डेली मन्ना
मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा
Tuesday, 16th of April 2024
28
17
609
मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा
“तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल.” (मत्तय ६:३-४)
ओळख प्राप्त करून घेण्याचे धोके
आपल्या ख्रिस्ती जीवनात, इतरांची मान्यता आणि प्रशंसा प्राप्त करून घेण्याच्या सापळ्यात सापडणे हे सोपे आहे. आपण ओळख प्राप्त करून घेणे किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांकडून खास वागणूक प्राप्त करून घेण्याच्या हेतूने प्रभूचे काम सोडून देण्याच्या मोहात पडू शकतो. तथापि प्रभू येशूने अशा विचारांविरुद्ध मत्तय ६:१ मध्ये आपल्याला हे म्हणत इशारा दिला आहे, “माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.”
जेव्हा आपण आपल्याकडे लक्ष द्यावे ह्या हेतूने दानधर्म करतो, तेव्हा आपण एक क्षणिक, तात्पुरते सार्वकालिक पुरस्कारासाठी व्यवहार करत आहोत. इतरांकडून अभिनंदन आणि प्रशंसा त्याक्षणी चांगल्या वाटू शकतात परंतु आपल्या स्वर्गीय पित्याला आपण प्रसन्न करत आहोत हे जाणण्याच्या आनंदाच्या तुलनेत ते धूसर होतात.
गुप्तपणे दानधर्म करण्याची सुंदरता
प्रभू येशू गुप्तपणे दानधर्म करण्याची सूचना देत आहे, त्यामध्ये आपला डावा हात काय करत आहे हे उजव्या हाताला कळू नये (मत्तय ६:३). याचा अर्थ आपण गुप्तपणे दानधर्म करावे; कोणताही गाजावाजा न करता किंवा स्वतःला बढावा न देता. जेव्हा आपण अशा प्रकारे दानधर्म करतो, तेव्हा आपण देवावरील आपल्या विश्वासाला आणि सर्वांपेक्षा त्याला ओळखण्याची आपली इच्छा दर्शवत असतो.
२ करिंथ. ९:७ मध्ये प्रेषित पौलाने हे म्हणत या भावनेला प्रतिध्वनित केले आहे, “प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” आपले दानधर्म करणे हे देवाप्रती उस्फुर्त अंत:करण व कृतज्ञतेने झाले पाहिजे, कर्तव्याच्या अप्रसन्न विचाराने किंवा वैयक्तिक लाभाच्या इच्छेने नाही.
पित्याचा पुरस्कार
जेव्हा आपण शुद्ध हेतूने आणि प्रसन्न अंत:करणाने गुप्त दानधर्म करतो, तेव्हा आपण भरवसा ठेवू शकतो की आपला स्वर्गीय पिता पाहतो आणि उघडपणे आपल्याला पुरस्कार देईल (मत्तय ६:४). हा पुरस्कार जगिक संपत्ती किंवा प्रशंसेच्या प्रकारात असणार नाही तर त्याऐवजी देवाबरोबर आपल्या नातेसंबंधाचा गहनपणा आणि स्वर्गात आपण संपत्ती साठवत आहोत हे जाणण्याच्या आनंदातून येतो. (मत्तय ६:२०)
लूक ६:३८ मध्ये, प्रभू येशू आश्वासन देतो, “द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.” जेव्हा आपण उदारपणे आणि गुप्तपणे दानधर्म करतो, तेव्हा आपण भरवसा ठेवू शकतो की देव आपल्याला विपुलपणे आशीर्वादित करेल, साधनसंपत्तीने नाही परंतु त्याच्या उपस्थितीच्या संपत्तीने आणि त्याने जे सर्वकाही आपल्यावर सोपवले होते त्याचे विश्वासू कारभारी ठरलो आहोत हे जाणण्याच्या समाधाने.
नम्रपणे दानधर्म करण्याचे अंत:करण जोपासणे
मनुष्याकडून प्रशंसा प्राप्त करवून घेतल्यावाचून दानधर्म करण्यासाठी आपल्या स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी आपल्या दृष्टीकोनात बदल आणि आपल्या मनाच्या सतत नवीकरणाची आवश्यकता लागते. आपण हे कसे करू शकतो? रोम. १२:२ आपल्याला सांगते, “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या.” आपण आपल्या स्वतःला नियमितपणे याची आठवण करून दिली पाहिजे की आपले अंतिम ध्येय हे देवाला प्रसन्न करणे आणि त्याच्या नावाला गौरव आणणे आहे, आपल्या स्वतःची प्रतिष्ठा किंवा दर्जा वाढवणे नाही.
नम्रपणे दानधर्म करण्याचे अंत:करण जोपासण्यासाठी एक व्यवहारिक मार्ग हा कलस्सै. ३:२३-२४ ह्या वचनांचा प्रार्थनापूर्वक विचार करणे आहे, “आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा.” ख्रिस्तावर आणि आपल्या सार्वकालिक वारशावर आपले डोळे केंद्रित करण्याने मनुष्याकडून क्षणभंगुर प्रशंसा मिळवण्याच्या मोहाचा आपण सहजपणे प्रतिकार करू शकतो.
म्हणून देवाच्या कार्यासाठी दानधर्म करण्याच्या आपल्या हेतूचा विचार करावा. गुप्तपणे, शुद्ध अंत:करणाने आणि आपल्या स्वर्गीय पित्याला प्रसन्न करण्याच्या गहन इच्छेने आपण प्रयत्न करावा. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण भरवसा ठेवू शकतो की तो आपल्याला उघडपणे पुरस्कृत करेल, केवळ या जीवनातच नाही तर येणाऱ्या जीवनात देखील. चला आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याकडे पाहत राहावे, (इब्री. १२:२), आणि संतोषाने आणि उदारपणे दानधर्म करावे, हे जाणून की आपला खरा पुरस्कार हा सार्वकालिकतेमध्ये आपल्याला मिळणार आहे.

प्रार्थना
स्वर्गीय पित्या, संतोषाने आणि उदारपणे दानधर्म करणारे अंत:करण मला दे, केवळ तुझी मान्यता आणि गौरवाचा धावा करावा. माझे अर्पण हे तुझ्या दृष्टीसमोर मधुर सुवास आणि प्रसन्न करणारे व्हावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याची इच्छा पूर्ण करण्याचे महत्त्व● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
● तुम्ही येशू कडे कसे पाहता?
● दैवीव्यवस्था-२
● तुम्ही किती विश्वसनीय आहात?
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-१
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- २
टिप्पण्या