डेली मन्ना
तुमच्या प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारिक पायऱ्या
Thursday, 14th of March 2024
24
22
1082
Categories :
प्रार्थना
प्रार्थनेत घालविलेली वेळ ही कधीही वाया घालविलेली वेळ नाही परंतु वेळेचा निवेश केलेली होय. प्रार्थना ही आपल्या नित्याच्या जीवनाचा भाग झाली पाहिजे जसे खाणे व पिणे हे आहे. त्यास एक पर्याय किंवा शेवटचा उपाय असा विचार नाही केला पाहिजे. देवाच्या राज्यात आध्यात्मिक वाढीसाठी प्रार्थना ही एक मुख्य किल्ली आहे.
तरीहीआपल्यापैंकी अनेक जण हे प्रार्थनाकरण्यामध्ये कामाचेव्यस्त कार्यक्रम, कौटुंबिक कामे इत्यादी मुळे अडखळत आहेत. मला ठाऊक आहे हे खरेचहताश करणारे आहे. तर मग येथे काही आहेत ज्यांच्याजवळ वेळ आहे व तरीही वेळ काढू शकत नाही, काहींना प्रार्थना करणे केवळ आवडतच नाही.
येथे काही सुचना आहेत ज्या तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यास वापरू शकता.
#१ झोपण्याची एक निश्चित वेळ व उठण्याची एक निश्चित वेळ असावी
एका निश्चित वेळी झोपणे हे उत्तम आहे. जर तुम्ही प्रत्येक रात्री एका निश्चित वेळी झोपता, तरत्याचा परिणाम तुम्ही प्रत्येक सकाळी एका निश्चित वेळी उठू सुद्धा शकता. हे सतत सातत्यात राहण्याविषयी आहे.
मीदोन्हीत म्हणजे शांतीत निजेन व झोपेल.(स्तोत्र ४:८)
याशिवाय, जर तुम्ही बिछान्यावर एका निश्चित वेळी जाता आणि एका निश्चित वेळी उठता तुमच्या शरीराचे घड्याळ हे स्थित होते आणि दिवसा तुम्हाला सुस्त व दमलेले वाटत नाही आणि सर्वात महत्वाचे तुम्ही प्रार्थनेच्या वेळी जागरूक राहता.
चांगले झोपा व तुम्हाला कमी तणाव वाटेल, अधिकऊर्जा व काम करण्यास इच्छा होईल. हे तुमच्या जीवनात काही व्यवस्था आणेल जे आज अनेक लोकांबरोबर तसे नाही आहे.
#२ बिछान्यावर झोपण्याच्या वेळी तुमचा फोन घेऊ नका
संशोधनानुसार, निळा प्रकाश जे आपला फोन बाहेर टाकते, ते आपल्या झोपण्याच्या पद्धती मध्ये व्यत्यय आणते. तसेच, येथे अनेक लोक आहेत जे त्यांच्या बिछान्यावर झोपण्याअगोदर सामाजिक माध्यमे तपासत असतात. असे करणे आपल्या झोपेच्या वेळेला उशीर करते.
#३ तुमच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा व तुमच्या दिवसाचा शेवट प्रार्थनेने करा
कोणीतरी म्हटले आहे, "प्रार्थना ही किल्ली आहे जे दिवसाला उघडते व प्रार्थना हे रात्रीचे टाळे आहे." तुम्ही जेव्हा दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करता, संपूर्ण दिवसभर तुम्ही त्याच्या मार्गदर्शनाची निश्चितच खात्री करूशकता. तुम्ही हे वचन सत्यता असे पाहाल: "मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन." (स्तोत्र ३२:८)
तुम्ही जेव्हा तुमचा दिवस प्रार्थनेने संपविता, तुम्ही खात्री बाळगू शकता की परमेश्वर हा तुम्हाला स्वप्नात व दृष्टांतात बोलेल.
देव एका प्रकारे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो; पण तो त्याकडे चित्त देत नाही. स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टांतात, मनुष्य गाढ निद्रेत असतां, तो बिछान्यावर पडून झोप घेत असतां, देव त्याचे कान उघडितो, त्यास प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करितो. (ईयोब ३३:१४-१६)
#४ प्रार्थनेच्या वेळी, कृपा करून तुमचे फोन ऑफलाईन करा किंवा पूर्ण बंद करणे हे उत्तम होईल
मग तो सकाळी मोठया पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. (मार्क १:३५-३७)
सर्व लोक येशूचा शोध करीत होते, परंतु तो कोठेही सापडत नव्हता. जर हे आपल्या वेळेत असते, मी विश्वास ठेवतो, शिमोन पेत्राने म्हटले असते, "प्रभु येशू, फोन ने मी तुला संपर्क करू शकलो नाही. तुझा फोन बंद होता." मला आशा आहे की मी जे बोलण्याचा प्रयत्न करीत आहे ते तुम्हाला समजत आहे.
ह्यासुचना लागू करा आणि तुम्ही तुमच्या जीवनात व आध्यात्मिक वाढी मध्ये एक निश्चित बदल पाहाल.सांगा ह्या चिन्हाचे बटन दाबण्याद्वारे हा संदेश कोणाला तरी सांगा.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मला तुझे मार्ग शिकीव व मी तुझ्या सत्यात चालेन. येशूच्या नांवात.
धन्यवादित पवित्र आत्म्या जसे येशूने प्रार्थना केली तशी प्रार्थना करण्यास मला शिकीव. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा● यहूदा च्या जीवनाकडून धडा- २
● ज्ञान व प्रीति हे प्रोत्साहन देणारे
● सिद्ध सिद्धांताचे महत्त्व
● सापांना रोखणे
● सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
● बीज चे सामर्थ्य - ३
टिप्पण्या