डेली मन्ना
35
26
484
पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
Friday, 30th of August 2024
Categories :
समृद्धी
प्रियांनो, मी प्रार्थना करतो की तुम्ही सर्व गोष्टींत संपन्न व्हावे आणि स्वास्थ्यात राहावे, तसे तुमचा जीव सुस्थितीत असावा. (३ योहान २)
पवित्र शास्त्राच्या दृष्टीकोनात खरी संपन्नता काय आहे?
खरी संपन्नता ही पुरेसा दैवी पुरवठा असावा की दैवी मार्गदर्शन पूर्ण करावे.खरी पवित्र शास्त्राची संपन्नता ही केवळ आर्थिक बाबतीतच केवळ नाही परंतु जीवनाच्या सर्व भागात संपन्नता असावी. उदाहरणार्थ, आरोग्यातसुस्थिती, संबंधांमध्ये वगैरे.
नेहमी हा प्रश्न विचारला जातो की अशी संपन्नता मी माझ्या जीवनात कशी प्राप्त करावी?
देवाच्या मंदिरातील उपासना, धर्मव्यवस्था व आज्ञा यांच्यासंबंधाने जे काम त्याने आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभिले ते त्याने पूर्ण मनोभावे केले व त्यांत त्याला यश आले. (२ इतिहास ३१:२१)
हिज्कीया-यहूदाचा राजा एका धोकादायक आणि विनाशक उपद्रवी वातावरणात जगला- जवळ जवळ आपल्या सारख्याच. त्याने प्रत्येक बाजूने सामर्थ्यशाली शत्रूंचा सामना केला. मूर्तीपूजा हा त्या वेळेचा प्रसिद्ध धर्म होता.त्याच्या आई-वडिलांनी देवाचा अस्वीकार केला होता आणि इतर लोकांना प्रोत्साहन दिले होते की इतर देवांची उपासना करावी (२ इतिहास २८). हे सर्व असून सुद्धा, हिज्कीया ने तडजोड केली नाही आणि देवाची सेवा संपूर्ण मनाने करण्याचा निर्णय घेतला.
त्याने त्याच्या अधिकारात जे काही होते त्याच्या सामर्थ्याने ते सर्व केलेकी खऱ्या जिवंत परमेश्वराच्या उपासनेला बढावा दयावा. त्याने देवाची आज्ञा फार मनपूर्वक पाळली.
हिज्कीयाच्या देवाची सेवा करण्याच्या दृढनिश्चयामुळे, देवाने त्यास आशीर्वादित केले. हिज्कीया केवळ वाचला गेला नाही परंतु अस्थिर वातावरणात सुद्धा वाढत गेला कारण सामान्य मता ऐवजी त्याने देवाच्या मागे चालण्याचा निश्चय केला होता. हेच ते काय आपण सुद्धा अनुकरण केले पाहिजे.
दुसरे, आपण सुद्धा परिपक्व ख्रिस्ती लोकांबरोबर सुदृढ संबंध विकसित करण्याचेपाहिले पाहिजे जे पवित्र शास्त्रानुसार चालतात. आणि शेवटचे परंतु कमी महत्वाचे नाही, आपला वेळ, वरदान आणि संपत्तीसहआपण कोणत्या गोष्टी करतो त्याबाबतीत आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.
प्रार्थना
1.पित्या येशूच्या नांवात,मला योग्य व्यक्तीबरोबर जोड म्हणजे मी संपन्न होईन.
2. पित्या, माझा विचार बदल, आणि त्यास तुझ्या वचनानुसार कर म्हणजे मी संपन्न व्हावे आणि तुला गौरव आणावे. येशूच्या नांवात. आमेन.
2. पित्या, माझा विचार बदल, आणि त्यास तुझ्या वचनानुसार कर म्हणजे मी संपन्न व्हावे आणि तुला गौरव आणावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● पतनापासून ते मुक्तीपर्यंतचा प्रवास● देवाचा आरसा
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
● नवीन तुम्ही
● विचार करण्यास वेळ घ्या
● २१ दिवस उपवासः दिवस ०३
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
टिप्पण्या