डेली मन्ना
हन्ना च्या जीवनाकडून शिकवण
Wednesday, 14th of August 2024
22
21
438
Categories :
विश्वासूपणा
# 1. हन्नाकठीण परिस्थितीत सुद्धा देवाबरोबर विश्वासू राहिली
हन्ना ला एक अनेक स्त्रिया असलेल्या पतीबरोबर व्यवहार करावा लागत होता, तिला मुलबाळ नव्हते, आणि इतर पत्नीकडून निंदा होत होती परंतु हन्ना चे देवावरील लक्ष हटले नाही ज्याने तिची काळजी केली.
एका रविवारी, मला एका व्यक्तीकडून इमेल प्राप्त झाले. ईमेल हे पुढील प्रमाणे होते:
"माझ्या आईला कॅन्सर आहे आणि म्हणून आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला की तिला स्वस्थ करावे. आम्ही वर्षानुवर्षे प्रार्थना केली प्रभूवर भरवंसा ठेवीत की तिला बरे करावे. तथापि, देवाने तिला नेले. ती मरण पावली. आम्हीकालतिला जाळले. जेव्हा आम्ही आज चर्च कडे आलो, कोणीतरी आम्हाला विचारले, तुम्ही येथे चर्च मध्ये काय करीत आहात कारण तुम्ही तुमच्या आईला गमावले आहे."
त्यास काय प्रत्युत्तर दयावे हे आम्हाला समजत नव्हते. परंतु त्याच वेळेला, हे शब्द माझ्या मुखातून आले, "हे ते ठिकाण नाही का जेथे मी असले पाहिजे-देवाचे घर?"
कोणीही देवाला मोठयाने स्तुती देऊ शकतो जेव्हा सर्वकाही चांगले चालले आहे. तथापि, जेव्हा वेळ ही वाईट असते, भरवंसा ठेवण्यासाठी विश्वासाची गरज लागते, देवाच्या घरी सतत जात राहा.
संकटे आपल्या विश्वासाची परीक्षा घेतात, "ही[संकटे] तुमच्यावर आली आहेत जेणेकरून तुमचा विश्वास जो सोन्यापेक्षा अधिक मूल्यवान आहे, जे नष्ट होते जरी ते अग्नीद्वारे शुद्ध केले जाते ते कदाचित खरे असे सिद्ध व्हावे आणि मग ते प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावे जेव्हा येशू ख्रिस्त हा प्रकट केला जाईल. (1 पेत्र 1:7)
# 2. तुमच्या समस्या प्रभूकडे न्या
कदाचित आत्महत्येचे विचार तुमच्या मनातून निघत असतील. तेव्हामग काय करावे जेव्हा तुम्ही रडला आहात, आणि येथून पुढे आणखी रडू शकत नाही? अशाच वेळी जेव्हा प्रभूला पाहिजे असते की आपण सर्वकाही त्याच्या चरणापुढे अर्पण करावे, आपल्या वेदना सुद्धा.
"तूं आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठींबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही." (स्तोत्रसंहिता 55:22)
# 3. हन्ना ने ते पुन्हा देवाला दिले जे तिने देवाकडून प्राप्त केले होते
हन्ना ने देवाकडून पुत्र प्राप्त केला होता आणि तो जेव्हा 6 ते 7 वर्षाचा होता तेव्हा तिने त्यास शिलोह ला आणले, देवाच्या घरी, आणि त्यास तेथेच ठेवले की देवाची सेवा करावी. तसे करावे हे किती कठीण गेले असेन. छोटा शमुवेल कसा रडला असेन?
तुम्ही जे प्राप्त केले आहे ते तुम्ही पुन्हा देण्यास तयार आहात काय? हेच कदाचित कारण आहे, कीअनेक हे पहिल्या वेळी का प्राप्त करीत नाही-आपण त्यावर आपले हृदय स्थिर करतो.
जे काही आपल्याकडे आज आहे, आपणते सर्व प्रभूकडून प्राप्त केले आहे, तर मग, इतकेत्रासदायक का होते की देवाला ते दयावे जे त्याने पहिल्या प्रथम आपल्याला दिले आहे? (1 करिंथ 4:7)
हन्ना ने तिच्या पुत्राला देवाला दिल्या नंतर, प्रभूनेतिला आणखीअधिक ने आशीर्वादित केले. त्याच्या वापर आणि गौरवासाठी सर्वकाही परत देण्याद्वारे हन्ना चे उदाहरण पाळा.
तुम्हाला बोलाविले गेले आहे की एक माध्यम व्हावे. असे होवो की क्षमा तुमच्यामधून वाहो, शांति तुमच्यामधून वाहो, पैसे तुमच्यामधून वाहो.
देव हन्ना ला पुढे आणखी तीन पुत्र आणि दोन कन्या द्वारे आशीर्वादित करतो. तो पुरेसे पेक्षा अधिक चा परमेश्वर आहे. (इफिस 3:20)
अब्राहामाने तेच चित्र प्रदर्शित केले. त्याने त्याचे संपूर्ण आयुष्यभर इसहाक साठी वाट पाहिली केवळ हे त्यास मागण्यासाठी की त्यास देवाला अर्पण असे देऊन टाक! त्याने त्याच्या आश्वासित पुत्राला अर्पण केले नाही कारण देव स्वतःसाठी पुरवितो. अब्राहाम आणि हन्ना ची कथा हे दर्शवितेकी विश्वास कसा कार्य करतो.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मला तुझ्या आशिर्वादाचे माध्यम बनव. हा लोभ माझ्यामधून काढून टाक.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पहारेकरी● आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे याचा काय अर्थ आहे?
● परमेश्वराला महिमा कसा दयावा
● पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा
● विश्वासात परीक्षा
टिप्पण्या