डेली मन्ना
तुमच्या सुटकेला कसे राखून ठेवावे
Tuesday, 13th of August 2024
26
22
478
Categories :
सुटका
सुटका गमवावी हे शक्य आहे काय जी तुम्ही प्रभू पासून प्राप्त केली आहे?
एक तरुण स्त्री व तिचे वडील हे मला आठवतात जे एका उपासने दरम्यान मजकडे आले आणि म्हणाले, "पास्टर मायकल, आम्ही तुमच्या उपासनेला मागच्या वर्षी आलो होतो आणि माझ्या मुलीने एक सामर्थ्यशाली सुटका प्राप्त केली होती. ती आतापर्यंत चांगली होती परंतु आता मागील काही आठवडयापासून तिच्यावर पुन्हा आक्रमण होत आहे. "हे केवळ पुरेसे नाही की तुमची सुटका प्राप्त करावी, तर तुम्ही जे प्राप्त केले आहे ते जपायला सुद्धा पाहिजे.
बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की, सैतानाचे मुख्य मिशन हे चोरणे, मारणे आणि नष्ट करणे हे आहे (योहान 10:10).
आपण प्रत्येक प्रयत्न केले पाहिजे की सुटका कशी सांभाळावी हे शिकावे जी आपण प्राप्त केली आहे म्हणजे शत्रू ती आपल्यापासून आता किंवा भविष्यात हिरावून घेऊ शकत नाही.
# 1. तुमच्या जुन्या स्वभावात परत जाऊ नका.
जेव्हा तुम्ही तुमची सुटका ही प्राप्त केली आहे तुम्ही सर्व प्रयत्न केले पाहिजे की तुमच्या जुन्या जीवनापासून दूर राहावे. तुम्ही राज्याचे व्यक्ति आहे याचा हक्क करू शकत नाही आणि त्याचवेळेस सैतानाबरोबर खेळत राहाल-ते खूपच धोकादायक असे आहे.
प्रभू येशूने एकदा एका मनुष्याला खूपच भयानक परिस्थितीतून सोडविलेहोते. त्याने मग चेतावणी दिली होती हे म्हणत, "पाहा, तूं आता स्वस्थ झाला आहे." पाप करण्याचे सोड, नाहीतरतुझी आणखी दुर्दशा होईल (योहान 5:14). जेव्हा एक व्यक्ति ज्याची सुटका झाली आहे तो जेव्हा त्याच्या जुन्या जीवनाकडे पुन्हा वळतो, त्या भुताटकी शक्ती ज्यापासून त्याची/तिची सुटका केली गेली होती त्या पुन्हा त्याच्या/तिच्या कडे परत येतात. हे एक मुख्य कारण आहे जे आपण पाहतो ज्या व्यक्तींचीमागील आठवडयात सुटका केली गेली होती ते पुन्हा त्याच समस्यांनी भरलेले आहेत.
# 2. वचन आणि आत्म्याने भरलेले राहा
प्रभु येशूने पुढे आपणास निश्चित सत्य प्रकट केले आहे की सुटका झाल्यानंतर पुढे काय होते
"अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधीत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन; आणि तेथे गेल्यावर ते त्यास रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणांबरोबर घेऊन येतो आणि ते आंत जाऊन तेथे राहतात; मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते. (मत्तय 12:43-45)
प्रभु येशूने काहीतरी खूप सामर्थ्यशाली असे प्रकट केले. जेव्हाकेव्हा व्यक्ति अशुद्ध आत्म्यापासून सुटका प्राप्त करतो, आत्मा पुन्हा परत येतो की प्रयत्न करावे आणि त्या व्यक्तीमध्ये पुन्हा प्रवेश मिळवावा. भूतांना एका शरीराची गरज असते ज्याद्वारे कार्य करावे म्हणून ते सर्वकाही करतील जे ते करू शकतात की त्या शरीरात पुन्हा प्रवेश मिळवावा ज्यातून त्यांना काढले आहे.
जरव्यक्ति हा वचन आणि देवाच्या आत्म्याने भरलेला नाही, दुष्ट आत्मा मग आणखी सात दुष्ट आत्मे जे त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहेत त्यासह येतो आणि त्या व्यक्ति मध्ये प्रवेश करतो. आता त्या व्यक्तीची परिस्थिती ही पहिल्यापेक्षा वाईट होऊन जाते. हे मग शुभवर्तमानाच्या शत्रूंना संधी देते की देवाच्या कार्यावर टीका करावी.
येशूने म्हटले, "जर तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल" (योहान 8:31-32). हे खूपच महत्वाचे आहे कीव्यक्ति ज्याने सुटका प्राप्त केली आहे त्याने देवाचे वचन वाचणे आणि त्यावर मनन करण्यात वेळ घालविला पाहिजे.
द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. (इफिस 5:18)
पवित्र शास्त आपल्याला सांगते की आपणांस आत्म्याने सतत भरण्याची गरज आहे की आपली सुटका सांभाळावी. मत्तय 12:43-45 मध्ये, व्यक्तीचे जीवन हे रिकामी होते, आणि याच कारणामुळे दुष्ट आत्म्याने त्याच्या जीवनावर पुन्हा पकड घेतली. जर मनुष्याने आत्म्याने भरण्याची काळजी केली असती, तर त्यास पुन्हा पीडा भोगावयास लागले नसते.
याच कारणासाठी व्यक्ति ज्याने सुटका प्राप्त केली आहे त्याने आत्म्याने भरलेल्या उपासनेला सतत गेले पाहिजे. अशा उपासनेमध्ये वचन आणि आत्मा त्या व्यक्तीला संदेश देतात आणि त्या व्यक्तीला पुढे आणखी प्रबळ करतात.
शेवटी, तुमच्या घरात, तुमच्या कार मध्ये उपासनेचे संगीत चालू ठेवा. हे तुम्हाला प्रेरणा देईल की, अक्षरशः मुक्ततेच्या वातावरणात जगावे. पवित्र शास्त्र सांगते, "जेथेकोठे देवाचा आत्मा आहे तेथे स्वतंत्रता आहे." (2 करिंथ 3:17)
प्रार्थना
प्रभु येशू, मला कृपा दे की तुझ्या वचनात पुढे जावे आणि प्रतिदिवशी तुझ्या वचनाने भरपूर व्हावे.
आशीर्वादित पवित्र आत्म्या तोपर्यंत मला भर जोपर्यंत माझे पात्र काठोकाठ भरून वाहत नाही. माझे सर्वस्व घे. येशूच्या नांवात. आमेन.
आशीर्वादित पवित्र आत्म्या तोपर्यंत मला भर जोपर्यंत माझे पात्र काठोकाठ भरून वाहत नाही. माझे सर्वस्व घे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2● दिवस ०४ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-४
● नवीन आध्यात्मिक वस्त्रे परिधान करा
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
टिप्पण्या