माझे विचार त्या दिवसांकडे जातात जेव्हा माझा मुलगा अँरोन लहान होता (साधारण ५ वर्षाचा ). प्रत्येक वेळा जेव्हा मी सुवार्ता प्रसारासाठी नगराच्या बाहेर जायचो, तेव्हा तो मला त्याच्यासाठी खेळणी घेऊन येण्यास सांगत असे. मला जाऊ देण्याची त्याची ही एक अट असे. जेव्हा मी घरी परत जात असे, तेव्हा मी खात्री करायचो की माझ्याकडे त्याच्यासाठी काही खेळणी असावी म्हणजे ती मी त्याच्यासाठी घेऊन जाईन. ती एवढी महाग नसली तरी चालेल परंतु ती एक खेळणी असावी.
आता इतर वेळा मी त्याला म्हणालो की मी तुझ्यासाठी खेळणी आणील तेव्हा त्यावर तो विश्वास ठेवतो की मी त्याच्यासाठी खेळणी घेऊन येईल. हा विश्वास प्रत्येक वेळी मी त्याला दिलेले वचन पूर्ण केल्यामुळे विकसित झाला आहे. साधारणत: जीवनात, आपण इतरांशी कसे आणि त्याउलट वागतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या सात्विकतेचा मोठा प्रभाव पडत असतो.
मनुष्याला आपले उद्देश जितके चांगले वाटतात तितके ते परिपूर्ण नसतात आणि ते उद्देश अपयशी ठरतात. एखादा खुप विश्वासु मनुष्यही प्रत्येक वेळी त्याने दिलेले वचन पाळू शकत नाही. व्यक्ती आपल्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे दिलेले वचन पाळण्यास अक्षम असु शकतात. असे आजारपण, संसाधनांचा अभाव, विलंब या गोष्टींमुळे होऊ शकते. आणि आपल्यासाठीहि असेच आहे, आपण म्हणत असलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यास समर्थ होऊ शकत नाही.
म्हणूनच पवित्र शास्त्र आपल्याला असा बोध करते की “मनुष्यावर भरंवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. (स्तोत्र ११८:८) देवाची एक महान सेविका एकदा म्हणाली, “तुमच्यासाठी असलेले देवाचे लक्ष म्हणजे तुम्ही पुर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहावे.” हेच उत्तम आहे!
पवित्र शास्त्रातील सर्वात मनोरंजक वचने गणना २३:१९ मध्ये आढळतात
“देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी,
तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा.
दिलेले वचन तो पाळणार नाही काय?
दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?
देव जे बोलतो त्या प्रत्येक गोष्टी घडवून आणण्यास तो समर्थ आहे. देव जे काही बोलतो त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. खरं तर, इब्री ६:१८ हे वचन निर्भयपणे असे प्रतिपादन करते की ‘देवाला खोटे बोलणे अशक्य आहे’. म्हणूनच, आम्ही निःसंशयपणे देवाच्या शब्दावर विश्वास ठेवू शकतो!
शास्त्रवचनांची सात्विकता ही त्या वचनाच्या लेखकाच्या सात्विकतेचे कार्य आहे आणि म्हणून तो पूर्णपणे विसंबून राहण्याजोगा आहे. आपल्या मानवी दुर्बलतेच्या आधारे आपण सर्व ठिकाणी निराशा अनुभवू शकतो, परंतू आपल्याला ही खात्री आहे की देव कधीच आपल्याला निराश करणार नाही. तो जे बोलतो ते करण्यास तो नेहमीच समर्थ आहे. जेव्हा आपण देवाच्या वचनाच्या सात्विकतेबद्दल पूर्ण खात्री बाळगतो, तेव्हा आपण त्यापासून अधिकाधिक लाभ मिळवू शकतो.
तथापि, असे काही वेळा होऊ शकते की आव्हाने येताना दिसतील, परंतु आपण देवाच्या वचनाला धरून राहू शकतो कारण आमचा विश्वास आहे की तो आपल्याला निराश करणार नाही. आपण आपले जीवन जगत असताना, देवाच्या वचनाच्या सात्विकतेला प्रतिबिंबित करा. कोणतीही परिस्थिती असो देव आपल्या जीवनाबद्दल असलेले त्याचे वचन नक्कीच पुर्ण करील, हे पाहण्यास ती धैर्याची प्रेरणा तुमच्यामध्ये असावी. त्या मुद्यांना सोडून देऊ नका. त्याविषयी प्रार्थना करत राहा आणि पाहा देव आपले वचन पुर्ण करील.
प्रार्थना
हे पित्या, आपले वचन नेहमीच तू पाळतोस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. कोणतीही परिस्थिती असो तुझ्या वचनाच्या सात्विकतेवर नेहमी अवलंबून राहण्यास मला साहाय्य कर. येशुच्या नावात. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ताने कबरेवर विजय मिळविला आहे● परमेश्वराकडून सल्ल्याची गरज
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम
● परिवर्तनाची किंमत
● चिंता करीत वाट पाहणे
● दार बंद करा
टिप्पण्या