बहाणे करणे हे मानवाइतकेच जुने आहेत. आपण आपल्या जीवनात कोणत्यातरी क्षणी ते केले आहेत, मग दोष चुकविण्यासाठी, एखाद्या समस्येचा नकार करण्यासाठी, किंवा सरळपणे गैरसोयीच्या परिस्थितीतून सुटण्यासाठी असे काहीही असो. आपण बहाणे का करतो याबद्दल विचार करण्यासाठी कधी तुम्ही शांतपणे विचार केला काय? जबाबदारी बदलावी किंवा सत्याचा नकार करण्यास आपल्याला काय चालना देते? लोक बहाणे का करतात याबद्दल दोन महत्वाची कारणे चला आपण पाहू या :
१.संकटातून बाहेर पडावे आणि
२.वैयक्तिक समस्यांचा नकार करावा
तर आता, ह्या सवयींच्या धोक्याला आणि आध्यात्मिक शिकवण जी आपण शिकू शकतो त्यास स्पष्ट करू या.
अ.संकटातू (दोष) बाहेर यावे
जेव्हा आपण आपल्या कृत्यांच्या परिणामांना सामोरे जातो, तेव्हा तो दोष कोणावर किंवा कशावरतरी करावा असा मोह होतो. कल्पना ही साधी आहे : जर मी दोषाला दुसरीकडे वळवले, तर मी कदाचित संकटातून बाहेर येऊ शकतो. ही प्रवृत्ती काही नवीन नाही, वास्तवात, ती सरळपणे एदेन बागेपर्यंत जाते.
उत्पत्ती ३:१२-१३मध्ये, आपण दोष बदलण्याची पहिली घटना पाहतो.
“आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, ‘हे तू काय केलेस?’ स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.”
येथे, आदाम हव्वेला दोष देतो, आणि सरळपणे, त्याला स्त्री देण्यासाठी देवाला दोष देतो. हव्वा, त्या बदल्यात, तिला भुरळ घातल्याबद्दल सर्पाला दोष देते. एकच जो बहाणे करत नाही, तो सर्प आहे! हे इतरांकडे बोट दाखवून जबाबदारी घेण्यास टाळण्याची मानवी प्रवृत्ती यातून अधोरेखित होते.
दुसऱ्यावर दोष लावणे हे तात्पुरते दोषाला किंवा शिक्षेच्या धोक्याला कमी गंभीर करू शकते, परंतु ते समस्या सोडवत नाहीत. एका ख्रिस्ती व्यक्तीला उच्च प्रतिष्ठेसाठी बोलावलेले आहे. बहाणे करण्याऐवजी, जबाबदारी स्वीकारावी, आपली पापे कबूल करावी, आणि देवाची क्षमा मागावी यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिलेले आहे. जसे १ योहान १:९ आपल्याला स्मरण करते,
“जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.”
बहाण्याऐवजी, कबुली, हा मुक्ती आणि बरे होण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या चुका स्वीकारतो, आणि क्षमा मागतो, तेव्हा आपण देवाला आपल्याला शुद्ध करण्यासाठी आणि आपल्याला धार्मिकतेसाठी पुनःस्थापित करू देतो.
ब. वैयक्तिक समस्येचा नकार करणे (अस्वीकार)
आणखी एक सामान्य कारण की लोक बहाणे करतात ते वैयक्तिक समस्येचा नकार करणे आहे. जेव्हा त्यांच्या चुकांना सामोरे जातात, तेव्हा सत्याला सामोरे जाण्याऐवजी अनेक जण वाळूत डोके गाडणे पसंत करतात. अहरोन आणि सोन्याचे वासरू या कथेमध्ये हे खासकरून उघड आहे.
