डेली मन्ना
अन्य भाषे मध्ये बोलणे हे आंतरिक आरोग्य आणते
Sunday, 7th of April 2024
29
20
869
Categories :
पवित्र आत्म्याची भेट
१ करिंथ. १४:४ मध्ये प्रेषित पौल घोषित करतो, “अन्य भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो.”
हे शक्तिशाली वचन अविश्वसनीय सत्य प्रकट करते- जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही व्यक्तिगत सुधारणा आणि वाढीच्या अनुभवाची अपेक्षा करू शकता. एका आदरणीय सेवकाने याचे योग्यपणे वर्णन केले आहे- अन्य भाषेत बोलणे हा पवित्र आत्म्याचा तुमच्या स्वतःच्या सुधारणेसाठी कार्यक्रम आहे.
याचा अर्थ तुमच्या आध्यात्मिक जीवनात तुम्ही किती विकास आणि प्रगती करता त्याला काहीही मर्यादा नाही. जेव्हा तुम्ही ह्या दैवी स्त्रोतामध्ये कार्य करता तेव्हा कोणताही व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्या प्रगतीला अडथळा करू शकत नाही. बायबल आपल्याला खात्री देते, “ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे” (२ करिंथ. ४:७). देवाने त्याचा अनमोल खजिना आपल्यात ठेवला आहे, त्याचे मातीचे भांडे. तथापि, हा खजिना आपल्याला सहज उपलब्ध असला तरी तो थोड्याच लाभाचा ठरेल जर आपण त्याच्या साहाय्याने कार्य करणार नाही.
हे येथेच अन्य भाषेत बोलण्याचा विषय येतो. जेव्हा तुम्ही अन्य भाषेत बोलता, तेव्हा तुम्ही हा खजिना उघडता आणि त्याचा वापर करता, आणि तुमच्या जीवनाला उल्लेखनीय मार्गाने संपन्न करता आणि वाढवता. जेव्हा तुम्ही आत्म्यात प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करता, तेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे हे तुम्ही पाहू लागाल. देवाचे वचन पुष्टी करते, “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा” (यहूदा १:२०). अन्य भाषेत प्रार्थना करणे हे तुमच्या विश्वासात उन्नती आणि समर्थ करण्यासाठी शक्तिशाली साधन आहे.
अन्य भाषेत प्रार्थना करण्याचा एक सर्वात लक्षणीय लाभ हा जे आंतरिक स्वास्थ्य तो आणतो ते आहे. पुष्कळ व्यक्तींनी अन्य भाषेत बराच वेळ प्रार्थना करण्यात व्यतीत केल्यानंतर गहन भावनात्मक बरे होण्याच्या अनुभवांची साक्ष दिली आहे. त्यांनी स्वतःला अश्रू आवरता आले नाही असेच नेहमी पाहिले आहे, जरी ते पूर्णपणे त्याचा अर्थ समजू शकलेले नाही. हे याकारणासाठी की जेव्हा तुम्ही आत्म्यात प्रार्थना करता तेव्हा पवित्र आत्मा तुमच्या भूतकाळातील जखमा आणि व्रणांना हळुवारपणे बरे करत आहे. तो तुमच्या आत्म्यामधील मोडलेल्या ठिकाणांना सुधारत आहे.
बायबल आपल्याला सांगते, “तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत” (रोम. ८:१६). जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला साक्ष देतो, देवाचे मुल म्हणून तुमच्या ओळखीची पुष्टी करतो. तो तुम्हांला ख्रिस्तामधील तुमची पात्रता आणि मूल्याची पुन:शास्वती देतो. इतरांची प्रभावीपणे सेवा सक्षमपणे करण्यासाठी आणि तुमच्या सर्वांगीण कल्याणासाठी आंतरिक बरे होणे आणि त्याची पुष्टी होणे हे महत्वाचे आहे.
लक्षात ठेवा, उन्नती करणे हे निर्माण करणे आणि सशक्त करण्याची प्रक्रिया आहे. फक्त जेव्हा तुम्ही बरे झालेले आहात केवळ तेव्हाच पूर्णपणे तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराला खरोखर प्रोत्साहन देऊ शकता आणि निर्माण करू शकता. प्रेषित पौल उपदेश देतो, “म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा; असे तुम्ही करतच आहात” (१ थेस्सल. ५:११). जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करताना बरे होणे आणि वाढीचा अनुभव करता, तेव्हा तुम्ही इतरांच्या विश्वासाच्या प्रवासात त्यांचे सांत्वन आणि उन्नती करण्यास उत्तमरित्या सज्ज असाल.
याशिवाय, अन्य भाषेत बोलणे हे आध्यात्मिक ताजेतवाने आणि संजीवित होण्याचे माध्यम आहे. यशया २८:११-१२ स्पष्ट करतो, “तोतऱ्यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल; तो त्यांना म्हणाला होता, ‘ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा घ्या; त्याने त्याला आराम होईल, तरी ते ऐकतना.” जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही आध्यात्मिक विसावा आणि ताजेतवाने होण्याची ठिकाणी प्रवेश करता. ही ती वेळ आहे जेव्हा तुम्ही आयुष्याचे ओझे आणि चिंतांना बाजूला ठेवू शकता आणि सरळपणे देवाच्या सान्निध्यात रमून जाता.
म्हणून, जर तुम्हांला आंतरिक बरे होणे, आध्यात्मिक वाढ, किंवा सरळपणे देवाकडून संजीवित होण्यासाठी स्पर्शाची आवश्यकता असेल, तर मग अन्य भाषेत प्रार्थना करण्याच्या प्रवासात नियमितपणे सुरुवात का करू नये. दररोज आत्म्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी एक वेगळा वेळ निश्चित करून ठेवा, हा विश्वास ठेवत की देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे कार्य करत आहे. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुमच्या जीवनात उल्लेखनीय बदल पाहण्याची अपेक्षा करा. शांती, आनंद आणि सर्वांगीण कल्याणाचा मोठा परिमाण अनुभव करण्याची अपेक्षा करा.
लक्षात ठेवा, “जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणीत करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवील” (२ करिंथ. ९:१०). अन्य भाषेत प्रार्थना करण्याचे बी जेव्हा तुम्ही पेरता, तेव्हा देव तुमच्या जीवनात फळ बहुगुणीत करील, आध्यात्मिक आशीर्वाद आणि आंतरिक बरे होण्याचे विपुल आशीर्वाद आणील. म्हणून, चला आपण या अविश्वसनीय वरदानाला आत्मसात करू या आणि त्याला आपल्या प्रार्थनेच्या जीवनाचा नियमित हिस्सा करू या, हे जाणून की देवाने जो खजिना आपल्यात ठेवला आहे त्याला उघडण्यासाठी ती एक किल्ली आहे.
अंगीकार
येशू ख्रिस्ताच्या नांवात मी आदेश व घोषणा देतो, जेव्हा मी अन्य भाषे मध्ये प्रार्थना करतो. मी त्या संपत्ति मधून घेईन जे देवाने माझ्या आंतमध्ये जतन करून ठेवले आहे. मी माझे आरोग्य प्राप्त करीत आहे जेव्हा मी अन्य भाषे मध्ये बोलत आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण● चला आपण परमेश्वराकडे वळू या
● येशूचे रक्त लावणे
● भूतकाळातील कपाट उघडणे
● आपल्या निवडींचा प्रभाव
● जीवनाचे पुस्तक
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
टिप्पण्या