डेली मन्ना
शेवटची घटका जिंकावी
Friday, 4th of October 2024
21
18
282
Categories :
देवाशी संबंध
सुटका
कारणतुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करावयाला व तुमचा बचाव करावयाला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. (अनुवाद २०:४)
निर्गम ची कथा ही चमत्कारांची कथा आहे. इस्राएली लोकांची सुटका करण्यासाठी मोशे जेव्हा पहिल्यांदा फारो समोर प्रकट झाला, की कोणीतरी त्यांची सुटका करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे याबद्दल उपकारी होण्याऐवजी ते मोशे वर रागावलेकी तो फारो ला विनंती करीत आहे.
ते मोशे वर रागावले याचे कारण हे की आता फारो ने त्यांचे परिश्रम वाढविले. त्यांच्या गुलामगिरी बद्दल इतके अवगत असल्यामुळे, लवकरच जे स्वातंत्र्य मिळणार होते ते समजण्यास किंवा त्याची प्रशंसा करण्यात ते चुकले.
हो, तेथे तात्पुरती किंमत मोजावी लागली: वाढलेले परिश्रम आणि मोठा तणाव हा त्यांच्या शेवटच्या सुटके साठी एक मार्ग तयार करीत होता. त्यावेळी भूक आणि तहान यांचा समय होता. तेथे कधी अशी वेळ होती की त्यांना वाटले देवाने त्यांना सोडले आहे आणि आता तो त्यांची काळजी करीत नाही. परंतु याद्वारे परमेश्वर त्याच्या लोकांसाठी मार्ग तयार करीत होता.ते ज्यांनी विश्वास ठेवला आणि आत्मविश्वासात पुढे वाटचाल केली शेवटी त्यांच्या अंतिम इच्छित स्वतंत्रेच्या स्थानापर्यंत पोहचले-आश्वासित भूमी.
तसेच आपल्याला सुद्धा होऊ शकते. असे नेहमी म्हटले गेले आहे, "गडद अंधारी रात्र ही केवळ पहाटेच्या जवळच आहे".
कदाचित शत्रू याचा अंदाज घेतो कीत्याचा पराजय हा जवळ आहे आणि तो मग संपूर्ण सामर्थ्याने तुमच्या विरुद्ध कार्य करतो कारण त्यास हे नाही पाहिजे की तुम्ही आणि तुमचे प्रियजन हे मुक्त व्हावेत. कदाचित परमेश्वरास सुद्धा खरेच नाटकीय आणि अंतिम घटकेसहआणि त्याच्या नावाचे महान गौरव होणारीएक चांगली कथा आवडते.आता, कोणाला एक चांगली कथा आवडत नाही?
त्याच्याशी सख्य कर आणि शांति जोड; अशाने तुझे कल्याण होईल. आता त्याच्या तोंडचे धर्मशिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठीव. (ईयोब २२: २१-२२)
जेव्हा शत्रू त्याचे सर्वात प्रभावी शस्त्र तुमच्याविरुद्ध फेकतो, आपल्यालाखोलवर गेले पाहिजे. जसे एकदा देवाच्या एका मोठया मनुष्याने म्हटले आहे, "आपल्याला सैतानाच्या युद्धावर युद्ध घोषित करण्याची गरज आहे" आपण हे कसे करू शकतो?
जितके अधिक तुम्ही पित्याशी समरूप होता, तितके अधिक तुम्ही त्याची इच्छा जाणाल. त्याचीशांति आणि त्याचे उद्देश हे तुमच्या जीवनात पूर्ण होतील. दुसरी बाजू ही, जेव्हा तुम्ही असे करता, सैतानाच्या योजना आणि जाळे हे नष्ट केले जातील.
रहस्य हे आहे की आपल्या स्वतःला बंधनाच्या कोणत्याही प्रकारात समरूप होऊ देऊ नका पण त्याऐवजी त्याच्या उपस्थितीद्वारे प्रभावित व्हा. जेव्हा आपण असे करतो, चांगले जे त्याने आश्वासन दिले आहे ते प्रकट होईल.
अंगीकार
जरी मी मृत्युछायेच्या दरीतूनही जात असलो तरी मी भिणार नाही. परमेश्वर माझ्याबरोबर आहे. तो माझा प्रकाश आणि माझे जीवन आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पापी रागाचे स्तर उघडणे● जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● स्वतःवरच घात करू नका
● ख्रिस्ती लोक देवदूताला आदेश देऊ शकतात काय?
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले
● बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश
टिप्पण्या