डेली मन्ना
तुम्ही येशू कडे कसे पाहता?
Friday, 9th of February 2024
32
19
1150
Categories :
देवाचे शब्द
येशूकडे पाहणे हे ख्रिस्ती विश्वासात मुलभूत तत्व आहे, ते आपल्याला आपली दृष्टी, आपले विचार, आपले मन प्रभू आणि त्याच्या वचनावर केंद्रित करण्यासाठी आमंत्रित करते. हे प्रभावीपणे कसे करावे हे समजण्याने आपल्या आध्यात्मिक प्रवासाला परिवर्तीत करू शकते, आपल्याला तसे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करते जे त्याच्यावरील आपल्या खऱ्या विश्वासाला प्रतिबिंबित करते.
येशूकडे पाहण्याचा काय अर्थ आहे?
येशूकडे पाहणे म्हणजे आपला दृष्टांत देवाच्या वचनाशी एकरूप करणे आहे, जे तो कोण आहे याचे प्रतिबिंब आहे. योहान. १:१ आपल्याला सांगते की, “प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.” हे वचन प्रभू येशू आणि देवाच्या वचनामधील एकता अधोरेखित करते. ज्याप्रमाणे आरसा आपल्याला आपले बाह्य रूप दाखवतो, त्याप्रमाणेच देवाचे वचन आपल्या आत्मिक स्वरूपास प्रकट करते (याकोब १:२३-२४). जेव्हा आपण वचनाचे अध्ययन करतो, तेव्हा आपण केवळ वचन वाचत नाहीत, तर आपण स्वयं येशूसोबत व्यस्त असतो, त्याच्या दृष्टीने आपले प्रतिबिंब पाहत असतो.
देवाच्या वचनावर मनन करणे
याकोब १:२५ आपल्याला देवाच्या वचनाशी प्रभावीपणे जुळण्यासाठी तीन पायऱ्यांचे मार्गदर्शन प्रदान करते:
१. ते वाचा.
“परिपूर्ण नियमशास्त्रात लक्षपूर्वक पाहणे” म्हणजे बायबलचे अध्ययन लक्ष केंद्रित करून करणे, त्याची गहनता आणि समृद्धता समजण्याचा प्रयत्न करणे. हे केवळ वरवर पाहण्याबद्दल नाही परंतु वचन काय म्हणते आणि ते आपल्या जीवनाला कसे लागू होते यावर सखोल आत्मपरीक्षण करण्याबद्दल आहे.
२. त्याचे पुनरावलोकन करा.
वचनासोबत सतत रमणे –“आणि तसे सतत करत राहणे”-हे केवळ एक वेळचे वाचणे नाही परंतु वचनासोबत वारंवार आणि सतत विचार करण्याच्या महत्वावर जोर देते. असे वारंवार वाचणे देवाच्या सत्याला आपले मन आणि हृदयात बिंबवण्यास मदत करते.
३. ते स्मरण करा.
“त्यांनी काय ऐकले आहे ते विसरू नये” हे वचन स्मरण करण्याच्या मूल्यावर जोर देते. जरी काही वेळानंतर आपण ही वचने विसरून जात असलो तरी, ते आपल्यासोबत राहतात, पवित्र आत्म्याच्या बोलण्याने पुन्हा स्मरण देण्यास तयार असतात जेव्हा आपल्याला मार्गदर्शन किंवा प्रोत्साहनाची आवश्यकता असते.
वचन लागू करणे
येशूकडे पाहण्याची किल्ली ही केवळ वचन वाचणे, पुनरावलोकन करणे आणि स्मरण करणे नाही, परंतु आपल्या जीवनात त्याने सक्रियपणे कार्य करण्याची अपेक्षा बाळगणे आहे. १ करिंथ. ९:२४ मध्ये आपल्याला प्रोत्साहन दिलेले आहे, “शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला ते मिळेल.” हा उतारा आपल्याला विनंती करतो की लक्षपूर्वक आणि दृढनिश्चय ठेऊन आपल्या विश्वासाने जगावे आणि आध्यात्मिक चालण्यात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करायचे आहे.
येशूकडे पाहण्यासाठी काही व्यवहारिक पाऊले
१. दररोज वचनात रमणे: दररोज बायबल वाचण्याची सवय लावा. त्या वचनाने सुरु करा जे तुमच्या जीवनाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलत आहे किंवा बायबलचे एक एक अध्याय वाचत चला.
२. चिंतन आणि मनन करा: वाचल्यानंतर, तुम्ही काय वाचले आहे त्यावर मनन करण्यासाठी वेळ दया. देव या वचनाद्वारे तुम्हांला काय बोलत आहे आणि ते तुमच्या जीवनाला कसे लागू होते हे स्वतःला विचारा.
३. वचन स्मरण करा: स्मरण करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला एक वचन निवडा. ते लिहून काढा, आणि त्यास तुमच्या फोनमध्ये ठेवा, किंवा ज्यास तुम्ही दररोज पाहू शकाल अशा कोठेतरी ते ठेवा जोपर्यंत ते पूर्ण आत्मसात होत नाही.
४. तुम्ही काय शिकला आहात ते आचरणात आणा: जेव्हा तुम्ही देवाचे वचन वाचता, पुनरावलोकन करता आणि स्मरण करता, तेव्हा तुमच्या दैनंदिन जीवनात ते लागू करण्यासाठी संधी पाहा. मग ते दया दाखवणे, क्षमा करणे किंवा संकटाच्या दरम्यान स्थिर उभे राहणे असो, तेव्हा वचनास तुमच्या कृतीला मार्गदर्शन करू दया.
५. वचन सांगा: जेव्हा तुम्ही समजेमध्ये वाढता, तेव्हा तुम्ही इतरांसोबत काय शिकत आहात ते सांगा. हे मैत्रीपूर्ण संभाषण किंवा सामाजिक माध्यमातून होऊ शकते.
लक्षात ठेवा, येशूकडे त्याच्या वचनातून पाहणे हा एक प्रवास आहे जो आपल्याला आतूनबाहेरून परिवर्तीत करतो. ते आपले विचार, कृती आणि आचरणास वळण लावते, ज्यास देवाच्या वचनाशी एकरूप करते. जसे इब्री. १२:२ म्हणते, “आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे.” त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याद्वारे, आपल्याला आवश्यक असलेली शक्ती, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आपण प्राप्त करतो की आपली शर्यत चांगली धावावी आणि शेवटी त्याच्यासह आपले सार्वकालिक बक्षीस मिळवावे.
प्रार्थना
१. पित्या, माझ्या हृदयाला येशूच्या प्रितीमध्ये निर्देशित कर आणि त्याच्या दृढनिश्चयाचे अनुसरण करण्यास प्रयत्शील राहावे.
२. पित्या, मला चांगली लढाई लढण्यास, शर्यंत पूर्ण करण्यास आणि विश्वास राखण्यास येशूच्या नावाने मदत कर, अशी मी प्रार्थना करतो.
२. पित्या, मला चांगली लढाई लढण्यास, शर्यंत पूर्ण करण्यास आणि विश्वास राखण्यास येशूच्या नावाने मदत कर, अशी मी प्रार्थना करतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चला आपण परमेश्वराकडे वळू या● दिवस ३४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
● ख्रिस्तासाठी राजदूत
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
● दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● क्षमेसाठी व्यावहारिक पाऊले
टिप्पण्या