लहान असताना, माझी आईमला नेहमीच बोलत असे की चांगल्या प्रकारचे मित्र बनव. मग ते माझ्या शाळेतील असो किंवा ज्यांच्याबरोबर मी खेळतो ते असो. पण मी वीस वर्षाचा होईपर्यंत तसे केले नाही पण त्यानंतर ते प्रत्यक्षात समजले की माझी आई काय सांगण्याचा प्रयत्न करीत होती.
फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते. (१ करिंथ १५:३३)
योग्य व्यक्तींबरोबर वेळ घालविण्याचे निवडणे हे जीवनात सर्वात महत्वाचे निर्णय तुम्ही करू शकता. हाएक सर्वात महत्वाचा व्यवहारिक भागसुद्धा होऊ शकतो की तुमच्या जीवनासाठी देवाची वाणी व त्याच्या इच्छेची पारख करण्यास सुरुवात करावी.
नीतिसूत्रे १३:२० म्हणते, "सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खाचा सोबती कष्ट पावतो."
देवाला पाहिजे की तुमच्या जीवनात लोकांना घेण्याविषयी, मग ते मित्र, व्यवसायातील लोक किंवा जोडीदार असो, त्याविषयी तुम्ही सुज्ञ निर्णय करावेत. योग्यव्यक्ति शोधणे हेतुमच्या जीवनासाठी देवाची इच्छा निश्चित करण्याचा महत्वाचा भाग आहे.
प्रत्येक वेळी परमेश्वर आपल्या जीवनात काहीतरी महत्वाचे करतो, तो आपल्याला नवीन व्यक्तींशी मिळवितो- ते जे आपले अंतिम ठिकाण व उद्देशासाठी जुडलेले असतात. देवाची वाणी ओळखण्यास शिकणे व त्याच्या मार्गदर्शनानुसार चालणे हे तुम्हाला वाईट संबंधातून बाहेर काढेल आणि तुम्हांला योग्य व्यक्तींच्या संपर्कात आणेल.
लोक ज्यांच्याबरोबर तुम्ही तुमचा अधिकतर वेळ घालविता ते एकतर तुमच्या वाढीसाठी किंवा पतन ला जबाबदार असतील. म्हणून हे महत्वाचे आहे कीतुमच्या भोवती योग्य व्यक्ति असावेत.
दोन मार्ग की तुमच्या भोवती योग्य व्यक्ति मिळवावे.
प्रथम गुण जे तुम्हीपाहायचे आहे ते की तुमचे गुणधर्म जुळत आहेत. त्या लोकांचा शोध घ्या ज्यांचे गुणधर्म तुमच्याशी मेळ ठेवतात. जर तुम्ही प्रार्थनेला महत्त्व देता तर लोक ज्यांच्याशी तुम्ही संपर्क ठेवता ते प्रार्थनेला महत्त्व देणारे लोक असले पाहिजेत. आणि ही यादी वाढतच जाऊ शकते. मला आशा आहे की मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते तुम्हाला समजले असेन.
दुसरे हे की आग्रहपूर्ण प्रार्थना करणे, "परमेश्वरा, मला योग्य व्यक्तींद्वारे घेऊन ठेव. मला योग्य व्यक्तींशी जोड. तोच परमेश्वर ज्याने वाळवंटात पक्षी पाठविले तो खात्रीने तुमच्या भोवती योग्य व्यक्ति पाठवेल.
हे भविष्यात्मक वचन पाळा व पाहा की तुमचे जीवन वरच्या स्तराला जाईल.
प्रार्थना
पित्या, माझ्या जीवनात मला पारख करण्याचे दान दे. मला वाईट लोकांपासून योग्य व्यक्ति जाणण्यास साहाय्य कर व मला त्यांच्याबरोबर जोड जे तुझ्या राज्याची वाढ करीत आहेत. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● भविष्यात्मक मध्यस्थी काय आहे?● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे
● देवाच्या प्रेमाचा अनुभव घेणे
● मी प्रयत्न सोडणार नाही
● रागावर उपाय करणे
● वाईट विचारांवरील युद्ध जिंकणे
● विश्वसनीय साक्षी
टिप्पण्या