तुम्हीं स्वतःला काही गोष्टी सतत करताना पाहिले आहे काय ज्याचा कदाचित तुमच्या सध्याच्या व भविष्याच्या जीवनावर फारच वाईट परिणाम होऊ शकतो? प्रत्यक्ष दु:खाचा भाग हा आहे की जरी तुम्हाला ह्या गोष्टींविषयी ठाऊक आहे, तरी त्याचा शेवट करण्यास तुम्ही पाहू शकत नाहीत. प्रेषित पौल लिहितो, "मी प्रत्यक्षात माझ्या स्वतःला समजत नाही, कारण जे योग्य आहे ते मला केले पाहिजे, परंतु ते मी करीत नाही. त्याऐवजी, ज्याचा मी द्वेष करतो तेच करतो. (रोम ७:१५ एनएलटी)
सवयी ह्या कृती आहेत ज्या सतत वारंवार केल्या जातात. अनेक वेळेला, ह्या कृती त्याचा अधिक विचार न करता सुद्धा केल्या जातात. ह्या कृती पद्धत निर्माण करतात ज्या चांगल्या व वाईट आहेत. आयुष्याच्या दीर्घ पल्ल्यामध्ये ह्या पद्धती फारच विनाशकारक होऊ शकतात. विश्वासाचे युद्ध हे आपल्या कृती देवाच्या इच्छेशी जुळवून घेणे आहे कारण आपल्या सवयी आपल्या परिणामावर प्रभाव करतात. "खऱ्या विश्वासासाठी चांगली लढत लढ." (1 तीमथ्यी ६:१२)
देवाने आपल्या प्रत्येकाला उद्देश व पाचारणसह त्याच्या स्वरुपात व त्याच्या प्रतिमेमध्ये निर्माण केले आहे. तथापि, ते उद्देश व पाचारण ह्या पृथ्वीवर प्रगट होण्यासाठी तुम्ही व मी त्याच्या वचनानुसारच निश्चित कृती ह्या केल्या पाहिजेत. अनेक वेळेला, देहाच्या इच्छेमुळे, कोणी स्वतःला ख्रिस्ता मधील त्याच्या मूळ नियतीपासून दूर असलेल्या गोष्टी करताना पाहतो. आपला उद्देश व पाचारण पूर्ण करण्यास हे अडथळे किंवा उशीर करू शकते ज्यासाठी आपली निर्मिती केली आहे.
ह्या विनाशकारक पद्धतींना मोडण्यासाठी दोन साधी पाऊले
१. स्वीकार करा
हे स्वीकार करा की तुम्हाला स्वयं-विनाशाकडे जाण्याची सवय आहे हे सुटका होण्याच्या प्रक्रीयेमध्ये पहिले पाऊल आहे. नम्रता ही ते नाही की तुम्ही किती कमीपणा घेता परंतु ते स्वीकारणे ज्याचा तुमच्या जीवनात बदल करण्याची गरज आहे. हा खरा पश्चाताप आहे.
दाविदाने खऱ्या पश्चातापाचा अनुभव केला, जेव्हा त्याने प्रार्थना केली, "मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीति लपवून ठेविली नाही; मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तूं मला माझ्या पापदोषाची क्षमा केली." (स्तोत्र ३२:५)
२. त्याच्या आत्म्याला शरण जा
प्रतिदिवशी त्याचे वचन व प्रार्थनेद्वारे परमेश्वराचा धावा करण्यास निश्चित करा. जेव्हा आपण तसे करतो, तो आपल्याशी बोलेल, व आपल्याला उपदेश देईल की ज्या विषयांस आपण तोंड देत आहोत त्यास कसे हाताळावे. तो कृपा व त्याची पसंती मोकळी करेल. आपल्याला आत्म्या द्वारे जगण्यास बोलाविले गेले आहे आणि म्हणून आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालले पाहिजे.
म्हणून मी म्हणतो, पवित्र आत्म्याने तुमच्या जीवनास मार्गदर्शन करू दया. मग तुम्ही ते करणार नाही जे तुमचे पापमय स्वभाव इच्छा करते. पापमय स्वभावास वाईट करावयास पाहिजे, जे आत्म्याला पाहिजे त्याच्या ते अगदी विरोधात आहे. आणि आत्मा आपल्याला इच्छा देतो जे पापमय स्वभाव इच्छा करते त्याच्या विरोधात आहेत. (गलती ५:१६-१७ एनएलटी)
पश्चाताप व आत्म्याला शरण जाण्याद्वारे ह्या युद्धावर प्रभुत्व करण्यास तुमच्या हृदयाला स्थित करा. जेव्हा तुम्ही हे नियमितपणे करता, त्या वाईट पद्धती ह्या मोडतील, आणि तुमच्या जीवनासाठी देवाचा उद्देश प्रगट होताना तुम्ही पाहाल.
तुमच्यापैकी अनेक जण जे हे वाचत आहेत ते ह्या स्वयं-विनाश करण्याच्या पद्धतीवर कदाचित उपाय करण्याचा प्रयत्न करतील किंवा ते पुढे ढकलतील. परंतु ते मग पुन्हा संकटांना आमंत्रण देणे आहे. जितके कठीण ते दिसते, ह्या स्वयं-विनाश करण्याच्या पद्धतीस हाताळण्याचा उत्तम मार्ग हा आहे की त्यावर आत्ताच उपाय करावा. नाहीतर, ते तुमच्याकडे पुन्हा येतील, व तुमचा चावा घेतील. कारण तो म्हणतो, "अनुकूलसमयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले; पाहा: आताच समय अनुकूल आहे, पाहा, आताच तारणाचा दिवस आहे." (२ करिंथ ६:२)
जेव्हा तुम्ही प्रबळ आहात तेव्हा ज्यावर तुम्ही उपाय करीत नाही ते तेव्हा पुन्हा परत येईल जेव्हा तुम्ही अशक्तपणात आहात. तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
प्रार्थना
पित्या, मला तुझी कृपा पुरीव की माझ्या जीवनातील प्रश्नांवर उपाय करावा जे मला ख्रिस्ता मधील माझ्या नियतीस पूर्ण करण्यापासून लांब धरून ठेवत आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-१● दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● परमेश्वरा, मला अडथळ्यापासून सोडीव
● त्यांनातरुणच असे पकडावे
● कृपेचे प्रगट होणे
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे # 2
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका
टिप्पण्या