सारफथ येथे एक बाई होती. तिचा नवरा मरण पावला होता, आणि आता ती आणि तिचा मुलगा उपाशी मरत होते. ते व्यापक दुष्काळाचे बळी ठरले. त्यांना जाण्यासाठी कोठेही जागा नव्हती आणि त्यांच्या दुर्दशेबद्दल ते काहीही करु शकत नव्हते. अशा परिस्थितीत देवाने आपला संदेष्टा एलीया, त्यांच्याकडे पाठविला.
ती स्त्री पाणी आणण्यास जात असताना एलीयाने तिला बोलविले आणि तिला म्हणाला. “कृपया माझ्यासाठी भाकरीचा तुकडा देखील घेऊन ये.” तिच्या चेहऱ्यावर कदाचित एक चिंताग्रस्त भाव होता कारण दीर्घकाळच्या दुष्काळामुळे तिचे अन्न संपत चालले होते.
“माझ्याकडे मुळीच भाकर नाही — केवळ मडक्यात एक मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल आहे. मी घरी जाऊन माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी जेवण बनवण्यास काही काटक्या गोळा करीत आहे, यासाठी की आम्ही ते खाऊ - आणि मग मरु. ” विधवा म्हणाली. मग देवाचा संदेष्टा बोलला: देवाचा माणूस बोलला
१३ आणि (संदेष्टा) एलीया तिला म्हणाला, “घाबरू नकोस. जा आणि तू म्हणतेस तसे कर. परंतु पहिल्यांदा त्यातून माझ्यासाठी एक लहान भाकर तयार कर आणि माझ्याकडे ती घेऊन ये. आणि नंतर आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी तयार कर..
१४ परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत “पीठाचे मडके रिकामे होणार नाही, व कुपीतील तेल आटणार नाही.”
१५ मग ती गेली व एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले; आणि तिचा व तिच्या परिवाराचा यावर बऱ्याच दिवस उदरनिर्वाह झाला.
१६ परमेश्वराने एलीयाला सांगितल्याप्रमाणे पीठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. (१ राजे १७ :१३-१६)
शेवटचे जेवण विधवा व तिच्या मुलासाठी पुरेसे नव्हते, परंतु तिने आपल्याकडे असलेल्या थोडक्यातून दिले व त्यामुळे ती वाढीच्या आणि संपन्नतेच्या राज्यात आली. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो, तो तुमचा आज्ञाधारकपणा सिद्ध करण्यासाठी आणि त्याच्यावरील तुमच्या प्रेमाच्या पातळीची परीक्षा घेण्यासाठी आपल्याकडे जे आहे ते देण्यास सांगतो. जर स्त्री देण्यास अयशस्वी ठरली असती तर, तिने तिच्या वाढीस स्वत: ला लुटले असते.
देवाचे राज्य नियमांचे संचालन करते जे भौतिक जगावर शासन करणाऱ्या नैसर्गिक नियमांपेक्षा भिन्न असते. आम्ही राज्याचे नागरिक आहोत आणि आपण स्वत: ला राज्य पद्धतींमध्ये अधोरेखित केले पाहिजे. उदाहरणार्थ, सांसारिक व्यवस्था असा विश्वास ठेवते की “पाहणे हेच विश्वासार्ह आहे ”, परंतु राज्य जीवनशैली आणि नियमानुसार “विश्वास ठेवणे म्हणजे पाहणे होय.”
वाढीचा आनंद घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत परंतु आपण दुर्लक्ष करू नये असा एक निश्चित मार्ग म्हणजे “देणे” होय. जग आशिर्वादाचे एक रूपक म्हणून “प्राप्त करणे” यावर विश्वास ठेवते, परंतु राज्यानुसार “देणे” हा आशीर्वाद आहे. आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, देवाने आपल्याला देण्याची आज्ञा दिली (लूक : ३:३८) आणि ज्यावेळी आपण देतो त्या वेळी आपण त्याच्या आज्ञा पाळत असतो आणि जे आज्ञाधारकपणे जगतात त्यांना आध्यात्मिक आणि नैसर्गिकरित्या वाहणारे आशीर्वाद प्राप्त होतात. आज्ञाधारकपणाला जोडलेले काही आशीर्वाद आपण पाहू या.
आता कृपया समजून घ्या, बर्याच जणांनी वित्तपुरवठा मर्यादित केला आहे. देणे हे ख्रिस्ती जीवनातील सर्व क्षेत्रात लागू होऊ शकते.
देण्याचे ५ मार्ग भरभराट करू शकतात
देण्याने तुमची कापणी वाढते
२ करिंथ ९:१० मध्ये असे म्हटले आहे, “जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील व ते बहुगुणीत करील आणि तुमच्या नितिमत्वाचे फळ वाढविल. प्रथम तो प्रत्येक गरज आणि त्याहीपेक्षा जास्त गोष्टी पुरवतो. तुम्ही बी पेरता त्याच वेळी तो बियाणे बहुगुणीत करतो जेणेकरून त्यामुळे तुमच्या उदारपणाची कापणी वाढेल.”
आपण जे पेरले आहे ते देणे नेहमीच बहुगुणीत होते. क्षमा, वेळ, वित्त इत्यादी असू द्या. जे तुम्ही पेरले नक्कीच त्यापेक्षा तुम्ही अधिक कापणी कराल. आपल्याकडे जे काही आहे ते वाढविण्यासाठी हा एक करारनामा आहे ही समज आपल्याला नेहमी पेरणीसाठी प्रोत्साहित करते.
अंगीकार
हे पित्या येशुच्या नावात, आज मी माझ्या आयुष्यातल्या तुझ्या विपुल पुरवठ्याची कबुली देतो. तू लिहिलेल्या तुझ्या सर्व वचनाचे मनन करत असताना, मी माझा मार्ग भरभराटीचा करीन आणि चांगले यश प्राप्त करीन. धन्यवाद पित्या , मी आत्मा, जीव, शरीर, सामाजिक आणि आर्थिकता यासारख्या कोणत्याही गोष्टीत उणे पडणार नाही.
Join our WhatsApp Channel

Most Read
● एका भेटीचे सामर्थ्य● पापाशी संघर्ष
● महाविजयीठरणे
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● ख्रिस्ताने कबरेवर विजय मिळविला आहे
● देवाच्या वचनात बदल करू नका
टिप्पण्या