येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हांला खचित सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला तूं उपटून समुद्रात टाकला जा, असे म्हणेल आणि आपल्या अंत:करणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. (मार्क ११:२२-२३)
अनेक वेळेला आपण आपल्या स्वतःला दु:खित परिस्थितीच्या अधीन असे पाहतो की आपण खिन्नते शिवाय काहीही पाहत नाही. जेव्हा आपल्या भोवती अशक्यतेची भिंत व शुन्यतेचा दोष असतो, विश्वासाला बोलण्याऐवजी, आपण सतत आपल्या स्वतःला भय व दहशतीच्या पोकळ शब्दांच्या भडिमार मध्ये पाहत असतो. आपल्या समस्या ह्या समुद्रासारख्या होतात ज्यामध्ये आपण असहाय्यपणे बुडत असतो.
परंतु वरील वचनावरून, तुम्ही हे समजाल की देवा सारखा विश्वास हा तो आहे जो बोलण्यामध्ये भयास कधीही स्थान देत नाही. जर तुम्हाला देवा सारखा विश्वास असेल तर जेव्हा तुम्ही गहन संकटात असता तेव्हा जे तुमच्या तोंडावाटे येते त्यास ते दाखविते व प्रगट करते. तथापि, विश्वासात बोलणे तितकेच चांगले आहे, जे आतून देवा मध्ये गहन विश्वासासह सहमती मध्ये असले पाहिजे. म्हणून, विश्वास हा देवाचा प्रकार आहे, जे अंत:करणाचे कार्य आहे जे देवा वर विश्वास ठेवते व मुख तेच बोलते. तुम्हांला देवा सारखा विश्वास असू शकत नाही आणि मग तुम्ही पराजय बोलता.
एक उतारा ज्यातून हे वचन घेतले आहे येशूने शिष्यांना उपदेश देण्यास सुरु केले होते की त्यांनी त्यांचा विश्वास देवा वर ठेवावा. येशूने शिष्यांना कारण दिले की त्यांचा विश्वास देवा मध्ये का असला पाहिजे. येथे रहस्य आहे-विश्वास जो देवा मध्ये स्थिर आहे तो त्याची सर्वसामर्थी शक्ती व सनातन चांगुलपणामध्ये अढळ विश्वासाच्या कृती मध्ये प्रदर्शित झाला पाहिजे. (मार्क ५:३४)
कल्पना करा जी अतिशयोक्ती येशूने अशक्य परिस्थिती मध्ये प्रकाश पाडण्यात वापरली आहे जो देवा सारखा विश्वास त्यावर उपाय आणू शकतो. येशूने म्हटले, "जो कोणी ह्या डोंगराला म्हणतो ..". डोंगर जो येशूने अलंकारिकरित्या वापरला तो तेथे जैतून डोंगर होता. तो डोंगर सरळपणे अढळ अडथळा प्रतिनिधित करतो. एक डोंगर इतका भक्कम आहे की त्यास हलविणे अशक्य असते. आपल्या जीवनात अशा वेळा आल्या नाहीत काय जेव्हा जेथे आपण अशा परिस्थितीला तोंड दिले आहे जे अढळ दिसते? होय!
तुम्ही हे लक्षात घेतले काय की येशूने म्हटले की त्या डोंगराला सरकविण्याचे साधन हे विश्वासाच्या वचना शिवाय इतर कोणतीही गोष्ट नाही? तुम्ही त्या अशक्य परिस्थितीला काय म्हणता ते अति महत्वाचे आहे कारण वचन मनुष्याच्या प्रत्यक्षतेच्या पायाला भक्कम करते.
येशूने पुढे म्हटले, आणि त्याने बोलले की विश्वासाचे वचन बोलणे हे अशक्य व अढळ परिस्थितीला बदलण्यासच केवळ सामर्थ्यशाली नाही; तर ते त्यास एका ठिकाणी सरकाविते जेथे मग तुम्ही त्यास पुन्हा कधीही पाहत नाही. व्वा! जीवनाच्या आवाहनांवर तो एक सुरक्षित विजय आहे. "तूं उपटला जावे व समुद्रात टाकला जावे...."
जर तुम्ही डोंगराला इतर ठिकाणी हलविले, कोणास ठाऊक, तुमचा जीवनप्रवास कदाचित एके दिवशी तुम्हाला त्या मार्गाकडून नेईल. म्हणून, येशूने म्हटले तुमचा अडथळा विश्वासाच्या वचनाद्वारे समुद्रात हलवावा जेथून पुन्हा परत येणे नाही-विशाल विजयाचे चित्र. हे कधीही विसरू नका-विश्वासाने-समर्थ प्रार्थना देवाच्या सामर्थ्याला स्पर्श करते की मानवी अशक्य गोष्टी पूर्ण कराव्या.
प्रार्थना
पित्या, तुझा धन्यवाद होवो, कारण तूं नेहमीच माझे ऐकतो. आवाहनांच्या माझ्या सर्व डोंगरांना मी आज विश्वासाने तोंड देतो. हे जाणून की कोणतीही समस्या किंवा संकट तुझ्यासाठी अशक्य नाही. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे● एल-शादाय चा परमेश्वर
● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 2
● त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार कसे व्हावे-२
टिप्पण्या