मला माझे बालपण आठवते, लेकरे म्हणून, आम्ही आमच्या घराजवळच्या भागात नेहमी खेळत असू. कारण आमच्याकडे कॉम्पुटर खेळ, व सैटेलाईट टीवी नव्हते, हे नेहमीच बाहेरील खेळ खेळणे होते. ते खूपच आनंदाचे दिवस होते. हे सांगितल्यावर, एका विशेष गल्लीच्या शेवटी कोपऱ्यावर एक दुश्चिन्ह-असा दिसणारा लाल रंगाचा एक मोठा बॉक्स होता. सर्व वयस्कर लोकांनी आम्हाला चेतावणी दिली होती की, लेकरांनो त्यापासून दूर राहा. तेथे त्यावर कवटी-मुख सारखी प्रतिमा सुद्धा होती. आम्ही जे निष्पाप लेकरे त्याविषयी सर्व प्रकारच्या मोठया कथा बोलत असू हे म्हणत, "एक भूत त्यामध्ये राहते" आणि आम्ही त्यापासून फार दूर राहत असू. नंतर, आम्हांला कळले की तो अति उच्च दाबाचा विद्युत वितरण बॉक्स होता.
ख्रिस्ती म्हणून, आपल्याला शत्रू आहे ज्याचे प्रमुख कार्य हे चोरी, जिवंत मारणे व नष्ट करणे आहे (योहान १०:१०). बायबल आपल्याला चेतावणी देते की आपला शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा चालतो, कोणाला कधी गिळावे हे पाहत असतो. (१ पेत्र ५:८)
शत्रूने हाताळण्यासाठी जर तुम्हाला अत्यंत ज्वलंत व्हावयाचे असेल, तर मग तुम्ही तुमच्या जीवनाला आध्यात्मिक वाढीच्या रहस्यास व्यवहारिकपणे लागू केले पाहिजे. देवाबरोबर चालण्याच्या माझ्या अनेक वर्षात, मी याचा शोध घेतला आहे की जितके अधिक तुम्ही देवाबरोबर घनिष्ठतेत चालता, तुमच्या विजयाचे स्तर तितकेच उच्च असते.
आध्यात्मिकरित्या वाढण्यासाठी, तुम्ही तुमच्या दृष्टिकोनावर कार्य केले पाहिजे. देवाच्या गोष्टीसंबंधी तुमचा दृष्टीकोन सर्वांगीणदृष्टया आध्यात्मिक वाढ निश्चित करतो. एक महत्वाचे सत्य जे तुम्ही विसरले नाही पाहिजे ते हे की समस्या ह्या नेहमी वाढी साठी खत अशा आहेत.
नीतिमान धावा करितात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करितो.
नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो. (स्तोत्र ३३:१७, १९)
येथे ह्या पृथ्वीवर असे कोणतेही ठिकाण नाही, जेथे समस्या नाहीत. जर तुम्ही तुमचे बायबल काळजीपूर्वक वाचत असाल तर तुम्हाला हे आढळून येईल की बायबल मधील सर्व महान पुरुष व स्त्रियांनी संकटांच्या परिस्थितीला अनुभविले आहे, परंतु सरते शेवटी त्यांच्याकडे सामर्थ्यशाली साक्षी होत्या. समस्या ह्या तुम्हाला कडवट किंवा उत्तम बनवू शकतात.
मला तुम्हाला एक रहस्य सांगू दया. प्रत्येक समस्येला एक कालावधी आहे. ते तसेच कायम राहत नाही. परमेश्वराने त्याच्या दये मध्ये तुमच्यासाठी व तुमच्या प्रियजणांसाठी विजयाची वेळ निश्चित केली आहे. तथापि, त्या समस्येकडे तुमचा दृष्टीकोन त्या कालावधीला वाढवू किंवा कमी करू शकतो.
कोणास परमेश्वर ज्ञान शिकवेल की, जीवनाच्या समस्यांवर प्रभुत्व करावे, आणि कोणास तो समज देईल? ते जे त्यांचे दररोजचे अन्न म्हणून देवाच्या वचनास दूध असे करतात. (यशया २८:९ वाचा, सारांशीत)
आपला दृष्टीकोन हा त्याचे बाह्य प्रदर्शन आहे जे आपल्या अंत:करणात खोलवर प्रत्यक्षात घडत आहे. जेव्हा आपले अंत:करण योग्य ठिकाणी: देवाचे वचनावर केंद्रित राहण्यास सुरुवात करते, ज्या समस्यांना आपण तोंड देत आहोत त्याविषयी आपला दृष्टीकोन सुद्धा बदलेल.
अंगीकार
सर्व वेळेला व जीवनाच्या सर्व परिस्थितींमध्ये परमेश्वर हा माझा अक्षय आश्रय आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चांगले हे उत्तमतेचे शत्रू आहे● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● २१ दिवस उपवासः दिवस ०५
● मोठया संकटात
● दार बंद करा
● पवित्रतेचे दुहेरी पैलू
● वचनाचा प्रभाव
टिप्पण्या