जो कोणी येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो त्याने याची खातरी करावी की शिष्यत्व ही प्राथमिकता आहे. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे शिकविते की येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्यात किंमत मोजणे सामाविलेले आहे (महान मोती सारखी किंमत).
"तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असतां तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करिता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करिता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करावयास निघाला असतां अगोदर बसून विचार करीत नाही की, जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जातां येईल काय? जर जातां येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांस पाठवून सलोख्याचे बोलणे सुरु करील. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझ्या शिष्य होता येत नाही." (लूक १४:२८-३३)
येथे काही आहेत जे चुकीने शिकवितात की आता येथून पुढे काहीही किंमत मोजण्याची गरज नाही. होय! तारण हे मोफत आहे, आणि आपले तारण प्राप्त करण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. तथापि, प्रेषित पौलाने स्पष्टपणे सांगितले आहे, "आपले तारण साधून घ्या" (फिलिप्पै २:१२)
शुद्धीकरणाच्या प्रक्रीयेमध्ये कार्यरत राहून आज्ञाधारक राहण्याद्वारे असे का करावे. तो स्वतःचे वर्णन "ख्रिस्ता समान होण्याच्या उद्धीष्टाकडे जाण्यासाठी "प्रयत्नशील राहतो" व "त्यादृष्टीने पाऊले उचलतो" (फिलिप्पै ३:१३-१४).
लहान मुल असताना, तेथे एक शास्त्रीय काल्पनिक कथा होती जी मी टीवी वर कधी कधी पाहत असे. त्यास "ताऱ्यांचा साहस" असे म्हटले जात होते, आणि मी या अद्भुतते विषयी नेहमी आश्चर्य करीत असे, की हे लोक असे इतका लांबचा प्रवास करतात आणि अंतराळात इतके खोलवर जातात. नुकतेच, मी त्याच्याविषयी विचार करीत होतो आणि मी स्वतःच विचार केला, आपल्याला आध्यात्मिक स्तरा मध्ये खोलवर जाण्याची गरज आहे, त्यावर संशोधन करावे; कारण येथे इतके पाहण्याची, ऐकण्याची व अनुभविण्याची गरज आहे.
आत्म्याच्या स्तरा मध्ये येथे अशी अद्भुत प्रकटीकरणे आहेत परंतु त्यात प्रवेश मिळविण्यासाठी आपल्याला किंमत मोजण्याची गरज आहे. प्रेषित पौल अति ज्ञानी होता व ख्रिस्ता बरोबरील त्याच्या पहिल्या दर्शना नंतर अरेबिया मध्ये आत्म्याच्या खोलवरील स्तरा मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी वेळ घालविला होता. (गलती १:७)
येथे अनेक भविष्यात्मक शब्द, अनेक आध्यात्मिक गीते, महान अभिषेक व आत्म्याची दाने, अधिक अचूक योजना व आराखडे कृपेच्या राजासनाजवळ प्राप्त करण्यास वाट पाहत आहेत.
लूक १:३७ म्हणते, "देवाबरोबर काहीही अशक्य नाही". लक्षात घ्या, ते हे म्हणत नाही की, "देवाला काहीही अशक्य नाही, ते म्हणते, "देवाबरोबर काहीही अशक्य नाही". म्हणजे याचा अर्थ हा की ते जे देवाबरोबर चालतात, त्यांच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही. आपल्याला कशाची गरज आहे तर आध्यात्मिक स्तरा मध्ये साहस करावा. पवित्र आत्म्याच्या स्तरा मध्ये आपल्याला निडरपणे झेप घेण्याची गरज आहे आणि देवाच्या गौरवाचे ते खोलवरील स्तर प्रकट करावे. तुम्ही त्या पाचारणास ऐकणार काय?
प्रार्थना
पित्या, मला व माझ्या संपूर्ण घराण्यासाठी, आम्ही किंमत मोजली आहे. तुझ्या आत्म्याच्या खोलवरील स्तरा मध्ये झेप घेण्यासाठी आम्हांला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मानवी हृदय● ख्रिस्ताने कबरेवर विजय मिळविला आहे
● गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही
● धन्यवादाचे अर्पण
● तो पाहत आहे
● परिस्थितीच्या दयेखाली कधीही जाऊ नये
● अडखळण्याच्या जाळ्यात पडण्यापासून मुक्त राहणे
टिप्पण्या