डेली मन्ना
काठी ज्यास अंकुर आले
Saturday, 29th of June 2024
20
17
439
Categories :
परमेश्वराची उपस्थिती
परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे त्याचे नांव लिही. (गणना १७:१-२)
लक्षात घ्या काठी ला त्याच्या स्त्रोत पासून वेगळे केले गेले होते.
स्वाभाविकपणे म्हटल्यास, काठीने वाढणे व फळ देण्याची त्याची क्षमता गमाविली होती कारण त्यास झाडापासून वेगळे केले गेले होते.
हे असे असू शकते जेव्हा तुम्ही हे वाचता,तुमच्या जीवनाचा काही भाग हा ह्या काठी प्रमाणे सुकला आहे ज्याविषयीमी आत्ताच म्हटले आहे. कदाचित तुम्हाला एक स्वप्न, दृष्टांत झाला असेन आणि ते जशी वेळ निघून गेली तसे अंधुक होऊन गेले असेन. मी विश्वास ठेवतो, तुमची कथा ही आज बदलणार आहे.
मनोरंजकपणे, प्राचीन इस्राएली संस्कृती मध्ये, एक काठी ही:
१. अधिकार व सामर्थ्याचे प्रतीक होते (निर्गम ४:२०; निर्गम ७:९-१२)
२. न्यायाचेप्रतीक होते (स्तोत्र २:९; नीतिसूत्रे १०:१३) राजदंड शी संबंधित (यहेज्केल १९:१४)
आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. (गणना १७:४)
परमेश्वराने मग मोशेला सांगितले की त्या काठ्यांना त्याच्या समक्षतेत ठेवावे-इतरत्र नाही परंतु त्याच्या समक्षतेत. याची पर्वा नाही, की तुमची परिस्थती कशी आहे, दररोज परमेश्वराच्या समक्षतेत स्वतःला नेणे. त्याचीस्तुति करीत, संगीत ऐकत वगैरे करण्याद्वारे त्याच्या समक्षतेला जपावे. त्याची समक्षता गमावू नका. ही किल्ली आहे.
दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले. (गणना १७:८)
फळ येण्याच्या तीन पायऱ्या
१. अंकुर
२. फुलणे
३. बदाम-फळ
हे सर्व घडले जेव्हा काठी रात्रभर देवाच्या समक्षतेत ठेवलेली होती. ज्यासाठी तुम्हाला वर्षे व महिने लागले, त्यास केवळ दिवस लागेल जेव्हा तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या समक्षतेत आणाल. कठीण विषयात परिणाम दिसू लागतील. परमेश्वर जलद कार्य करेल जे तुमचे मन सुद्धा कल्पना करू शकणार नाही.
मी भारताच्या ह्या राज्यात शुभवर्तमान सांगत होतो. तेथे एक स्त्री होती जी तिच्या तोंडातील कॅन्सर ने त्रासात होती. त्या संध्याकाळी, मी त्यांना तीच गोष्ट सांगितली जी मी तुम्हाला आत्ताच सांगितली आहे. तुमच्या स्वतःला परमेश्वराच्या समक्षतेत आणा. त्या संध्याकाळी ही स्त्री स्टेज वर साक्ष देण्यासाठी आली की तिचे ते कॅन्सर चे फोड फुटले आहे आणि तेथे सर्वत्र रक्तच रक्त होते. स्वयंसेवकांनी कापड आणले की ते रक्त पुसावे. प्रामाणिकपणे म्हणतो, मी थोडे घाबरलो. पुढील दिवशी ती सकाळीच हॉस्पिटल ला गेली जेथे तपासणी केली जाते. ती कॅन्सर मुक्त झाली होती. डॉक्टर सुद्धा आश्चर्यात होते.
त्याचे वचन किती सत्य आहे!
जीवनाचा मार्ग तूं मला दाखविशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. (स्तोत्र १६:११)
तुमच्या स्वतःला त्याच्या समक्षतेत आणा. तुमची कथा ही आत्ताच बदलत आहे.
प्रार्थना
स्वर्गातील पित्या, आम्ही इच्छा करतो की आमच्या जीवनात दररोज तुझीपवित्र दैवीसमक्षता अनुभवावी. आमच्याबरोबर नेहमीच राहा, आमच्या अंत:करणाला स्पर्श कर, आम्हालाआकार दे, घडीव व आम्हाला मार्गदर्शन दे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● बीज चे सामर्थ्य-१● योग्य व्यक्तीबरोबर संबंध ठेवा
● पवित्रतेचे दुहेरी पैलू
● युद्धासाठी प्रशिक्षण
● गुप्त गोष्टी समजून घेणे
● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे
● जगण्याचे चिन्ह (पद्धत)
टिप्पण्या