केव्हा बोलावे किंवा शांत राहावे हे समजण्यासाठी ज्ञान व पारख ची गरज लागते.
मौन धरणे हे केव्हाबहुमोल आहे?
क्रोधाच्या क्षणी मौन धरणे हे उत्तम आहे तेव्हा आपल्याला हे समजते की अशा क्षणी आपण काय बोलावे हे निश्चितच देवाच्या वचनानुसार नसते. याकोब 1:19 आपल्याला सुचना देते, "माझ्या प्रिय बंधुंनो, तुम्हांस हे कळते, तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा."
त्याचप्रमाणे, "कारण जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे." (1 पेत्र 3:10)
पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की मौन राहणे हे आपल्याला पाप करण्यापासून रोखते (नीतिसूत्रे 10:19), आदर मिळवून देते (नीतिसूत्रे 11:12) आणिशहाणा आणि समंजस ठरविते (नीतिसूत्रे 17:28). दुसऱ्या शब्दात, तुम्ही तुमची जीभ ताब्यात ठेवण्याद्वारे आशीर्वादित व्हाल.
कधीकधी बोलण्यापेक्षा ऐकणे हा उत्तम भाग आहे. तथापि, अनेकांना ऐकणे हे कठीण होऊ शकते कारण त्यास नम्रताआणि गैर-समज होणे किंवा चुकीचे समजले जाण्याचा धोका पत्करण्याची गरज लागते. मानवी स्वभाव स्वतःला संरक्षण देण्याकडे वळतो परंतु ख्रिस्तासमान आचरण आपल्या स्वतःचा नकार करावयास लावते (मार्क 8:34).
मौन धरणे हे केव्हा बहुमोल नाही
मग तो त्यांना म्हणाला, शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जीव घेणे, ह्यातून कोणते सशास्त्र आहे? पण ते उगेच राहिले. (मार्क 3:4)
अशी वेळ असते जेव्हा मौन धारणे हे नक्कीच बहुमोलनसते.
फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. (उपदेशक 3:7)
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की येथे मौन धरण्याचा समय आहे परंतु मग तेथे बोलण्याचा सुद्धा समय आहे. जर कोणी बोलत नाही जेव्हा त्याने/तिने बोलले पाहिजे तेव्हा हे धोकादायक असे आहे.
जेव्हा लोक त्यांचे मतदान करीत नाही, चुकीचे लोक सत्तेवर येतात. हे एक उदाहरण आहे जेव्हा मौन धरणे हे धोकादायक आहे.
शुभवर्तमान पसरविण्यात आपण मौन नाही राहिले पाहिजे. शुभवर्तमान सांगणे हे दर्शविते की आम्ही वधस्तंभास लाजत नाही. ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शेवटची आज्ञा दिली ती ही, "जा आणि सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवा" (मत्तय 28:19).
केवळ कल्पना करा की येशूच्या शिष्यांनी आणि इतर साक्षीदारांनी ह्या आज्ञेचीअवज्ञा करण्याचे निवडले असते? तर तुम्ही आणि मी निश्चितच प्रभूला ओळखले नसते.
तसेच,चर्च मध्ये तुम्ही काहीही चूक होताना पाहत असाल, शहाणपणाने योग्य अधिकाऱ्यांस ते कळवा. मौन धरणे हे अनेकांना त्याची किंमत भरावयास लावू शकते.
तर मग आपण कसे बोलावे?
1 पेत्र 3:15 आपल्याला सुचना देते की, "ख्रिस्ताला, 'प्रभु' म्हणून आपल्या अंत:करणात 'पवित्र माना'; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणे दया."
कलस्सै 4:6 आपल्याला सुचना देते की, "तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे." आपला उद्देश हा सौम्य राहणे व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे." (तीताला पत्र 3:2)
मार्टिन निमोलर (1892-1984) हे एक प्रसिद्ध पाळक होते जे अडोल्फ हिटलर विरोधात सार्वजनिकरित्या उघडपणे बोलणारे होते आणि जीवनाची शेवटची सात वर्षे हिटलरच्या जेल मध्ये काढले.
निमोलर हे कदाचित ह्या वाक्यासाठी अधिक उत्तमरित्या ओळखले जातात:
प्रथम ते समाजवादी म्हणून आले, आणि मी बोललो नाही-
कारण मी समाजवादी नव्हतो.
मग ते व्यापार-एकतावाद साठी आले, आणि मी बोललो नाही-
कारण मी व्यापार-एकतावादी नव्हतो.
मग ते यहूदी लोकांसाठी आले, आणि मी बोललो नाही-
कारण मी यहूदी नव्हतो.
मग ते माझ्यासाठी आले-आणि मग तेथे कोणी उरला नाही की माझ्यासाठी बोलावे.
प्रार्थना
पित्या,मलाज्ञान आणि पारख दे की केव्हा बोलावे आणि केव्हामौनराहावे.
असे होवो की माझे प्रत्येक संभाषण हे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे मी समजावे. येशूच्या नांवात. आमेन.
असे होवो की माझे प्रत्येक संभाषण हे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे मी समजावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मनुष्यांची परंपरा● साधारण पात्रा द्वारे महान कार्य
● उपास द्वारे देवदूताला कार्य करावयास लावणे
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
● एल-शादाय चा परमेश्वर
● सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट
● संबंधामध्ये आदराचा नियम
टिप्पण्या