डेली मन्ना
तुमचा आशीर्वाद बहुगुणीत करण्याचा खात्रीशीर मार्ग
Sunday, 16th of June 2024
23
20
515
Categories :
साक्ष
"त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले...." (प्रकटीकरण १२;११)
परमेश्वराने तुमच्या साठी जे केले आहे त्याविषयी जेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांना सांगता, तुम्ही सरळपणे त्यांना तुमची साक्ष सांगत आहात.
काही ख्रिस्ती लोकांकडे पापमय व भयंकर जीवनशैली मधून सुटका केल्याच्या नाट्यमय साक्षी आहेत, इतरांकडे अशा साक्षी कदाचित नसतील ज्या इतक्या नाट्यमय अशा आहेत-परंतु तरीसुद्धा, देवाच्या दृष्टीसमोर त्या तितक्याच महत्वपूर्ण आहेत.
पवित्र शास्त्रात, प्रेषित पौल त्याची साक्ष वापरत आहे की त्याच्या वेळेच्या धार्मिक पुढाऱ्यांना येशू विषयी सांगावे. प्रेषितांच्या पुस्तकात त्याची कथा सुवार्ता प्रसाराचे साधन म्हणून तीन वेळा सांगितली आहे.
शोमरोनी स्त्री ची प्रभु येशू बरोबर भेट झाल्या नंतर, "ती स्त्री अतर आपली घागर तेथेच टाकून नगरांत गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले, ततो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय? तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले." (योहान ४:२८-३०)
हे केवळ तिच्या साक्षीच्या कारणामुळे अनेक जण हे प्रभु येशू ख्रिस्ता कडे वळले. हे आपल्याला सांगते की आपली साक्ष ही किती महत्वाची आहे.
येथे अनेक जण आहेत ज्यांना आशीर्वाद व नवीन वाटचाल मिळाली आहे, त्यांच्या प्रार्थनांना अद्भुत उत्तरे मिळाली आहेत परंतु त्यांनी अजूनही साक्ष दिलेली नाही. असे लोक त्यांस गौरव देण्यात चुकतात ज्याने त्यांना प्रथम आशीर्वादित केले आहे. ख्रिस्ती म्हणून, देवाने आपल्या जीवनात काय केले आहे ते सांगण्यास आपण कधीही घाबरू नये किंवा त्याची लाज बाळगू नये.
जेव्हा प्रभु येशू निघून जाण्यासाठी बोटी मध्ये बसण्यास जाणार होता, मनुष्य ज्यातून अनेक भुते काढली होती, त्याने येशूला विनंती केली की, तो त्याच्याबरोबर येऊ शकतो काय?" येशूने काय उत्तर दिले ते येथे आहे.
"आणि त्याने त्यास म्हटले, तुझ्या स्वतःच्या घरी जा [कुटुंब, नातेवाईक व मित्र] व परमेश्वराने तुझ्यासाठी किती महान कृत्ये केली आहे व तुझ्यावर सहानुभूती दाखविली व तुझ्यावर दया केली आहे [त्याने हे कसे केले आहे] ते त्यांना सांग. आणि माघारी गेला, व येशूने जी मोठी कामें त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस [दहा नगरांचा भाग] प्रांतात जाहीर करू लागला; तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. (मार्क ५:१९-२० ऐम्पलीफाईड)
जेव्हा त्या मनुष्याने देवाची आज्ञा पाळली, तो दहा नगरांसाठी आशीर्वाद झाला-केवळ त्याची कल्पना करा! तुमची साक्ष देताना जेव्हा तुम्ही देवाचे गौरव करता, तो खात्रीने तुम्हाला अधिक साक्षी देईल.
प्रार्थना
पित्या, माझ्या जीवनातील सर्व आशीर्वादासाठी मी तुला धन्यवाद देतो. ते जे माझ्या सभोवती आहेत त्यासर्वाना मी खात्रीने तुझी साक्ष देईन. हे करण्यासाठी मला कृपा पुरीव. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्रतेचे दुहेरी पैलू● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● सर्वसामान्य भीती
● युद्धासाठी प्रशिक्षण
● वाट पाहण्यामुळे एका राष्ट्राचा उद्धार केला गेला
● द्वारपाळ
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-५
टिप्पण्या