डेली मन्ना
देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
Thursday, 26th of September 2024
21
17
251
Categories :
देवाचे शब्द
मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव.
मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो. (स्तोत्र ११: ११-१३)
आजचे वचन देवाच्या वचनाविषयी एक महत्त्वाचा धडा शिकवते. तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये (बायबल मध्ये) जे काही वाचता ते फक्त शब्दांपेक्षा जास्त असते.
त्यात जीवन बदलण्याची क्षमता असते. प्रभू येशूने स्वतः जाहीर केले की "माझे शब्द आत्मा आहेत आणि ते जीवन आहेत" (योहान ६:३३)
हे आपल्याला जीवन देण्याची क्षमता कशी सक्रिय होते हे देखील दर्शवते. जेव्हा आपण आपल्या अंत: करणात देवाचे वचन रोपतो (लावतो) तेव्हा ते सक्रिय होते.
जेव्हा तुम्ही देवाचे वचन वाचण्यास किंवा ऐकण्यास प्रारंभ (सुरुवात) करता, तेव्हा तुम्ही ते आपल्या कानाद्वारे आणि डोळ्याद्वारे आपल्या मनात (अंतःकरणात) आणता, परंतु जेव्हा तुम्ही ती वचने तुमच्या हृदयामध्ये (आत्म्यामध्ये) घेता तेव्हा त्याची वास्तविक शक्ती मुक्त होते. तेव्हाच ते जीवन आणते.
उदाहरणार्थ: जेव्हा तुम्ही बायबल चे शिक्षण व त्या मधील आरोग्य देणारे वचनं ऐकता, वाचता, व त्यावर मनन करत राहता तेव्हा अखेरीस तुम्ही आपल्या अंत: करणात (आत्म्यात) दृढ विश्वास वाढवता, आणि हाच दृढ विश्वास तुमच्या शरीराला आरोग्य देतो. जसे तुमचे हृदय त्या अभिवचनाला पकडून ठेवते तसे ते तुमच्या अंतःकरणातून आणि तुमच्या जीवनात वाहू लागते.
चला आपण असे समजू कि तुम्ही तुमच्या अशुद्ध विचार आणि स्वप्नांशी झुंज देत आहात तर मग तुम्ही या विषयाशी संबंधित शास्त्रवचनांचे वाचन आणि मनन केले पाहिजे. असे केल्याने तुम्ही पापापासून वाचू शकता आणि ज्यासाठी देवाने तुम्हाला बोलाविले ते कार्य पूर्ण करू शकता.
देवाच्या वचनाला बर्याचदा बीज म्हणून संबोधले जाते. नवीन करारात ग्रीक शब्द "शुक्राणू" हे बर्याचदा "बीज" म्हणून अनुवादित केले जाते. हाच शब्द आहे ज्यापासून आपण आपला इंग्रजी शब्द “शुक्राणू” तयार करतो.
ज्याप्रमाणे नैसर्गिक, त्याचप्रमाणे आत्मिक क्षेत्रात देखील आपल्याला आवश्यक असलेल्या चमत्कारांना जन्म देण्यासाठी तुम्ही प्रथम देवाचे वचन बीजाप्रमाणे आपल्या अंत: करणात लावले (रोपले) पाहिजे.
टीपः देवाच्या वचनावर मनन (ध्यान) करणे सुरू करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे नोहा ट्यूबवरील देवाचे दास पाळक मायकेल यांची शिकवण नियमितपणे ऐकणे.
प्रार्थना
परमेश्वर पित्या , मला रोज तुझ्या शब्दाचे चिंतन (मनन) करण्याची कृपा दे जेणेकरून तुझे शब्द माझ्यामध्ये राहतील आणि मग मी प्रार्थनेत मागेन आणि ते माझ्यासाठी होईल. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-१● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● लोक बहाणे करण्याची कारणे- भाग १
● सन्मानाचे जीवन जगा
● चला आपण परमेश्वराकडे वळू या
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #2
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे # 2
टिप्पण्या