प्रभु येशूने त्याचा पृथ्वीवरील वेळ त्याच्या सेवाकार्यामध्ये जास्तकरून कार्य करीत घालविला. असा कोणताही दिवस गेला नाही की त्याने कधी चमत्काराचे न प्रचार केले. देवाचे व्यक्तित्व प्रगट करण्यासाठी तो कार्ये करीत राहीला आणि ही कार्ये प्रत्येक मार्गाने त्याच्या व्यक्तित्वास पात्र होती आणि त्याने ते केले कारण तो कोण होता.
त्याने काय म्हटले त्याकडे पाहा:
परंतु जर मी ते करितो, जरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही किंवा माझ्यामध्ये विश्वास ठेवीत नाही [कमीत कमी] तरी मी जे करीत आहे त्या कृत्यांवर विश्वास ठेवा व त्यावर भरंवसा करा, जेणेकरून तुम्ही हे ओळखावे व समजावे [स्पष्टपणे] की पिता मजमध्ये आहे, व मी पित्यामध्ये आहे [त्याबरोबर एकरूप आहे] (योहान १०:३८ ऐम्पलीफाईड बायबल भाषांतर)
त्याने स्वतः हे निश्चित केले की त्याचे अन्न [त्याचे समाधान] हे देवाचे कार्य करणे आहे आणि पृथ्वीवरील नियुक्त केलेल्या वेळेत त्याचे कार्य पूर्ण करावे आणि ह्या कारणासाठी पवित्र आत्मा त्याच्याबरोबर होता. (योहान ४:३४; प्रेषित १०:३८ वाचा)
तथापि, योहान १४:१२ मध्ये मोठा मुद्दा स्पष्ट केला की त्याने कधी केले नाही त्या कार्यांपेक्षा मोठी कृत्ये त्याचे शिष्य करतील हे त्याने मानले. हे कसे शक्य होईल की एक मनुष्य ज्याने कार्ये केली आहेत ती संपूर्ण जगात सामावली जात नाहीत, तेव्हा मग आता लोक त्याच्यापेक्षा मोठी कार्ये करतील?
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो." (योहान १४:१२)
येशूची कार्ये व आपण जे करणार आहोत त्यामध्ये आपला विश्वास काय फरक करेल? येशूने मोठया कार्यांचा संदर्भ जो दिला तो सरळपणे हे दाखवितो की त्यास अधिक विश्वास आहे की त्याच्यामध्ये विश्वास ठेवण्याद्वारे आपण काय होऊ शकतो. केवळ विश्वास ठेवणारे ही मोठी कार्ये करितील आणि पवित्र आत्म्याद्वारे ते तसे करितील जे तत्वतः देवाच्या आत्म्याद्वारे ख्रिस्त आताही आपल्यामध्ये करीत आहे की त्याची इच्छा व त्याच्या प्रशंसेसाठी करावे.
मोठी कार्ये काय आहेत?
मोठी कार्ये ज्याबद्दल येशूने म्हटले ती अगोदरच केली गेली आहेत आणि ह्या वर्तमान काळात आजही घडत आहेत आणि ती "समेटाची सेवा" आहे. जेव्हा ख्रिस्त लोकांना बरे करीत व त्यांना प्रेम करण्यास समर्थ होता, तो त्यांना तारणाकडे कधीही नेऊ शकला नसता जेव्हा त्यास अजून मरावयाचे होते आणि त्याने ही मोठी कार्ये त्याच्या शिष्यांवर सोपविली.
देवाचे राज्य वाढवावे व सुवार्ता प्रसार करण्याचे महान कार्य ज्याद्वारे आत्मे प्रज्वलित, शिकविली, पुनर्जीवित, व तारली जावीत. महान कार्ये ही की सुवार्ता जगाच्या शेवटापर्यंत न्यावी आणि ख्रिस्त त्याच्या शारीरिक अवस्थे मध्ये हे कधीही करू शकला नसता.
ख्रिस्ताने आपल्याला व जगातील सर्वाना जे त्याजवर विश्वास ठेवतात त्यांना आदेश दिला आहे की देवाच्या राज्यासाठी आत्मे जिंकावी. हे एक कार्य जे आपण करू शकतो जे ख्रिस्ताने त्याच्या पृथ्वीवरील सेवे मध्ये केले ते त्याच्यापेक्षा अधिक वाढेल. त्याचा मृत्यू, त्याचे पुरणे, पुनरुत्थान, आणि त्याचे स्वर्गारोहण की देवाबरोबर कायमचे राहावे याची साक्ष सांगावी.
प्रिय देवाच्या लेकरांनो, ख्रिस्ताने तुम्हांला मोठया कार्यासाठी आदेश दिला आहे आणि ते हे आहे की देवाच्या राज्यामध्ये अनेक आत्मे आणावीत.
प्रार्थना
प्रिय, प्रभु येशू, पवित्र आत्म्याद्वारे मजमध्ये कार्य कर की जी कार्ये तूं केली ती करावी. तुझ्या राज्यासाठी आत्मे जिंकण्यासाठी मला बोलण्यास योग्य शब्द व धैर्य दे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रतिदिवशीज्ञानीहोत कसे वाढावे?● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 2
● काही पुढाऱ्यांचे पतन होते याकारणामुळे आपण माघार घेतली पाहिजे काय?
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
● संकटाच्या काळाकडे पाहणे
● देवाचे 7 आत्मे: देवाच्या भयाचा आत्मा
टिप्पण्या