विश्वास, आशा, प्रीति ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीति श्रेष्ठ आहे. (१ करिंथ १३:१३)
विश्वास, आशा व प्रीतीला देवाच्या प्रीतीचा प्रकार म्हणून देखील ओळखतात, ते दैवी गुणधर्म आहेत ज्यांवर मनापासून प्रेम केले जाते. या उलट, सैतान ह्या सर्व गुणधर्मांवर हल्ला करतो आणि हे ज्यांच्याजवळ आहेत त्यांचे तो अत्यंत द्वेष करतो. देव विश्वास, आशा व प्रीतीचे मूर्त स्वरूप आहे, कारण ते त्याच्या व्यक्तिमत्वाला प्रतिबिंबित करतात.
ज्या व्यक्तींमध्ये हे गुणधर्म खऱ्या अर्थाने आहेत त्यांना "देवाने-भरलेले" असे समजतात, कारण ते केवळ प्रभूकडून व त्याद्वारेच प्राप्त करू शकतात. त्यामुळे, ह्या गुणधर्मांना आत्मसात करणे हे एखादयाला देवाबरोबर गहन संबंधाचा अनुभव देण्यास आणि जीवनास उद्देश व अर्थपूर्ण जगण्यास साहाय्य करू शकतात.
आजच्या समाजात विश्वासहीनता, आशाहीनता आणि प्रीतीचा अभाव प्रचलित असताना देखील, हे गुणधर्म मनुष्याची रचना केली गेली तेव्हापासून अस्तित्वात आहेत आणि जोपर्यंत देव विश्वासणाऱ्यांच्या हृदयात वास करीत आहे ते सतत अस्तित्वात राहील. हे गुणधर्म समाजाच्या बदलणाऱ्या मुल्यांवर आधारित नाहीत परंतु स्थिर व अपरिवर्तीत राहतात,
जरी सैतान व त्याच्या सेनेच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांनी ह्या सद्गुणांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी त्यांचे प्रयत्न हे नेहमीच व्यर्थ ठरले आहे. प्रीति, ही विशेषतः कधीही असफल होत नाही (१ करिंथ १३:८), त्याचवेळेस विश्वास जगावर विजय मिळवितो (१ योहान ५:४), आणि आशा ही आपल्याला वाचविते (रोम. ८:२४). ख्रिस्ती या नात्याने, आपल्याला ह्या गुणांना मूर्त स्वरूप देण्यास आणि आपल्या स्वतःच्या लाभासाठी आणि आपल्या सभोवतालच्या जगामध्ये सकारात्मक प्रभावाने कार्य करणे या दोन्हीसाठी पाचारण झाले आहे.
विश्वास, प्रीति व आशा हे जीवन जगण्यास योग्य बनवितात आणि त्यास उद्देश व पूर्णता देतात. हे गुणधर्म आहेत जे आपल्याला मनुष्य बनविते आणि आपल्याला उर्वरित सृष्टीपासून वेगळे करते. त्यांच्यावाचून, लोक हे केवळ प्राण्यांप्रमाणे वागण्यास प्रवृत्त होतात, आणि त्यांच्या मूळ अंत:प्रेरणा आणि इच्छांद्वारे प्रेरित होतात. परंतु जेव्हा हे गुणधर्म आपल्या जीवनात उपस्थित असतात, तेव्हा सर्वात कठीण अंत:करण सुद्धा सौम्य आणि देवाच्या प्रतिमेमध्ये परिवर्तीत केले जाऊ शकते. विश्वास, आशा व प्रीतीशिवाय जगणे म्हणजे अर्थ व खरा आनंद नसलेल्या निकृष्ट जीवनावर स्थिर होणे आहे.
मी नुकतेच कोलकाताला भेट दिली. आज देखील, तेथील लोक मदर तेरेसा बद्दल प्रशंसेने बोलतात. असंख्य अडथळे व आव्हाहनांना सतत तोंड दिलेले असताना देखील, मदर तेरेसाने विश्वास व प्रीतीच्या परिवर्तीत करणाऱ्या सामर्थ्याची आशा कधीही सोडली नव्हती. मिशनरी सेवाकार्यामधील तिच्या कार्याने असंख्य लोकांच्या जीवनास स्पर्श केला, ज्याद्वारे गरीब व ज्यांना समाज विसरला आहे त्यांना अत्यंत गरजेची काळजी व साहाय्य दिले. एके दिवशी, कोणीतरी तिला विचारले, की विश्वास, प्रीति व आशेमध्ये सतत कार्य तिने कसे चालू ठेवले. तिने उत्तर दिले, "मी सेवा करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मला ख्रिस्ताचा चेहरा दिसतो."
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, मी आज तुझ्यासमोर येतो, तुला विनंती करीत आहे की विश्वास, आशा व प्रीतीच्या तुझ्या दैवी गुणांनी मला भर. त्यांस मजमधून प्रवाहित होऊ दे जेणेकरून ते जे विश्वासहीन, आशाहीन व तुझ्या प्रेमाच्या गरजेमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुझ्या प्रकाशाचा दिवा व्हावे. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● वातावरणावर महत्वाची समज - १● धैर्यवान राहा
● काहीही अभाव नाही
● योग्य पाठपुरावा अनुसरण
● तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा
● परमेश्वर कधी चुकत नाही
● २१ दिवस उपवासः दिवस १५
टिप्पण्या