सोन्याच्या वासरासाठी अहरोनाचा बहाणा
निर्गम ३२मध्ये, मोशे दहा आज्ञा प्राप्त करण्यासाठी सीनाय पर्वतावर असताना, इस्राएली लोक असंयमी झाले आणि त्यांनी त्यांच्यासाठी एक देव बनवण्यास अहोरानाला मागणी केली. अहरोन दबावाला बळी पडला आणि त्यांना उपासना करण्यासाठी त्याने एक सोन्याचे वासरू बनवले. मोशे परत आल्यावर, जेव्हा त्याने ती मूर्ती पहिली, तेव्हा तो संतापला. त्याने अहरोनाला विचारले, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?” (निर्गम ३२:२१)
जबाबदारी स्वीकारण्याऐवजी अहरोनाने दोन बहाणे दिले :
बहाणा १ # : “माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको; ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे.” (निर्गम ३२:२२)
भाषांतर : “ही माझी चूक नाही, ही लोकांची चूक आहे.”
बहाणा २ # : “सोने मी अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले” (निर्गम ३२:२४)
भाषांतर : “हे सहज घडून आले, मला त्यावर नियंत्रण नव्हते.”
त्या परिस्थितीसाठी त्याच्या जबाबदारीला नाकारण्याचा प्रयत्न अहरोनाचा बहाणा होता. खरा विषय, जसे निर्गम ३२:२५ इशारा करते, तो हा होता की, “कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले”. एक प्रमुख याजक आणि पुढारी म्हणून, अहरोन लोकांना धार्मिकतेमध्ये मार्गदर्शन करण्यात चुकला होता. त्याची चूक कबूल करण्याऐवजी, त्याने बहाणे करण्याचे निवडले.
अशा प्रकारचा नकार हा धोकादायक आहे, कारण ते आपल्या खऱ्या विषयांवर उपाय करण्यापासून आपल्याला रोखते. नीतिसूत्रे ३०:१२ आपल्याला स्वतःची फसवणुक करून घेण्यापासून ताकीद देते,
“आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे.”
जेव्हा आपण आपल्या पापांचा अस्वीकार करतो किंवा बहाणे करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला फसवतो आणि पश्चातापासाठी गरज आहे हे ओळखण्यात चुकतो. १ योहान १:८ या सत्याला अधोरेखित करते :
“आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही.”
अस्वीकार आणि बहाणे आपल्याला अपश्चाताप आणि आध्यात्मिकता कुंठीत होण्याच्या चक्रात अडकवून टाकते. यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग हा प्रामाणिक स्वयं-चिंतन आणि कबुली देण्याद्वारे आहे.
बहाण्यांचा परिणाम
बहाणे तात्पुरते समाधान देऊ शकते परंतु त्यामुळे दीर्घकालीन परिणाम होतात. जेव्हा आपण इतरांवर दोष लावतो किंवा आपल्या समस्यांचा अस्वीकार करतो, तेव्हा आपण वाढ आणि बरे होण्याच्या आपल्या संधीला गमावतो. त्याहूनही वाईट, आपण आपल्या स्वतःला देवापासून दूर घेऊन जाण्याचा धोका पत्करतो, जो आपल्याला सत्य आणि एकनिष्ठतेत राहण्यास बोलावत आहे.
बहाणे करण्याऐवजी आपल्या कृत्यांसाठी जबाबदारी घेण्यासाठी, आणि आपल्या अशक्तपणावर मात करण्यासाठी देवाची मदत मागण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. बायबल आपल्याला पापकबुली, पश्चाताप करण्याचा आणि देवाच्या कृपेवर अवलंबून राहण्याचा आदर्श देते. ह्या मार्गाचे अनुसरण करण्याद्वारे, आपण बहाण्यांच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो आणि आध्यात्मिक परिपक्वतेकडे जाऊ शकतो.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, माझ्या कृत्यांसाठी बहाणे करण्यापासून आणि जबाबदारी घेण्यापासून थांबण्यास मला मदत कर. माझी पापे कबूल करण्यासाठी, तुझी क्षमा मागण्यासाठी, आणि आध्यात्मिक परिपक्वतेत वाढण्यासाठी मला शक्ती प्रदान कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सिद्ध सिद्धांताचे महत्त्व● कोणाच्या वार्तेवर तुम्ही विश्वास ठेवाल
● बीज चे सामर्थ्य-१
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन
● क्षमेसाठी व्यावहारिक पाऊले
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
टिप्पण्या