डेली मन्ना
आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे याचा काय अर्थ आहे?
Friday, 23rd of February 2024
31
19
1038
Categories :
पवित्र आत्मा
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.............. तो मला मार्गदर्शन करतो. (स्तोत्र २३:१-२)
मार्गदर्शित होणे यामध्ये दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे चालणे लागू आहे. आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे म्हणजे आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणे. हे त्याच्या इच्छेच्या अधीन असणे आहे, त्याची इच्छा आपल्या जीवनाचे ध्येय करणे आहे. तो मेंढपाळ आहे, आणि आपण मेंढरे आहोत.
आत्म्या मध्ये चालणे पापा ला पराभूत करते:-
मग मी म्हणतो: आत्म्या मध्ये चाला, आणि तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. (गलती ५:१६)
आत्म्या मध्ये चालणे नियमशास्त्राच्या बंधनात राहण्यास टाळते.
परंतु जर तुम्ही आत्म्या द्वारे मार्गदर्शित आहात, तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत. (गलती ५:१८)
ख्रिस्ती जीवनासाठी केवळ एकच योग्य मार्ग हा एकचआदर्श प्रभु येशू आहे-आत्म्या द्वारे व्यक्तिगत संबंधामध्ये देवाचे अनुकरण करणे.
जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत.
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोक कूच करीत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत; मेघ निवासमंडपावर बरेच दिवस तसाच राहिला तरी इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून कूच करीत नसत. (गणना ९:१७-१९)
इस्राएल लोकांचे चालणे हे पूर्णपणे देवाच्या आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शित होते. हे जुन्या करारातील रानातील चर्च होते आणि ते पूर्णपणे आत्म्या द्वारे मार्गदर्शित होते. तर मग आपण जे नवीन करारातील चर्च किती अधिक असले पाहिजे.
कधीकधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी तो हालला म्हणजे ते कूच करीत; दिवसां किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत. (गणना ९:२१)
लक्षात घ्या,कधीकधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे. हे खरेच असुविधाजनक राहिले असेन जेथे स्त्रिया व लहाने लेकरे सर्व मिळून आहेत. आत्म्या द्वारे मार्गदर्शित असणे हे नेहमीच सुविधाजनक असणार नाही. ते तुम्हाला तुमच्या आरामदायक क्षेत्रातून बाहेर आणेल की त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहावे. ते तुमच्या इच्छेला नष्ट करेल आणि शेवटी तुमच्या इच्छेला त्यास शरण जाण्यास लावेल.
जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाचे पुत्र आहेत. (रोम ८:१४)
पवित्र आत्मा जो व्यक्तीच्या जीवनात आहे त्याने त्यास देवाच्या योजना व उद्धेशां मध्ये मार्गदर्शित करावे. आत्म्या द्वारे मार्गदर्शित असणे हे आपल्याला परिवर्तीत करते, आपण मग देवाचा स्वभाव व चारित्र्य घेऊन चालतो; देवाचा अगदी डीएनए घेऊन चालतो. ते आपल्याला देवाची मुले करते.
प्रार्थना
पित्या, मी तुला तुझे व्यक्तिमत्व व मार्गाच्या गहन प्रकटीकरण साठी मागतो, पित्या, मी पवित्र आत्म्या बरोबर जवळीक संबंध साठी मागतो. पित्या, मी तुला देवाच्या मनाच्या मोठया समज व पवित्र आत्म्याच्या कार्यासाठी मागतो, प्रतिदिवशी मला तुझ्या आत्म्या द्वारे मार्गदर्शित कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अपराध-मुक्त जीवन जगणे● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● तुमचा हेतू काय आहे?
● स्वतःवरच घात करू नका
● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
टिप्पण्या