डेली मन्ना
पृथ्वीवरील राजांचा अधिपती
Monday, 26th of February 2024
27
21
855
Categories :
ख्रिस्तामध्ये आमची ओळख
जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला 'पातकातून मुक्त केले'. (प्रकटीकरण १:५)
लक्षात घ्या, शब्दांचा क्रम: प्रथम धुतले मग प्रीति केली.
हे असे नाही की परमेश्वराने काही कर्तव्य म्हणून आपल्याला धुतले, आणि मग आपल्यावर प्रीति केली कारण आपण शुद्ध झालो होतो. त्याने आपल्यावर प्रीति केली जेव्हा आपण घाण होतो, आणि मग त्याने आपल्याला धुतले.
रोम ५:८ तेच खात्रीशीर मानते: "परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला."
आणि आपल्याला 'राज्य' आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी 'याजक' असे केले; त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन." (प्रकटीकरण १:६)
प्रभु येशू केवळ आपल्याला धुण्या पर्यंतच थांबला नाही, परंतु त्याने आपल्याला राजे व याजक असे केले.
आता नियमशास्त्र देण्याअगोदर, तेथे एक मनुष्य होता जो दोन्हीही म्हणजे राजा व याजक होता-मलकीसदेक (उत्पत्ति १४:१८). तथापि, जुन्या करारात नियमशास्त्र दिल्यानंतर, राजा व याजक हे पद जोडण्यास प्रतिबंध करण्यात आला. तुम्ही एकतर राजा असा किंवा याजक-दोन्हीही नाही.
यहूदाचा राजा उज्जीया हा त्या मनुष्याचे उदाहरण आहे ज्याने ते दोन्ही पद एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी शिक्षा भोगली-कुष्ठरोग. २ इतिहास २६:१६-२१ वाचा, ते आपल्याला संपूर्ण कथा सांगते.
आणखी एक व्यक्ति ज्याने ही दोन्ही पदे एकत्र करण्याचा प्रयत्न केला तो राजा शौल होता-परमेश्वराने त्याचा अस्वीकार केला व त्याने राज्य गमाविले. १ शमुवेल १३:८-१४ वाचा की कथा वाचावी.
ही दोन उदाहरणे स्पष्ट करतात की जुन्या करारात राजा व याजक हे दोन्ही पद एकत्र करण्यास प्रतिबंध होता. तथापि, नवीन करारात, आपण प्रभु येशू ख्रिस्ता प्रमाणे होऊ शकतो त्या अर्थाने की तो जसे दोन्हीही म्हणजे राजा व मुख्य याजक आहे.
आता येथे एक सिद्धांत आहे. कारण प्रभु येशू हा दोन्हीही म्हणजे राजा व याजक होता, तो आपल्याला देवासाठी राजे व याजक करू शकत होता. तुम्ही इतर कोणाला जे तुम्ही नाही ते करू शकत नाही.
आता १ पेत्र २:९ कडे जा: "पण तुम्ही तर 'निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,' देवाचे'स्वतःचे लोक' असे आहा; ह्यासाठीकी, ज्यानेतुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले 'त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे."
राजकीय व याजकगण या दोन्ही शब्दाच्या मिश्रणकडेलक्ष दया. तर मग हे स्पष्ट आहे कीप्रत्येक व्यक्ति ज्याने प्रभु मध्ये खरेच विश्वास ठेवला आहे त्यास याजक व राजा असे केले आहे.
ख्रिस्ता सारखे, आपण सुद्धा या दोन्ही मार्गाने सेवा करावी; याजक म्हणून, आपल्याला पित्या समोर स्तुति व मध्यस्थीचे बलिदान करण्यास बोलाविले आहे. राजे म्हणून, शुभवर्तमान खातर आपल्याला आजारी लोकांना बरे करणे व भुते काढण्याद्वारे आपला अधिकार वापरला पाहिजे.
अंगीकार
मी ख्रिस्ता मध्ये आहे आणि म्हणून मी निवडलेला वंश, राजकीय याजकगण, एक समर्पित राष्ट्र [देवाचे] स्वतः विकत घेतलेले, विशेष लोक आहोत, जेणेकरून मी अद्भुत कार्ये करावी आणि त्याचे गुण व सिद्धता प्रदर्शित करावी ज्याने मला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासणाऱ्यांचे राजकीय याजकगण● शत्रू गुप्त आहे
● त्याला सर्व सांगा
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो
● मनुष्यांची परंपरा
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● तुम्हाला कोण मार्गदर्शन करीत आहे?
टिप्पण्या