ख्रिस्ती जीवनात, खरा विश्वास आणि गृहीत धरण्याच्या मुर्खतेमध्ये पारख करणे हे महत्वाचे. अभिवचन असलेल्या देशात प्रवेश करण्याचा इस्राएलाच्या कथेचा गृहीत धरण्याचा प्रयत्न, गणना १४:४४-४५ मध्ये नोंदला आहे, जो देवाच्या निर्देशावर भरवसा ठेवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार कार्य करण्याच्या विरोधात कडक इशारा म्हणून काम करते. चला आपण विश्वास आणि गृहीत धरणे यामधील फरकावर स्पष्टीकरण पाहू या आणि इस्राएलाच्या चुकापासून शिकू या.
विश्वासाचे स्वरूप
विश्वास हा देवाकडून अभिवचनाने सुरु होतो. जसे इब्री. ११:१ स्पष्ट करते, “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे.” विश्वास हा त्या खात्रीमध्ये रुजलेला आहे की परिस्थिती ही कठीण दिसत असतानाही, देव त्याचे वचन पूर्ण करेल. अब्राहामाने या विश्वासाचे उदाहरण दिले जेव्हा तो वृद्ध झालेला असतानाही त्याला पुत्र होईल या देवाच्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला. (रोम. ४:१८-२१)
याशिवाय, विश्वास हा देव-केंद्रित आहे, जो त्याला गौरव आणण्यास पाहतो. योहान ११:४०मध्ये, येशूने मार्थाला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” खरा विश्वास स्वीकार करतो की देवाच्या योजना आणि उद्देश आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. (यशया ५५:८-९)
विश्वास देखील नम्रतेने दर्शविला जातो. मत्तय ८:८ मधील शताधिपतीने हा नम्र विश्वास दर्शवला जेव्हा त्याने येशूला हे म्हटले, “प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.” विश्वास देवावरील आपल्या विसंबून राहण्यास ओळखतो आणि त्याच्या अधिकाराच्या अधीन होतो.
शेवटी, विश्वास देवाची वाट पाहतो आणि त्याच्या वेळेला शरण जातो. दाविदाने, शौलाला मारण्याची संधी समोर आलेली असतानाही देवाच्या वेळेची वाट पाहण्याची निवड केली आणि त्याच्या सुटकेमध्ये विश्वास ठेवला (१ शमुवेल २६:१०-११). विश्वास भरवसा ठेवतो की देवाचे मार्ग सिद्ध आहेत, जरी जेव्हा ते आपल्या स्वतःच्या अपेक्षेंपेक्षा भिन्न असतात.
गृहीत धरण्याचे धोके
विश्वासाच्या विरोधात, गृहीत धरणे हे वैयक्तिक इच्छेने सुरु होते. इस्राएली लोकांना, त्यांच्या अविश्वासामुळे जेव्हा सांगण्यात आले की ते अभिवचन दिलेल्या देशात प्रवेश करणार नाहीत, तेव्हा त्यांनी अचानकपणे वर जाऊन लढण्याचा निर्णय केला (गणना १४:४०). त्यांचे कृत्य देवाच्या आज्ञेवर नाही, तर त्यांच्या इच्छेवर आधारित होते.
गृहीत धरणे हे मनुष्य-केंद्रित आहे, जे देवाच्या गौरवापेक्षा देवाकडून आपल्याला काय पाहिजे यावर केंद्रित असते. प्रेषित. ८:१८-२३मध्ये, शिमोन जादुगाराने त्याच्या स्वतःच्या लाभासाठी पवित्र आत्म्याची शक्ती विकत घेण्याचा प्रयत्न केला, हे गृहीत धरून की देवाचे कृपादान हे स्वार्थी उद्देशासाठी प्राप्त केले जाऊ शकते.
