कोणीतरी म्हटले, परमेश्वर केवळ जडून राहणाऱ्या पत्नी साठी पाहत नाही परंतु सोबत चालणाऱ्या सहकारी विषयी. अगदी प्रारंभापासून, परमेश्वराची आदाम व हवे सोबत सहभागीता होती ज्याने त्यांना "बागेत थंड वाऱ्यात चालताना" पाहिले. (उत्पत्ति 3:8)
हनोख हा पहिला मनुष्य होता की देवासोबत चालण्याचा खराआनंद शोधून काढावा.
मथुशलह झाल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला, व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या; हनोखाचे एकंदर आयुष्य तीनशेपासष्ट वर्षांचे झाले; हनोक देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले. (उत्पत्ति 5:22-24)
आता आपण जलद नवीन करार कडे जाऊ. आपण पाहतो प्रभु येशू पाण्यावर चालतआहे. हे पाहून, "पेत्राने उत्तर दिले, प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणांकडे येण्यास मला सांगा." (मत्तय 14:28)
अनेकांनी पेत्राची टीका केली हे बोलत, "त्याने पाण्यावर चालण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे होता." विल्यम केरी ज्यांस देवाने महानरित्या उपयोगात आणले, ते एकदा म्हणाले होते, "देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी महान गोष्टीचा प्रयत्न करा."
तुम्ही पाहा ही देवाची इच्छा होती की आपण त्याच्याबरोबर चालावे आणि त्याने ही इच्छा आपल्यात टाकली आहे जेणेकरून आपण त्याच्याबरोबर चालावे. मी विश्वास ठेवतो हेच तर ते कारण होते पेत्राने प्रभूबरोबर पाण्यावर चालण्याची इच्छा केली.
मोठा प्रश्न: मी प्रभूबरोबर कसा चालू?
लक्षात घ्या, पेत्राने काय म्हटले, "पाण्यावरून आपणांकडे येण्यास मला सांगा" दुसऱ्या शब्दात, पेत्राने म्हटले, "प्रभु शब्द बोल जेणेकरून मी पाण्यावरून चालत तुझ्याकडे येऊ शकावे." पेत्राला अनुभवावरून हे ठाऊक होते की जर येशूने काही म्हटले आहे, तरतेहोऊनच राहील.
म्हणून त्याने (प्रभु येशूने) म्हटले, "ये." आणि पेत्र जेव्हा नावे मधून बाहेर आला. तो पाण्यावर चालला की प्रभु कडे जावे. (मत्तय 14:29)
पाण्यावर चालणे हे कठीण म्हणणे असे दिसते परंतु वचनावर चालणे हे प्रत्यक्षात पाण्यावर चालण्यासारखे आहे.आता मी तुम्हाला अक्षरशः पाण्यावर चालण्यास सांगत नाही, परंतु तुम्हाला आणि मला प्रभु बरोबर चालणे, यासाठी आपले जीवन हे देवाच्या वचनाच्या पायावर आधारित असले पाहिजे.
जर आपण आपल्या निवडी, आपले निर्णय आणि आपल्या इच्छा ह्या देवाच्या वचनाच्या सिद्धांतावर आधारित असे करतो, आपण कधीही बुडणार नाही. त्याऐवजी आपण प्रभु बरोबरचालू लागतो आणि इतिहास बनवितो. विश्वास हा अंधारात झेप घेणे नाही परंतु देवाच्या वचनावर झेप घेणे असे आहे. तुम्हाला आणि मला दुर्मिळ वर्चस्व मिळविणाऱ्या सोबत मिळणे, यासाठी आपल्याला आपले संपूर्ण जीवन देवाच्या वचनावर आधारित असे करण्याची गरज आहे.
दावीदानेत्याचे जीवन देवाच्या वचनावर आधारण्याचे रहस्य ओळखले होते. हे ते एक रहस्य होते ज्याने त्यास प्रभु बरोबर घनिष्ठतेत चालू दिले. इतकेच केवळ नाही परंतु त्याने त्यास इस्राएलचा राजा असे केले.
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्चित केली आहे. मी फार पीडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकीव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. (स्तोत्रसंहिता 119:105-109)
जेव्हा दावीदाने महत्वाच्या निर्णयाचा सामना केला,त्याने त्याच्या निर्णय करण्याच्या प्रक्रियेवर देवाच्या वचनाचा प्रभाव होऊ दिला. तेथे अशी वेळ आली होती जेव्हा त्याने देवाच्या वचनाबाबत तडजोड केली असती आणि त्वरित उपाय प्राप्त केले असते आणि तरीसुद्धा तो देवाच्या वचनावर ठाम राहिला. ह्यात आश्चर्य नाही की देवाने स्वतः दाविदाला त्याच्या मनासारखा मनुष्य असे म्हटले आहे. (प्रेषित 13:22)
प्रार्थना
पित्या, मला साहाय्य कर की माझे जीवन तुझ्या वचनावर आधारित असे करावे. जेव्हा मी बायबल वाचतो माझ्याबरोबर बोल. सर्व आवाज जे मला अडथळा करतात ते काढून टाक. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आजच्या वेळेत हे करा● जगण्याचे चिन्ह (पद्धत)
● वनातील मानसिकतेवर प्रभुत्व करणे
● तुमच्या नोकरी संबंधी एक रहस्य
● तुमच्या मनाला धैर्य दया
● देवाला प्रथम स्थान देणे # 1
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
टिप्पण्या