभा राहिला.
मी विश्वास ठेवतो जेव्हा तो मनुष्य त्याच्या पायांवर उभा राहिला, त्याने सुद्धा मवाबी लुटमार करणारी टोळी येताना पाहिले असेन. तो सुद्धा नगराकडे पळाला असेन.
आता मनोरंजक भाग हा, लोक जे त्याच्या प्रेतक्रियेसाठी आले होते ते सुद्धा नगराकडे सुरक्षे साठी पळत होते, हा मनुष्य सुद्धा सुरक्षे साठी नगराकडे पळत होता. मी विश्वास ठेवतो हा मनुष्य इतरांपेक्षा अधिक जोराने पळाला असेन कारण त्यास दुसऱ्यांदा मरावयाचे नव्हते.
तुम्ही कल्पना करू शकता काय की जे प्रेतक्रियेसाठी आलेले लोक होते त्यांच्या चेहऱ्यावर कसे हावभाव असतील जेव्हा त्यांनी पाहिले असेन की त्यांचा मृत झालेला मित्र त्यांच्यापुढे पळत जात आहे?
मृत मनुष्य जो संदेष्टा अलीशा च्या अस्थींशी संपर्क झाल्यावर जिवंत झाला हा संदेश सरळ आहे, देवाने तुम्हाला स्पर्श केल्यावर, तुम्ही तारणाचा अनुभव केल्यावर,तुमची देवाबरोबर भेट झाल्यावर, केवळ तेथेच घुटमळू नका, तुमचीस्पर्धा पळा.
देवाने ज्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे ते सर्व व्हा.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला कृपा मागतो कीनियुक्त केलेली माझी धाव प्रभावीपणे धावावी.
येशूच्या नांवात, सर्व फसवणूक, अडथळे जे माझ्याविरोधात कार्य करीत आहे ते अग्नि द्वारे काढले जावो.
मी कबूल करतो, मी पापास मेलो आहे, आणि धार्मिकतेसाठी जिवंत आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराला तुमचा बदला घेऊ दया● देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
● पापी रागाचे स्तर उघडणे
● बोललेल्या शब्दाचे सामर्थ्य
● परमेश्वराचा आनंद
● देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा
● यातना-मार्ग बदलणारा
टिप्पण्या