गृहीत धरणे हे उद्धट आणि मागणी करणारे आहे, देवाने काय केले पाहिजे याचा आदेश देते. परुश्यांनी गृहीत धरून येशूकडून चिन्हाची मागणी केली, नम्रपणे त्याचा धावा करण्याऐवजी त्याची परीक्षा पाहिली (मत्तय १२:३८-३९). गृहीत धरणे देवाला जिन्न समजते आणि आपल्याकडून आज्ञाधारकपणा हवा असलेल्या सार्वभौमिक परमेश्वरा ऐवजी आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात असे त्याला वाटते.
गृहीत धरण्याचे परिणाम
परमेश्वर आपल्यासोबत आहे असे गृहीत धरणे हे जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या इच्छेने कार्य करतो तेव्हा ते विनाशाकडे नेते. इस्राएली लोकांनी हा वेदनादायक धडा शिकला होता जेव्हा त्यांना अमालेकी आणि कनानी लोकांना पराभूत केले (गणना १४:४५). त्यांच्या गृहीत धरण्यामुळे लाजीरवाणा पराजय आणि जीवितहानी झाली.
त्याचप्रमाणे, जेव्हा आपण देवाच्या कृपेला गृहीत धरतो आणि अवज्ञामध्ये जगतो, तेव्हा आपण शिस्त आणि कठीण प्रयासाला आमंत्रित करतो. जसे नीतिसूत्रे १३:१३ इशारा देते, “वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यास चांगले प्रतिफळ मिळते.” गृहीत धरण्याने आध्यात्मिक पराजय होतो आणि देव आपल्याला देणार असलेले आशीर्वाद हिरावून घेतो.
खरा विश्वास जोपासणे
गृहीत धरण्याच्या सापळ्याला टाळण्यासाठी, आपण खऱ्या विश्वासाची जोपासना केली पाहिजे. आपल्या स्वतःला देवाच्या वचनात मग्न करून घेण्याने हे सुरु होते, “तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन देण्यास समर्थ आहे” (प्रेषित. २०:३२). जेव्हा आपण आपल्या मनात वचन ठेवतो, तेव्हा आपण देवाच्या इच्छेला ओळखण्यास शिकतो आणि त्याच्या इच्छेशी आपल्या इच्छेला समरूप करतो.
आपण ज्ञान आणि मार्गदर्शनासाठी देखील प्रार्थना केली पाहिजे, जसे याकोब १:५ उपदेश देते, “जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो.” प्रार्थनेने, आपण देवासमोर आपल्या स्वतःला नम्र करतो, आणि आपल्या स्वतःच्या समजेवर विसंबून राहण्याऐवजी त्याच्या मार्गदर्शनाचा धावा करतो. (नीतिसूत्रे ३:५-६)
शेवटी, आपण देवाच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे, जरी जेव्हा ते आपल्या स्वतःच्या इच्छेला आव्हान देते. लूक ६:४६मध्ये येशूने इशारा दिला, “तुम्ही मला प्रभू, प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही?” खरा विश्वास हा केवळ ओठाने नाही तर आज्ञापालन करून दर्शविला जातो.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, विश्वास आणि गृहीत धरण्यामध्ये फरक करण्यासाठी मला ज्ञान प्रदान कर. तुझ्या अभिवचनांवर भरवसा ठेवणे, तुझ्या गौरवाचा धावा करणे, आणि तुझ्या इच्छेला नम्रपणे अधीन होण्यासाठी मला मदत कर. तुझी कृपा आणि चांगुलपणासाठी माझे जीवन साक्ष व्हावे असे होऊ दे. येशूच्या नावाने, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्ही आणि मी देवाची स्तुति का केली पाहिजे?● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे
● अगापेप्रीति मध्ये कसे वाढावे
● हुशारीने कार्य करा
● काही पुढाऱ्यांचे पतन होते याकारणामुळे आपण माघार घेतली पाहिजे काय?
● आपल्या हृदयाचे प्रतिबिंब
टिप्पण्या