डेली मन्ना
अन्य भाषेत बोला व प्रगती करा
Monday, 8th of April 2024
32
21
773
Categories :
पवित्र आत्म्याची भेट
प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर [प्रगती करा व एखादया वास्तू प्रमाणे उंच व उंच वाढा] स्वतःची रचना करा [स्थापित व्हा]; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. (यहूदा २०)
तुम्ही जेव्हा अन्य भाषे मध्ये प्रार्थना करता, तुम्ही प्रगती करता व एखादया वास्तू प्रमाणे उंच व उंच वाढत जाता. याचा अर्थ तुम्ही प्रगती करता जोपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही! तुम्ही जेव्हा एखाद्या वास्तू चा संदर्भ देता, तुम्ही त्यासाठी खाली पाहत नाही, तर तुम्ही त्यासाठी नेहमीच वर पाहता. त्याप्रमाणे तुम्ही होता. तुमच्या जीवनातील प्रतिष्ठा ही सुधारते. तुमचा प्रभाव व छाप कडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही, मग याची पर्वा नाही की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये सहभागी आहात.
तसेच ही वास्तू ही एक आध्यात्मिक रचना आहे. एक रचना जी अभिषेकला धरून राहू शकते-देवाचे तेल. २ राजे ४:१-७ जर तुम्ही वाचले, एके दिवशी संदेष्टा अलीशा ने एक विधवा व तिच्या मुलाला कर्जातून बाहेर येण्यास साहाय्य केले. त्याने त्यांना एक सामान्य सुचना दिली की जा व त्यांच्या शेजाऱ्यांकडून भांडे गोळा करू आणावे, दार बंद करावे व जे तेल तिच्याकडे आहे ते तिने त्या भांडयामध्ये ओतावे.
ह्या चमत्काराचा सर्वात मनोरंजक भाग हा आहे की तेल वाढण्याचे तेव्हाच थांबले जेव्हा तेथे कोणतेही भांडे शिल्लक राहिले नाही. कधी कधी मी कल्पना करतो की तिने जर सिरीया व मिसर मधील सर्व भांडे जर गोळा केली असती, तेव्हा मग तेल हे तरीही वाहिले असते. तेल ही समस्या नव्हती. तेल हे भांड्यांच्या अभावामुळे थांबले. आज सुद्धा परमेश्वर भांड्यांना शोधत आहे ज्यांच्यामध्ये तो ओतू शकतो.
अन्य भाषे मध्ये प्रार्थना करणे हे आध्यात्मिक रचना बनविण्यास साहाय्य करते, जे देवाच्या मौल्यवान अभिषेकला धरून ठेवते.
शब्द "उन्नति" हा तोच अर्थ देतो जसे एक बैटरी ही चार्ज केली जाते. अन्य भाषे मध्ये बोलणे हे "आध्यात्मिक सामर्थ्याने भरणे" हा प्रकार देताना दिसते.
आपल्यापैंकी अनेकांजवळ कमकुवतपणा आहे. तुम्ही त्यास "चारित्र्यातील चुका" म्हणू शकता. तुम्ही त्या कशा हाताळता? तुम्ही स्वतःची वाढ करता. तुम्ही जेव्हा अन्य भाषे मध्ये बोलता तेव्हा शुद्धीकरणाची प्रक्रिया तेथे घडते. अन्य भाषे मध्ये प्रार्थना करण्यास सुरुवात करा. तुमच्या स्वतःची अधिक वाढ करा.
अंगीकार
येशूच्या नांवात मी आदेश व घोषणा देतो, जेव्हा मी अन्य भाषे मध्ये प्रार्थना करतो, मी प्रगती करेन व एखादया वास्तू प्रमाणे अधिक व अधिक वाढेन. मी ते पात्र होईन जे देवाच्या सामर्थ्याला घेऊन चालेल व हजारो लोकांना आशीर्वाद होईन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ताबरोबर बसलेले● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-२
● स्वतःवरच घात करू नका
● स्वैराचारास पूर्ण उपाय
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● आदर व ओळख प्राप्त करा
टिप्पण्या