डेली मन्ना
परमेश्वरा, मला अडथळ्यापासून सोडीव
Friday, 15th of March 2024
30
19
914
Categories :
अडथळा
हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो; तुम्हांस फासांत गुंतवावे म्हणून नव्हे तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो. (१ करिंथ ७:३५)
आज आपण अभूतपूर्व अडथळ्याच्या युगात जगत आहोत. ते दिवस आता निघून गेले आहेत की अनेक जण त्यांच्या दिवसाची सुरुवात शांतपणे प्रार्थनेत व देवाच्या वचनावर मनन करीत सुरु करीत होते. आता अनेक जण हे त्यांचा दिवस त्यांचे ईमेल व सामाजिक माध्यममाहिती पाहत सुरु करतात.
जेव्हाआमचा कैमेरा सर्वत्र फिरत असतो, सामाजिक माध्यमाचा माझा संघ मला नेहमी बोलतात की ते पाहतात की लोक उपासने दरम्यान त्यांचे संभाषण वार्ता पाठवीत असतात.आमच्या आठवड्याच्या संक्षिप्त सभे दरम्यान मला माध्यम मधील एका सदस्याने सांगितले की एक स्त्री तिचे दोन्ही हात उपासने दरम्यान वर उचलत होती- एका हाताने ती मेसेज पाठवीत होती. ते फारच विनोदी असे वाटेल परंतु सत्य हे आहे आपण लवकरच ती पीढी होणार आहोत जे अडथळ्याचेव्यसनीअसतील.
अडथळे आपल्या क्षमतेला हानी पोहचवितात की जे बोलले गेले आहे त्यास ऐकावे. हे मग आपले संबंध शारीरिक व आध्यात्मिक असे दोन्ही मध्ये त्याच्या गुणवत्तेवर परिणाम करते. केंद्रितराहून विचार करण्याच्या आपल्या क्षमतेवर सुद्धा ते हानी करते.
अडथळ्यामुळे अनेक लोकांनाशांत राहणे, प्रार्थना करणे, व मनन करणे अशक्य वाटते. याचा अर्थ हे एक आध्यात्मिक धोका आहे, एक दुष्टता ज्याकडून आपल्याला देवाच्या सुटकेची गरज आहे.
अडथळा कसे व्याख्यीत करू शकता?
अडथळ्याची माझी व्याख्या ही आपले लक्ष हे काहीतरी जे मोठया महत्वाचे आहे त्यापासून काहीतरी जे कमी महत्वाचे आहे त्याकडे लावणे होय.
अडथळा इतका धोक्याचा का आहे?
सर्वात धोक्याची समस्या ही स्वयं परमेश्वराकडून अडथळा होणे- आपली वृत्ती कीआपल्या जीवनातील महान व्यक्तीकडून आपले लक्ष वेगळे करून कमी महत्वाच्या गोष्टीकडे लावणे होय. बायबल यास मूर्तीपूजा अस म्हणते.
तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, "प्रभुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भर टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करावयास तिला सांगा." (मार्क १०:४०)
लक्षात घ्या मार्था ही गडबडली होती, काहीतरी वाईट मध्ये नाही. ती चांगली गोष्टीमध्ये गडबडली होती ज्याने तिचे लक्ष उत्तम-येशू कडून काढून घेतले होते. पुन्हा, अडथळ्याची दुसरी व्याख्या, चांगले तुम्हाला उत्तमते कडून दूर नेते.
प्रभूने जे करण्यासाठी तुम्हाला बोलाविले आहे त्यापासूनअनेक गोष्टी करणे हे तुम्हाला अडथळा करू शकतात. ह्याच ठिकाणी मला समस्या होती परंतु प्रभूने दयेने मला साहाय्य केले. माझ्या पूर्वीच्या दिवसांत, मला सर्व काही करावयास पाहिजे होते.
केवळ या कारणासाठी इतर कोणी काही करीतआहे म्हणून तुम्ही तसे करू नये. परमेश्वर तुम्हाला काय सांगत आहे ते करा.कधीकधी सर्वात कठीण गोष्ट करणेहे परमेश्वराने जे करण्यास तुम्हाला बोलाविले आहे त्याकडे लक्ष देणे आहे.
"प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे, मार्थे, तूं पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेनेचांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही." (लूक १०:४१-४२)
जेव्हा आपण नियमितपणे कशाने तरी अडखळले जातो, आपल्याला त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले पाहिजे कारण ते आपल्या आंतरिक हृदयाची स्थिती प्रगट करते. लक्षात ठेवा, अडथळा, हा अभिषेक विरोधात नंबर १ का शत्रू आहे याउलट लक्ष केंद्रित करणे ही सामर्थ्याची किल्ली आहे.
प्रार्थना
पित्या, मी तुला धन्यवाद देतो की तू मला अंधाराच्या राज्यातून सोडविले आहे आणि मला तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताच्या राज्यात स्थानांतरीत केले आहे. माझ्या विरोधातील अडथळ्याची प्रत्येक शक्ति, येशूच्या नांवात कापून टाकली जावो.
धन्यवादित पवित्र आत्म्या, मला समर्थ कर की जे सर्व काही करण्यास तूं मला बोलाविले आहे त्याकडे लक्ष दयावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तो शब्द पाळ● जीवन हे रक्तात आहे
● प्रेमाद्वारे प्रेरित व्हा
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो
● प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
● वातावरणावर महत्वाची समज - २
● दुष्ट आत्म्यांचे प्रवेशाचे मार्ग बंद करणे- ३
टिप्पण्या