डेली मन्ना
देवासाठी आणि देवाबरोबर
Monday, 12th of February 2024
27
18
992
Categories :
Intimacy with God
देवाला ओळखण्यासाठी पाचारण समजणे
दाविदाने शलमोनाला सल्ला दिला हे म्हणत, “हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर......” . (१ इतिहास २८:९)
दाविदाचा सल्ला हा केवळ देवासोबत राहण्याच्याही पलीकडील होता; तो सर्वशक्तिमानसोबत गहन आणि वैयक्तिक नातेसंबंधाबाबत बोलत आहे. “तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख” हा निर्देश काही निष्क्रिय सल्ला नव्हता परंतु देवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्यासाठी प्रेरणा देणारे आमंत्रण होते. योहान. १७:३ मध्ये प्रतिध्वनित झालेल्या निर्णायक सत्याला ते प्रखरपणे मांडते, जेथे सार्वकालिक जीवनाचे महत्व पित्याला आणि येशू ख्रिस्ताला ओळखणे आहे म्हणून वर्णन करते. हे ओळखणे वरवरचे आहे परंतु त्यामध्ये खोलवरील, अनुभवात्मक आणि नातेसंबंधाचा समावेश आहे.
वारशाने मिळवलेल्या विश्वासापेक्षा वैयक्तिक नातेसंबंध
दाविदाचा शलमोनाला सल्ला एक महत्वाच्या आध्यात्मिक तत्वाला अधोरेखित करतो:
देवाबरोबर विश्वास आणि नातेसंबंध वारसदार मालमत्ता नाहीत. कौटुंबिक संबंधांपासून स्वतंत्र, प्रत्येक व्यक्तीने देवाशी स्वतःचे नाते जोडले पाहिजे. याचा अर्थ तुम्ही देवाशी तुमच्या पाल्यांच्या नातेसंबंधांच्या पाठबळावर आधारित राहू शकत नाही. देवाशी तुम्हांला तुमचे स्वतःचे नातेसंबंध असले पाहिजे. दावीद परमेश्वराला फार जवळून ओळखत होता. आता ही शलमोनाची वेळ होती की देवाशी त्याचे स्वतःचे घनिष्ठ नातेसंबंध विकसित करावे.
आज, येथे पुष्कळ लोक आहेत जे नेहमीच त्यांच्या पाल्यांना, त्यांच्या जोडीदारांना, आणि त्यांच्या नेत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगतात, त्याचवेळेस ते स्वतः प्रार्थना, उपासना किंवा देवाच्या वचनावर कधीही चिंतन करत नाहीत. अर्थातच, येथे काहीही चुकीचे नाही की आपल्या प्रियजनांना आपल्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, परंतु अशी वेळ येते जेव्हा आपल्या स्वतःला प्रार्थना करण्याची आवश्यकता असते. यासाठी, तुम्हांला आणि मला देवाला ओळखण्याची आवश्यकता आहे.
हे तत्व आजही प्रासंगिक आहे, जे प्रत्येकाला वरवरच्या आध्यात्मिकतेच्याही पलीकडे जाण्याचे आणि देवाशी सरळपणे आणि वैयक्तिक नातेसंबंध बनवण्याचे आव्हान करते.
सेवा आणि नातेसंबंधाचा क्रम
“सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर” हा दाविदाचा शलमोनाला उपदेश देवाची सेवा करण्याच्या आनंदाला आणि विशेषाधिकाराला प्रखरपणे मांडतो. सेवा, उपासनेचा एक प्रकार म्हणून, इतरांना ख्रिस्ताचे प्रेम आणि संदेश देतो, जे आशा आणि सांत्वन प्रदान करते. तरीही दावीद सेवेपेक्षा नातेसंबंधाला प्राधान्य देतो. देवाला कोणत्याही सेवेचा पाया हा त्याच्याशी वैयक्तिक आणि घनिष्ठ नातेसंबंधात रुजलेला असला पाहिजे. या पायावाचून, सेवा ही निराशा आणि अत्यंत थकव्याच्या धोक्यात येते. तुम्ही लहान गोष्टींवरदेखील अपमानित आणि कडवट होण्यापर्यंत जाऊ शकता.
परमेश्वराबरोबर वैयक्तिक नातेसंबंधाच्या भक्कम पायावाचून देवाची सेवा करणे हे आध्यात्मिक थकव्याकडे नेऊ शकते. ही आव्हाने देवाशी वैयक्तिक, घनिष्ठ नातेसंबंधाला पुन्हा बळकट करणे आणि त्यास नवीन करण्याच्या आवश्यकतेचा इशारा देते. प्रार्थना, चिंतन आणि त्याच्या वचनाचे अध्ययन करण्याद्वारे देवाबरोबर चांगला वेळ घालविणे हे सेवा आणि आध्यात्मिक वाढीमध्ये चांगले संतुलन ठेवण्यासाठी महत्वाचे आहे.
प्रीतीची आज्ञा
देवाशी आपल्या नातेसंबंधाच्या प्रमुख स्थानी हे त्याला आपल्या पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रेम करणे आहे (मत्तय. २२:३७). ही आज्ञा आपल्या विश्वासाच्या प्रवासाच्या महत्वाचे सार अंतर्भूत करते, आपल्याला त्या प्रीतीकडे निर्देश देते ज्यामध्ये आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूचा समावेश होतो. देवाला मनापासून आणि पूर्ण अंत:करणाने प्रीती करण्याने त्याची सेवा प्रभावीपणे आणि आनंदाने करण्यासाठी आपल्याला शक्ती आणि प्रेरणा मिळते.
प्रार्थना
१. परमेश्वरा, माझ्यामध्ये तुझ्या भयाने कार्य कर, जे ज्ञानाचा प्रारंभ, शहाणपणात सल्ला आणि जीवनाचा झरा आहे, म्हणजे मी मृत्युच्या सापळ्यापासून दूर व्हावे.
२. तुझ्या नावाचे भय धरण्यासाठी माझे मन एकाग्र कर म्हणजे माझ्या संपूर्ण आयुष्यात मी तुझ्या आज्ञा पाळाव्या असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन
Join our WhatsApp Channel
Most Read
● चांगले आर्थिक व्यवस्थापन● तुम्ही येशू कडे कसे पाहता?
● शेवटची घटका जिंकावी
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● मुळा बद्दल विचार करणे
● मोठी कार्ये
टिप्पण्या