एलीया तेथून निघाला, तेव्हा त्यास शाफाटाचा पुत्र अलीशा भेटला; तो बैलांची बारा जोते चालवून शेत नांगरित असे, आणि तो स्वतः बाराव्या जोताबरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलीयाने आपला झगा त्याजवर टाकिला. (१ राजे १९:१९)
पहिली गोष्ट अलीशा विषयी आपण पाहतो ती ही की तो शेत नांगरणारा होता; तो कठीण परिश्रम करणारा होता. जर तुम्ही बायबल वाचले, तर तुम्ही हे पाहाल की परमेश्वराने नेहमी लोकांना बोलाविले जेव्हा ते काम करीत होते. उदाहरणार्थ, प्रेषित पेत्र, याकोब व योहान व आंद्रिया यांस बोलाविण्यात आले जेव्हा ते मासे धरत होते. मोशे जो देवाचा माणूस त्यास बोलाविण्यात आले जेव्हा तो त्याचा सासरा इथ्रो ची मेंढरे राखीत होता. संदेष्टा एलीया ने सुद्धा त्याचे बोलाविणे तेव्हा प्राप्त केले जेव्हा तो काम करीत होता.
येथे अनेक लोक आहेत जे मला हे म्हणत लिहितात, "पास्टर, नोकरी, जी मला मिळाली आहे ती हलकी नोकरी आहे." कोणतीही नोकरी ही हलकी किंवा मोठी नाही, हा आपला विचार आहे जो त्यास तसे करतो. देवाच्या आर्थिकतेमध्ये, येथे कोणतेही हलके काम नाही. बायबल आपल्याला सांगते की, "जे काही तुझ्या हाती येईल ते तुझ्या सर्व शक्तीनिशी कर." (उपदेशक ९:१०)
याचा काही विषय नाही की तुमच्या नोकरी विषयी लोक काय बोलतात, ती नोकरी ख्रिस्त मनात ठेवून व त्याच्या गौरवाकरिता व त्याच्या नांवाकरिता कर हे जाणून की तुमचे परिश्रम प्रभु मध्ये व्यर्थ नाही. (१ करिंथ १५:५८). जेव्हा तुम्ही असे करता, ते मग अखंडता व विश्वासूपणाला जन्म देईल.
मी असे का म्हणत आहे? हे याकारणासाठी की तुमची नोकरी ही तुमचे खरे स्त्रोत नाही. तुमची नोकरी ही तुमची खरी सुरक्षितता नाही. हा तो परमेश्वर आहे जो ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या संपत्यनुरूप गौरवाच्या द्वारे आपल्या सर्व गरजांची पूर्तता करतो (फिलिप्पै ४:१९). तुमची नोकरी हे केवळ एक माध्यम आहे तर परमेश्वर हा तुमच्या सर्व पुरवठ्यांचा खरा स्त्रोत आहे.
जेव्हा एक माध्यम बंद होते, तेव्हा मग परमेश्वर तुमच्या जीवनात दुसरे माध्यम उघडण्यास समर्थ आहे. परमेश्वर मर्यादित नाही. घाबरू नका. अनेक लोकांनी सैतानाच्या खोटेपणावर विश्वास ठेवला आहे की ही ती नोकरी आहे जी त्यांना सुरक्षित ठेवीत आहे. सत्यापासून काहीही लपलेले नाही.
अर्थव्यवस्था ही कदाचित वाढेल किंवा कोलमडेल, बाजार उलाढाल ही कदाचित वर किंवा खाली जाईल, प्रथम तुम्ही हे समजा की परमेश्वर हा तुमचे स्त्रोत आहे. दुसरे, कोणतीही नोकरी जी तुम्हाला सध्या आहे, किंवा तुम्हाला मिळणार आहे, ते काम तुमचे सर्व सामर्थ्य एकवटून करा. मी भविष्यवाणी करतो, परमेश्वर केवळ तुमच्या गरजांचीच पूर्तता करणार नाही परंतु तो तुमच्या इच्छांची पूर्ती सुद्धा करेल. परमेश्वर कोणा व्यक्तीस आदर देण्यास बाध्य नाही. तो पक्षपात करणारा परमेश्वर नाही (प्रेषित १०:३४). जसे हे अलीशा ला झाले, म्हणून ते तुम्हांला सुद्धा होईल, त्याच्या प्रीतीचा व कृपेचा झगा तुमच्यावर पडेल.
प्रार्थना
पित्या, माझ्या सर्व आशीर्वादाचा स्त्रोत होण्यासाठी मी तुझे आभार मानतो. माझ्या जीवनात शिस्त आणण्यासाठी माझ्या परिश्रमाचा वापर कर. जे अनेक जण माझ्याभोवती आहेत त्यांच्यासाठी माझे परिश्रम आशीर्वाद असे कर. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कलंकित करणाऱ्या पापासाठी अद्भुत कृपेची आवश्यकता आहे● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
● विश्वास जो जय मिळवितो
● अत्यंत वाढणारा विश्वास
● स्वैराचारास पूर्ण उपाय
● शांती हा आपला वारसा आहे
● भविष्यात्मक गीत
टिप्पण्या