४. दानधर्म करणे हे त्याच्यासाठी आपल्याला प्रीतीला वाढविते
जेव्हा व्यक्ति ख्रिस्ताला तारणारा असे स्वीकारतो, तो परमेश्वराच्या "पहिल्या प्रीतीच्या" हर्षाचा अनुभव करतो. परमेश्वराचा आत्मा त्याच्या आत्म्यासह साक्ष देतो की तो देवाचे मुल आहे (रोम ८:१६ पाहा), आणि नव्याने प्राप्त झालेले संबंध मोठा आनंद व स्वतंत्रता आणते.
दुर्दैवाने, अनेक ख्रिस्ती लोक ह्या पहिल्या प्रीतीपासून पतन पावतात जेव्हा ते त्यांच्या दररोजच्या गरजांसाठी परमेश्वरावर अवलंबून राहत नाही. ते असा विचार करतात की ही त्यांची योग्यता व कौशल्य आहे जे त्यांना यश देते.
प्रभु येशूने ह्या विषयावर विचार केला जेव्हा त्याने इफिस मधील त्याच्या मंडळीला म्हटले, येशूने म्हटले, "तरी तूं आपली पहिली प्रीति सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तूं कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर; तूं पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन." (प्रकटीकरण २:४-५)
तीन-पदरी आदेशाकडे लक्ष दया:
१. आठवण कर
२. पश्चाताप कर
३. पहिली कृत्ये कर
पश्चातापामध्ये मन, हृदय व दिशेचा बदल सामावलेला आहे. ते विचार, आचरण व कृतीचा त्याग करा ज्याने परमेश्वरावरील तुमच्या संपूर्ण मनाचे लक्ष काढून टाकले आहे. परमेश्वराची क्षमा प्राप्त करा आणि तुमच्या विश्वासाच्या "पहिल्या कृत्यांकडे" तुमचे समर्पण नव्याने करा.
पहिली कृत्ये ही अनेक महत्वाच्या प्रयत्नांचा संदर्भ देऊ शकते जसे उपासना, प्रार्थना, बायबल अभ्यास, दानधर्म, उपास व इतरांची सेवा वगैरे. ह्यातील प्रत्येक कृत्ये परमेश्वराबरोबरील आपल्या घनिष्ठतेला अधिक दृढ करते.
आपल्यासाठी त्याची प्रीति कधी बदलत नाही, परंतु, होय, दानधर्म करणे हे त्याच्यासाठी आपल्या प्रीतीला वाढवू शकते. सिद्धांत हा सरळ आहे, "जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही असेल" (मत्तय ६:२१).
५. दानधर्म करणे हे तुमच्या कृपेला वाढविते
"सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे." (२ करिंथ ९:८)
दानधर्म करणाऱ्याकडे प्राप्त करणाऱ्यापेक्षा अधिक कृपा आहे. जितके अधिक तुम्ही देता तितके अधिक परमेश्वर त्याची कृपा तुमच्यावर विपुलपणे ओततो म्हणजे तुम्ही चांगल्या कृत्यांमध्ये वाढावे.
६. दानधर्म करणे हे तुमच्या नीतिमत्तेला स्थापित करते.
आणखी एक गोष्ट जी तुमचे दानधर्म करणे करते ते हे की ते तुमच्या नीतिमत्तेला स्थापित करण्यास मदत करते: "जो 'पेरणाऱ्याला बी' पुरवितो 'व खाण्याकरिता अन्न' पुरवितो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणीत करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ' वाढवील." (२ करिंथ ९:१०)
ख्रिस्ती म्हणून आपल्या जीवनाने आपल्या स्वर्गातील पित्याला प्रदर्शित केले पाहिजे, ज्याने त्याचा बहुमोल पुत्र, येशू आपल्या तारणासाठी दिला: "देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे." (योहान ३:१६)
ह्या आशीर्वादाचा विचार घेऊन, मला खात्री आहे की तुम्ही माझ्याबरोबर सहमत व्हाल की घेण्यापेक्षा देणे ह्यांत अधिक धन्यता आहे. (प्रेषित २०:३५)
प्रार्थना
आता, परमेश्वर जो पेरणाऱ्यास बी व खाणाऱ्यास अन्न पुरवितो, त्याने प्रत्येक बी पुरवावे व बहुगुणीत करावे जे मी पेरले आहे आणि माझ्या नीतिमत्तेचे फळ वाढवावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● यातना-मार्ग बदलणारा● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● पित्याची मुलगी-अखसा
● सुंदर दरवाजा
● परमेश्वरा सोबत चालणे
● सुटकेचा दिवस (दिवस १०)
टिप्पण्या